व्हिडीओ

महादेव जानकरांच्या प्रचाराला नरेंद्र मोदींचे बळ, गोपीचंद पडळकरांकडूनही हवीय मदत

महादेव जानकर यांनी लोकसभा निवडणुकीची जोरदार हवा केलीय. (Mahadeo Jankar campaign, Narendra Modi,Gopichand Padalkar will participate) परभणी हा मतदारसंघ त्यांच्यासाठी नवीन असला तरी मतदारांच्या हृदयात घुसण्याचा त्यांनी चांगला प्रयत्न केलाय. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार बंडू जाधव यांना जेरीस आणण्याचे प्रयत्न सफल होताना दिसताहेत. महादेव जानकर हा जमिनीवर पाय असलेला माणूस अशी त्यांची ओळख आहे. त्यांचं बोलणंही मोकळं ढाकळं असंच असतं. त्यामुळे सामान्य व भोळ्या भाबड्या जनतेच्या हृदयाला ते लगेचच गवसणी घालतात.
परभणी लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारात सध्या हेच चित्र दिसतंय. विद्यमान खासदार बंडू जाधव यांच्यावर जानकर मिश्किल शब्दांत टीका करताहेत. त्यांच्या या शैलीचा परभणीकरांवर प्रभाव पडताना दिसतोय. त्यामुळं जानकर यांना आता आणखी बळ देण्याची गरज आहे. म्हणूनच नरेंद्र मोदी यांची एक सभा जानकर यांच्या मतदारसंघात लावली जाईल, अशी शक्यता आहे.
नरेंद्र मोदी जिथं जातात, तिथल्या मतदारांवर प्रभाव टाकतात. त्यामुळं मोदींच्या या सभेचा जानकरांना निश्चितच फायदा होईल. देवेंद्र फडणवीस, अजितदादा यांनी यापूर्वीच जानकरांसाठी सभा घेतली होती. आणखीही बऱ्याच सभा होतील. पण जानकर यांचा पट्टशिष्य असलेल्या गोपीचंद पडळकर यांची सभा परभणी मतदारसंघात होणार का ? या विषयी जानकर व पडळकर या दोघांच्याही चाहत्यांमध्ये कुतूहल आहे.
याच कारण असं की, हे दोघंही धनगर समाजातील आहेत. जानकर यांच्यात तालमीत पडळकर तयार झाले आहेत. जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षात पडळकर होते. जानकरांच्या चळवळीत येवूनच पडळकर यांनी राजकारणाची सुरूवात केली. बहुजन, अठरा पगड जातीची जी भाषा जानकर बोलतात तीच भाषा गोपीचंद पडळकर सुद्धा बोलतात. दोघांचाही धनगर व अठरा पगड जातीमध्ये मोठा चाहता वर्ग आहे. पण गेल्या काही वर्षांमध्ये जानकर व पडळकर यांच्यात मतभेद झालेले आहेत. त्यातूनच पडळकर साधारण दहा वर्षांपूर्वी राष्ट्रीय समाज पक्षातून बाहेर पडले. नंतर ते भाजपामध्ये गेले. मधले काही महिने ते वंचित बहुजन आघाडीमध्येही होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भाजपसोबत जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षाची युती होती. जानकर मंत्री सुद्धा होते. या काळात भाजपने पडळकरांना अडगळीतच टाकलं होतं. पण २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांनी जानकर यांना बाजूला सारलं, अन् पडळकर यांना डोक्यावर घेतलं. खरंतर, जानकर आणि पडळकर यांच्यात एकोपा राहू नये याची बहुधा भाजपनंच काळजी घेतलेली असावी.
पण इथं सांगण्याचा मुद्दा हा आहे की, जानकरांच्या मतदारसंघात गोपीचंद पडळकर यांच्या आवर्जून सभा व्हायलाच हव्यात. जानकर व पडळकर यांनी आपापसांतील मतभेद विसरून जोमाने प्रचार केला तर त्याचा फायदा जानकरांनाच होईल. शिवाय जानकर व पडळकर एकत्र आले तर ते त्यांच्या दोघांच्याही चाहत्यांना निश्चित आवडेल.

तुषार खरात

Recent Posts

नाशिक जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला कांदा

जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा,…

14 hours ago

५० हजाराची लाच घेतांना शिक्षणाधिकाऱ्याला अटक

शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक…

1 day ago

‘गाभ’ सिनेमा या दिवशी होणार प्रदर्शित

सध्या अनेक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. वेग-वेगळे विषय घेवून अनेक सिनेमा रिलीज झाले आहेत.…

1 day ago

केंद्रात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार – मंत्री छगन भुजबळ

जगात भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे आज आपला…

1 day ago

नाशिक – दिंडोरीमध्ये भाजप – शिंदे गट संकटात, पत्रकार विक्रांत मते यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडलेला आहे. याच पार्श्वभूमीवर लय भारीची टीम गेले काही दिवस…

1 day ago

पिंपळगावच्या मोदींच्या सभेआधी पाच शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेत ठेवले नजरकैदेत

आज मंगळवारी पिंपळगाव येथे होणाऱ्या जाहीर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत (Modi's rally) खोट्या आश्वासनाबद्दल जाब…

2 days ago