एकाच नावाच्या दोन महिला उमेदवार, राष्ट्रवादीसमोर डोकेदुखी

लय भारी न्यूज नेटवर्क : राजू थोरात

तासगाव : तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातून आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमनताई रावसाहेब पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्ज भरला आहे. पण त्याच वेळी आज आणखी एका महिलेने आपला अर्ज सादर केला आहे. या महिलेचे नाव सुद्धा सुमनताई रावसाहेब पाटील असेच आहे.

स्वतःचे नाव, पतीचे नाव व आडनाव ही तिन्ही नावे एकसारखीच आहेत. राष्ट्रवादीच्या सुमनताई आणि अपक्ष सुमनताई या दोघींना केवळ चिन्हावरून किंवा फोटोवरूनच ओळखणे शक्य आहे. परंतु एकसारखीच नावे असल्यामुळे अनेक मतदारांचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे.

अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेल्या सुमनताईंच्या मागे अन्य स्पर्धक उमेदवारांचा तर हात नाही ना ? असाही सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

राष्ट्रवादीच्या सुमनताई पाटील यांना शिवसेनेच्या अजित घोरपडेंनी तगडे आव्हान उभे केले आहे. घोरपडे यांच्या पाठीमागे खासदार संजयकाका पाटील यांनी पूर्ण ताकद उभी केलेली आहे. त्यामुळे एकेका मताला महत्व राहणार आहे. अशा परिस्थितीत अपक्ष सुमनताई पाटील यांनी जर राष्ट्रवादीच्या सुमनताईंची मते खाल्ल्यास राष्ट्रवादीसमोर मोठीच डोकेदुखी होईल असे बोलले जात आहे.

तुषार खरात

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

12 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

13 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

14 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

15 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

15 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

16 hours ago