टॉप न्यूज

Tokyo Paralympics : टेबल टेनिसपटू भाविना पटेलने इतिहास रचला, सुवर्णपदक जिंकण्यापासून एक पाऊल दूर

टीम लय भारी

टोकियो :  भारताची महिला टेबल टेनिस खेळाडू  भाविना पटेल हिने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. आज टोकियो क्रीडा स्पर्धेत महिला एकेरी वर्ग ४ च्या उपांत्य फेरीत चीनच्या झांग मियाओचा ७-११, ११-७, ११-४, ९-११, ११-८ असा पराभव केला. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवणारी ती पहिली भारतीय महिला आहे (Table tennis player Bhavina Patel made history).

भाविना पटेल अंतिम फेरीत पोहचल्याने भारतासाठी रौप्य पदक आता निश्चित झाले आहे. जर आता असलेल्या सुपर फॉर्ममध्ये तिने जर ऐतिहासिक कामगिरी केली आणि अंतिम फेरीही जिंकली तर ती भारताला टोकियो पॅरालिम्पिक गेम्सच्या इतिहासातील ५ वे सुवर्णपदकही मिळवून देईल.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास

टोकियो ओलिम्पिकच्या सेमिफायनल मध्ये पी. व्ही. सिंधूच्या हाती निराशा; परंतु तिला आणखी एक संधी मिळणार

भाविना पटेलचे हे पहिले पॅरालिम्पिक आहे आणि तिच्या पहिल्याच प्रयत्नात तिने क्रीडा क्षेत्रातील सर्वात मोठ्या मंचावर उत्तम कामगिरी केली आहे. अहमदाबादच्या ३४ वर्षीच्या भाविनाने यापूर्वी उपांत्य फेरीचे तिकीट बुक केले होते. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आणि २०१६ च्या रिओ पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता सर्बियाच्या बोरिस्लावा पेरिच रॅन्कोवीला उपांत्यपूर्व फेरीत सरळ गेममध्ये ३-० ने पराभूत केले होते आणि आता उपांत्य फेरीत तिने चीनी पॅडलरला ३-२ ने पराभूत केले (In the semi-finals, she defeated the Chinese Paddler 3-2).

टोकियो ऑलिम्पिक 2020 मधील तिसऱ्या दिवशी मेरी कोम आणि पी व्ही सिंधुकडून भारताला मोठ्या विजयाची आशा

Bhavina assures India of first medal at Tokyo Paralympics

भाविना पटेल अंतिम फेरीत पोहचल्याने भारतासाठी रौप्य पदक आता निश्चित झाले आहे

भाविनाचे लक्ष्य आता सुवर्णपदक आहे, कोणत्याही परिस्थितीत मी सुवर्णपदक जिंकणारच, असा तिचा विश्वास आहे. अंतिम फेरीत मी शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करीन आणि सामना जिंकेल, असे पहिली पॅरालिम्पिक खेळणारी भाविना म्हणाली. जेव्हा मी इथे खेळायला आली होती, तेव्हाही मी फक्त या विचारात होती की फक्त खेळावर लक्ष केंद्रित करावे आणि सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करावी आणि आतापर्यंत हेच करत आहे. आता फक्त एका सामन्यााचा विषय आहे, असे भाविना म्हणाली.

टोकियो पॅरालिम्पिकमधील टेबल टेनिस स्पर्धेत भाविनाने अंतिम फेरी गाठत रौप्य पदक मिळवले आहे. सुवर्णपदक जिंकण्याचे तिचे लक्ष्य आहे आणि ज्या सुपर फॉर्म मध्ये भाविना आहे, ते पाहून ती सुवर्णपदक सुद्धा नक्की जिकेंल, असा विश्वास भारतीयांना वाटत आहे (Indians believe that she will win the gold medal too).

Rasika Jadhav

Recent Posts

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

4 days ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

5 days ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

5 days ago

डॉ. सुजय विखे पाटलांचे गिरे तो भी टांग उपर

डॉ. सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय(Dr. Sujay Vikhe Patil has been defeated…

7 days ago

छगन भुजबळ यांनी एका धनगर नेत्याला संपवलं होतं

उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळा केला होता. यांत भुजबळ यांनी नाहक…

7 days ago

छगन भुजबळ ओबीसी चळवळीचा वापर स्वतःचा भ्रष्टाचार बळकट करण्यासाठी करतात

भुजबळ(Bhujbal) ज्या ज्या खात्यात गेले, त्या त्या खात्यात त्यांनी यथेच्छ भ्रष्टाचार केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम…

7 days ago