टॉप न्यूज

महिला समानता दिन 26 ऑगस्ट रोजी का साजरा केला जातो, जाणून घ्या कारण

प्राची ओले : टीम लय भारी

मुंबई : 26 ऑगस्ट हा दिवस जागतिक महिला समानता दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी 1920 मध्ये अमेरिकेत महिलांना प्रथमच मतदानाचा अधिकार मिळाला(women equality day is celebrated on 26th August).

पुरुषांसारखा मतदानाचा अधिकार आपल्याला देखील मिळावा अशीच अमेरीकेतील महिलांची मागणी होती. हा मतदानाचा अधिकार त्यांना इतक्या सहजासहजी मिळाला नाही. हा अधिकार मिळवण्यासाठी ह्या महिलांनी 50 वर्षे लढा दिला. त्यांच्या ह्या लढ्याला लक्षात ठेवण्यासाठी 26 ऑगस्ट हा दिवस महिला समानता दिवस म्हणून साजरा केला जातो.

भारताने काश्मीरबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी : तालिबान

राज्यकर्ते घडविणारी प्रदर्शनी

हा अधिकार मिळवण्यासाठी ह्या महिलांनी 50 वर्षे लढा दिला.

न्यूझीलंड हा जगातील पहिला देश आहे ज्याने सर्वप्रथम हा(women equality day) दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. ह्या चळवळीची पहिली सुरुवात झाली ती 1848 मध्ये, सेनेका फॉल्स न्यूयॉर्कच्या एका गटातुन. हा गट महिलांच्या समस्या आणि महिलांचे अधिकार या मुद्द्यांवर चर्चा करत असत. ह्या महिलांच्या संघात पुरुषांचा देखील समावेश होता. ह्या चळवळीने हळूहळू संपूर्ण देशात पंख पसरवायला सुरुवात केली आणि या चळवळीला गती प्राप्त झाली.

1890 च्या दशकात नॅशनल अमेरिकन वूमन असोसिएशनची स्थापना झाली. एलिझाबेथ कैंडी स्टाईटनने या संघाचे अध्यक्षपद सांभाळले. 1920 मध्ये इडाहो आणि यूटाने महिलांना मतदानाचा अधिकार मिळवून दिला. या चळवळीत महिलांना समानतेचा अधिकार मिळवून देणाऱ्या वकील बेल्ल अब्जुग यांचे देखील नाव घेतले जाते. त्यांनी हार न मानता, अधिकार मिळवण्यासाठी सतत संघर्ष केला.

प्रथमतः अमेरिकेतच हा दिवस साजरा केला जात असत. परंतु लिंग समानता हा विषय फक्त अमेरिका देशापर्यंत सीमित नव्हता. ही समस्या साऱ्या जगाची समस्या असल्यामुळे हा दिवस जागतिक स्तरावर साजरा करण्यात येऊ लागला.

इंदिरा गांधींमुळे अमिताभ बच्चन यांच्यावर मीडियाने 15 वर्षांसाठी टाकला होता बहिष्कार

Women’s Equality Day 2021: Wishes, Quotes, Messages, SMS, WhatsApp And Facebook Status

आपल्या भारत देशातदेखील जरी संविधानाने महिलांना समान अधिकार दिला असला तरी, समाजात स्त्रीला समानतेची वागणूक मिळत नाही. वास्तविकता लक्षात घेतली तर, आज देशात आशा काही महिला आहेत, त्यांनी केवळ पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नाही तर, पुरुषांपेक्षा पुढे जाऊन यशाची उंची गाठली. भारताची शान वाढवली. परंतु, दुसऱ्या बाजूला देशाच्या कोपऱ्यात अशा देखील महिला आहेत, ज्यांना अजून देखील घराच्या बाहेर पडायची परवानगी नाही. चूल आणि मूल पर्यंतच त्यांचे विश्व आहे. ज्यांना प्रत्येक दिवसाला त्या स्त्री आहेत म्हणून असमानतेची वागणूक दिली जाते.

देश एवढा पुढे गेला तरी, अजून देखील समाजातील काही भागातील मानसिकता महिलांना घेऊन बदलेली नाही. ज्या दिवशी हे सगळं बंद होईल. स्त्री ह्या देशात मुक्तपणे वावरले. जिच्यावर काही बंधने नसतील, त्या दिवशी खरा महिला समानता दिवस साजरा केला होईल.

 

Mruga Vartak

Recent Posts

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

10 mins ago

Jaykuamar Gore Vs Prabhakar Deshmukh | शाळकरी मुलांनी सांगितले आमदाराचे कार्य

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(School children told…

23 mins ago

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असणं नामुष्की | शिंदे, अजितदादा तमासगीर | बाळासाहेब पाटील एक नंबर आमदार

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath Shinde being Chief Minister is…

37 mins ago

Jaykumar Gore | लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नाहीत, आमदाराने पाणी आणले नाही

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Beloved sister does…

3 hours ago

धनुषच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…

21 hours ago

व्यायाम केल्यानंतर किती वेळाने काही खावे? जाणून घ्या

आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…

22 hours ago