व्हिडीओ

VIDEO : ‘आप’च्या झाडूने दिल्लीतून भाजपा साफ

देशातील बहुचर्चित असा दिल्ली महानगरपालिकेचा निकाल जाहीर झाला आहे. गेल्या 15 वर्षांपासून दिल्ली महानगरपालिकेमध्ये असलेल्या भाजपच्या सत्तेला आपच्या झाडूने साफ केलेले आहे. आपने दिल्लीमध्ये 250 जागांपैकी 134 जागांवर विजय मिळवला. भाजपचा पराजय केल्यानंतर दिल्लीमध्ये आप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केलेला पाहायला मिळाला. यावेळी दिल्लीतील आपच्या कार्यकर्त्यांनी रॅली देखील काढल्या. विजयी झालेल्या आपच्या उमेदवारांवर फुलांची उधळण करण्यात आली. तर काही ठिकाणी ढोल वाजवले गेले तर डीजे देखील लावण्यात आले. या महत्वाच्या विजयानंतर आपकडून दिल्लीकरांचे आभार मानण्यात आले. यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, पंजाबचे मुख्यमंत्री गुरदीपसिंह मान व इतर नेते उपस्थित होते.

आपने दिल्लीत सत्ता स्थापन केल्यानंतर अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. आरोग्य आणि शिक्षण या दोन विषयांवर आपने अधिक भर दिली ज्यामुळे दिल्लीतील घराघरांत आप पोहोचली. आपच्या मतदारांमध्ये वाढ झाली. ज्याचा फायदा अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला भाजपची 15 वर्षांची सत्ता संपुष्टात आणण्यात झाला आहे.

दरम्यान, आपच्या महत्वाच्या आमदारांच्या विभागात हरल्याचे चित्र आहे. आपचे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे पटपडगंज या विभागाचे आमदार आहेत. या विधानसभेत एकूण चार वॉर्ड आहेत परंतु याठिकाणी भाजपने तीन तर आपने फक्त एका जागेवर विजय मिळवला. तर शकूरबस्ती या ठिकाणचे आमदार असलेले सत्येंद्र जैन यांना त्यांच्या या विभागात असलेल्या तीन वॉर्डपैकी एकाही जागेवर खाते उघडता आले नाही. या तिन्ही जागांवर भाजपचा उमेदवार विजयी होऊन आलेला आहे. मनीष सिसोदिया यांच्यावर दारू घोटाळा तर सत्येंद्र जैन यांच्यावर मनी लॉन्डरिंग प्रकरणी कारवाई करण्यात आली होती. काँग्रेसचा या निवडणुकीत पूर्णतः सुपडा साफ झालेला आहे. दिल्ली महानगरपालिकेत भाजपचे 104, काँग्रेसला फक्त नऊ तर तीन अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.

ऋतुजा कांबळे

Recent Posts

नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे १६ कोटीचे धनी

सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या संपुर्ण कुटुंबियांच्या नावे एकूण…

18 mins ago

दिंडोरी लोकसभेच्या उमेदवाराची संपत्ती पाच वर्षात दुप्पट

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या संपत्तीत       (wealth) पाच…

34 mins ago

डाॅ. पवार, गाेडसेंचा विजय निशि्चत : शिंदे

४० अंशाच्या आसपास तापमानाचा पारा असतानाही कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह पाहता महायुतीच्या दाेन्ही उमेदवारांचा विजय जवळजवळ…

54 mins ago

शिवसेना भाजप महायुतीचा शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल

लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी शिवसेना-भाजप महायुतीतर्फे (BJP alliance ) दिंडोरी मतदार संघासाठी डॉ. भारती पवार आणि…

1 hour ago

शिवसेनेची १५ जागा पदरी पाडून सरशी

लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे…

7 hours ago

अक्रोड खाण्याचे फायदे

अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे…

8 hours ago