31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeटॉप न्यूजउदयनराजेंनी खासदारकीची शपथ घेतांना केला घोळ!

उदयनराजेंनी खासदारकीची शपथ घेतांना केला घोळ!

टीम लय भारी

नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटात  राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा आज बुधवारी दिल्लीत पार पडला. यावेळी भाजपमध्ये प्रवेश केलेले उदयनराजे भोसले यांनीदेखील खासदारकीची शपथ घेतली. मात्र, या वेळी शपथ संपल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र; जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणा दिली. यावर वैंकय्या नायडू यांनी नाराजी व्यक्त केली. “हा शपथविधी सोहळा राज्यसभेत होत नसून माझ्या दालनात होत आहे, हे रेकॉर्डवरही घेतलं जात नाही आहे. सभागृहात कोणत्याही घोषणा देण्यास परवानगी नाही. भविष्यात हे लक्षात ठेवा’, अशी समज यावेळी व्यंकय्या नायडू यांनी दिली.

Advt
जाहिरात

आज दिल्लीमध्ये करोनाच्या पार्श्वभूमिवर राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या दालनामध्ये हा शपथविधी सोहळा पार पाडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील इंग्रजीतून शपथ घेतली. तर शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी, भाजपाचे भागवत कराड आणि काँग्रेसचे राजीव सातव यांनी मराठीतून शपथ घेतली. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. प्रा. फौजिया खान यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्या आजच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित नव्हत्या. मात्र आज उदयनराजे यांनी केलेल्या घोळमुळे त्याचीच जोरदार चर्चा सुरु आहे.

advt
जाहिरात

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी