टॉप न्यूज

बाप-लेकीचं नातंच वेगळं! बाबांच्या मदतीसाठी धावल्या सुप्रिया सुळे…

टीम लय भारी

मुंबई:- गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर काल शिवाजी पार्कवर येथे अंत्यसंस्कार झाले. त्यादरम्यान शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामधल्या नात्याचा एक वेगळा जिव्हाळा दिसला. त्या दोघांचा फोटो सध्या चर्चेत आहे.( Supriya Sule , father and daughter different relationship)

रविवारी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन झाले. त्यानंतर शिवाजी पार्क येथे लता मंगेशकर यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यातील बापलेकीचं अनोखं नातं सर्वांनाच पहायला मिळालं.

हे सुद्धा वाचा

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी डीआरडीओची उडवली खिल्ली

सुप्रिया सुळेंना कोरोनाची लागण, पती सदानंद सुळे ही पॉझिटिव्ह

शेतकऱ्यांना चिरडणे म्हणजे सत्तेची मस्ती, बाकी काही नाही; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

NCP MP Supriya Sule mocks DRDO; makes false claims about vaccines in Parliament: Details

अंत्यसंस्कार दरम्यानचा एक बाप-लेक जिव्हाळा दर्शवतानाचा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होतोय. आणि शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यातील नातं पाहून चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील भारावले गेले आहेत. नरेंद्र मोदीच नाही तर सर्व नेत्यांना या फोटो बद्दल जिव्हाळा व्यक्त झाला आहे.

लतादीदींच्या अत्यंदर्शनासाठी शरद पवारांनी आपले बूट काढले होते. दर्शनानंतर पवार खाली उतरले. त्यावेळी पवारांना पुन्हा बूट घालण्यास त्रास होत होता , त्यावेळे त्यांना खासदार सुप्रिया सुळेंनी पहिलं , व कोणताच विचार न करता त्यांनी अक्षशह: खाली बसून त्यांना पायात बूट घालण्यास मदत केली. आपलं पद काय, आपण कुठे आहोत, याचा कसलाच विचार सुप्रिया सुळे यांनी केला नाही. त्यावेळेचे हे दृश्य कॅमेरामननं आपल्या कॅमेरात टिपलं आहे. आणि तोच फोटो सध्या चांगलाच व्हायरल होतोय.

आणि हेच बाप-लेक जिव्हाळा असलेलं दृश्य समोरच बसलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही पाहिलं , आणि ते ही भारावून गेल्याचं कॅमे-यात कैद झालंय. या प्रसंगावरून बापलेकीचं नातं असं असावं अशा प्रकारच्या प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत. शिवाय खासदार सुप्रिया सुळे यांनी जे पाऊल उचललं, ते कौतुकास्पद होतं, अशी प्रतिक्रिया देखील व्यक्त केली आहे.

Pratikesh Patil

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

11 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

11 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

12 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

12 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

13 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

15 hours ago