35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeसंपादकीयइंदिरा गांधींमुळे अमिताभ बच्चन यांच्यावर मीडियाने 15 वर्षांसाठी टाकला होता बहिष्कार

इंदिरा गांधींमुळे अमिताभ बच्चन यांच्यावर मीडियाने 15 वर्षांसाठी टाकला होता बहिष्कार

धनश्री धुरी : टीम लय भारी

बॉलिवूड स्टार अमिताभ बच्चन यांनी आजवर अनेक सुपरहिट चित्रपट हिंदी सिनेमांना दिले. त्यांना बॉलिवूडचे महानायक म्हणून बोलले जाते. त्यांचा कणखर आवाज, शरीरयष्टी आणि उत्कृष्ट अभिनय शैली यामुळे ते त्यांच्या चाहत्यांचे व मीडियाचे आवडते अभिनेता बनले. परंतु एक काळ असा होता जेव्हा इंदिरा गांधींमुळे अमिताभ बच्चन यांच्यावर मीडियाने बहिष्कार टाकला होता (Amitabh Bachchan was boycotted by the media).

जेव्हा जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते, तेव्हा त्यांच्या कार्यालयात अमिताभ यांचे वडील हरिवंश राय बच्चन हे विदेश मंत्रालयात कार्यरत होते. नेहरु आणि हरिवंश यांच्यात त्यावेळी मैत्रीचे नाते होते. हेच नाते पुढे अमिताभ आणि राजीव गांधी यांच्यात बनले. इतकेच नव्हे तर अमिताभ यांनी राजीव गांधींना राजकारणात साथ देण्यासाठी इलाहाबाद मधून निवडणूक लढवली होती. मुख्य म्हणजे अमिताभ ही निवडणूक जिंकले सुद्धा.

वाघाच्या तोंडात कोंबडी, संजय राऊतांचे ट्विट

भाजप आमदार प्रसाद लाड यांना धमक्या

Amitabh Bachchan was boycotted by the media
अमिताभ बच्चन आणि राजीव गांधी यांच्यात मैत्रीचे नाते होते

सन 1975 साली इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी आणीबाणीच्या वेळी मीडियावर सेन्सरशिप ( मुद्रण नियंत्रक) लावला होता. आणीबाणीच्या वेळी मीडियावर लावलेला  सेन्सरशिप अमिताभ यांच्या सांगण्यावरून इंदिरा गांधींनी लावला असा समज मीडियाने लावला. त्यामुळे अमिताभ यांना 15 वर्षांसाठी मीडियाने बहिष्कार टाकला होता. अमिताभ यांनी एका मुलाखतीत सांगितले की, मीडियाला सेन्सरशिप त्यांनी लावायला सांगितले यात काहीही सत्य नव्हते. बच्चन यांच्या बातम्या आणि फोटो पेपर मध्ये येणे बंद झाले. अमिताभ यांनी सुद्धा मीडियाला स्वतःच्या सेटवर बोलवणे बंद केले होते.

पोपटाचा प्राणही मुंबई महानगरपालिकेत, चंद्रकांत पाटीलांनी उद्धव ठाकरेंना खिजवले

Amitabh Bachchan offered to do Chehre for free

बोफोर्स घोटाळ्यातही अमिताभ यांच्यावर लावले होते आरोप

बोफोर्स घोटाळ्यात अमिताभ बच्चन यांचा देखील हात आहे असा आरोप करण्यात आला होता. राजीव गांधी आणि अमिताभ बच्चन यांच्यात असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधामुळे हा आरोप लावण्यात आला होता.

जेव्हा राजीव गांधी पंतप्रधान होते तेव्हा भारत सरकार आणि स्वीडनची मशिन्स बनवणारी कंपनी एबी बोफोर्स यांच्यात 24 मार्च 1986 साली 1, 437 करोड रुपयांची डील झाली होती. भारतीय सैन्यासाठी 155 एमएम च्या 400 होवित्झर तोफच्या पुरवठ्यासाठी ही डील करण्यात आली होती.

Amitabh Bachchan was boycotted by the media
बोफोर्स घोटाळ्यात अमिताभ यांचा हात असल्याचा आरोप लावला होता

परंतु 16 एप्रिल 1987 साली स्वीडिश रेडीओने आरोप केला की, एबी बोफोर्स कंपनीने या डीलमध्ये भारताच्या वरिष्ठ राजकीय नेत्यांना आणि सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांना लाच दिली होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी