30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeटॉप न्यूजLIC Recruitment 2021: एलआयसीमध्ये विमा सल्लागार पदाच्या 100 जागांवर भरती, पाहा शेवटची...

LIC Recruitment 2021: एलआयसीमध्ये विमा सल्लागार पदाच्या 100 जागांवर भरती, पाहा शेवटची तारीख किती?

टीम लय भारी

मुंबई: भारतीय जीवन विमा निगम म्हणजेच एलआयसीनं विमा सल्लागार पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे(LIC:Recruitment for 100 posts of Insurance Consultant)

एलआयसीनं त्यांच्या वेबसाईटवर जारी केलेल्या अधिसूचनेप्रमाणं 100 जागांवर भरती होणार आहे. अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी या https://licindia.in/ वेबसाईटला भेट द्यावी.

50 हजार ते 5 लाख, झटपट कर्ज मिळवा; पाहा काय आहे PMMY स्कीम

शेअर बाजारात पैसे गुंतवणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! या तारखेपासून नियम बदलणार

अर्ज कधी आणि कुठे करावा?

भारतीय जीवन विमा निगम म्हणजेच एलआयसीनं जारी केलेल्या जाहिरातीनुसार https://licindia.in/ या वेबसाईटवर 31 डिसेंबरपर्यंत पर्यंत अर्ज करता येईल. उमेदवारांनी एलआयसीच्या वेबसाईटवर नोंदणी करुन अर्ज सादर करावेत, असं आवाहन करण्यात आलं आहे.

100 जागांसाठी भरती

एलआयसीच्या लोक प्रशासन आणि संरक्षण विभागातील विमा सल्लागार पदासाठी 100 जागांवर भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना नवी दिल्ली येथील कार्यालायत नोकरीसाठी रुजू व्हावे लागेल.

SBI कडून दुचाकी कर्ज ‘SBI Easy Ride’ लाँच, YONO वर मिळणार एवढा कर्ज

https://www.livemint.com/companies/news/lic-listing-in-march-quarter-says-dipam-secretary-pandey-11637162704345.html

पात्रता

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे. उमेदवार भारत सरकार मान्यता प्राप्त कोणत्याही विद्यापीठातून पदवीधर असावा. निवड झाल्यानंतर त्याला मार्केटिंग आणि सेल्समध्ये काम करावं लागेल.

वेतन

एलआयसीकडून विमा सल्लागार म्हणून निवड होणाऱ्या उमदेवारांना 7 ते 25 हजार रुपयांच्या दरम्यान मानधन दिलं जाणार आहे. एलआयसीच्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशन वाचून घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

नाल्कोमध्ये 86 जागांवर भरती

नॅशनल अॅल्युमिनिअर कंपनी लिमिटेडमध्ये डेप्युटी मॅनेजर, जनरल मॅनेजर, ग्रुप जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर पदांवर मध्ये नोकरी मिळवण्याची उत्तम संधी निर्माण झाली आहे.

नाल्कोच्यावतीनं पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाईट nalcoindia.com वर 7 डिसेंबरपर्यंत अर्ज करू शकतात.

नाल्कोमध्ये नॅशनल अॅल्युमिनिअर कंपनी लिमिटेडमध्ये डेप्युटी मॅनेजर, जनरल मॅनेजर, ग्रुप जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजरच्या 86 पदांवर अर्ज दाखल करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 07 डिसेंबर 2021 निश्चित करण्यात आलेली आहे.

मुदतीनंतर कोणत्याही उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही, असं नाल्कोकडून कळवण्यात आलं आहे. या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवारांनी नोटिफिकेशन वाचावं, असं आवाहन करण्यात आलेलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी