टीम लय भारी
नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटात राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा आज बुधवारी दिल्लीत पार पडला. यावेळी भाजपमध्ये प्रवेश केलेले उदयनराजे भोसले यांनीदेखील खासदारकीची शपथ घेतली. मात्र, या वेळी शपथ संपल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र; जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणा दिली. यावर वैंकय्या नायडू यांनी नाराजी व्यक्त केली. “हा शपथविधी सोहळा राज्यसभेत होत नसून माझ्या दालनात होत आहे, हे रेकॉर्डवरही घेतलं जात नाही आहे. सभागृहात कोणत्याही घोषणा देण्यास परवानगी नाही. भविष्यात हे लक्षात ठेवा’, अशी समज यावेळी व्यंकय्या नायडू यांनी दिली.
आज दिल्लीमध्ये करोनाच्या पार्श्वभूमिवर राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या दालनामध्ये हा शपथविधी सोहळा पार पाडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील इंग्रजीतून शपथ घेतली. तर शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी, भाजपाचे भागवत कराड आणि काँग्रेसचे राजीव सातव यांनी मराठीतून शपथ घेतली. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. प्रा. फौजिया खान यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्या आजच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित नव्हत्या. मात्र आज उदयनराजे यांनी केलेल्या घोळमुळे त्याचीच जोरदार चर्चा सुरु आहे.
साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…
आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…
बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…
कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…
आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…