Categories: जागतिक

कोरोना लसीकरण पूर्ण केल्याचा दावा करणाऱ्या देशात आढळला पहिला रुग्ण

टीम लय भारी

इस्रायल : आपल्या देशातील सर्व नागरिकांना करोना प्रतिबंधक लसी देणारा पहिला देश असल्याचा दावा करणाऱ्या इस्रायलमध्ये फ्लोरोना नावाच्या नवीन संकटाने डोकं वर काढलंय. फ्लोरोनाचा अर्थ होतो करोना आणि इन्फ्लूएन्झाचा एकाच वेळी संसर्ग होणे. येथील व्हानेटन्यूज या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार एकाच वेळी करोना आणि इन्फ्लूएन्झाचा संसर्ग झालेली रुग्ण ही एक गरोदर महिला आहे. राबीन मेडिकल सेंटरमध्ये ही महिला उपचार घेत आहे. या महिलेचं लसीकरण झालेलं नसल्याची माहिती समोर आली आहे. या महिलेला करोना आणि इन्फ्लूएन्झा या दोन्हींची लस देण्यात आलेली नाही(First patient found in the country claiming completed vaccination).

इस्रायमधील आरोग्य मंत्रालय अजूनही या प्रकरणाचा तपास करत आहे. या महिलेला फार त्रास होत नसला तरी मध्यम स्वरुपाची लक्षणं तिच्यामाध्ये दिसत आहेत. या दोन्ही विषाणूंचा एकाचवेळी संसर्ग झाल्यास अधिक प्रमाणामध्ये प्रकृती खालावते का?, एकाच वेळी संसर्ग झाल्याने विषाणू अधिक घातक ठरतात का?, या सारख्या गोष्टींचा शोध सध्या संशोधकांकडून घेतला जातोय. आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार यापूर्वीही अनेकांना अशाप्रकारे एकाच वेळी दोन विषाणूंचा संसर्ग झाला असावा मात्र त्याचं निदान न झाल्याने ही प्रकरण उजेडात आली नसतील.

कोरोना पॉझिटिव्ह बहिणीचा धनुभाऊंना काय रिप्लाय?

Omicron: चिंतेतभर; देशात पुन्हा एकदा लॉकडाउन?

मागील वर्षी गरोदर महिलांमध्ये फ्लूची फार प्रकरणं आढळून आली नाहीत, अशी माहिती रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ असणाऱ्या अरनॉन विझिन्टर यांनी दिली. मात्र मागील काही काळापासून फ्लू त्याचबरोबर करोनाचा संसर्ग झालेल्या गरोदर महिलांची संख्या वाढताना दिसत असून ही चिंतेची बाब असल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय.

गरोदर महिला रुग्णालयामध्ये दाखल होताना तिला ताप असेल तर तो नक्की करोनाचा संसर्ग आहे की इन्फ्लूएन्झा याचं निदान लवकर होत नाही. अशावेळेस या महिलांच्या चाचण्या केल्या जातात. यापैकी अनेक महिलांना श्वसनाचाच त्रास असल्याचं डॉक्टर म्हणतात.

महाराष्ट्रातील महाविद्यालये पुन्हा बंद होणार का? शिक्षणमंत्र्यांनी दिले ‘हे’ उत्तर

Israel PM warns of coming Covid-19 ‘storm’

फ्लोरोना हा करोनाचा नवीन व्हेरिएंट नसल्याचं नहल्ला अब्दुल वहाब यांनी हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना म्हटलंय. वहाब हे कायरो युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहेत. फ्लोरोनाचा संसर्ग म्हणजेच एकाचवेळी दोन वेगवेगळ्या विषाणूंचा संसर्ग होणं हे रुग्णाची रोगप्रतिकारशक्ती अगदीच संपलीय किंवा नष्ट झाल्याचं निर्देशित करतं असं डॉक्टर सांगतात. एकाच वेळी दोन विषाणूंचा संसर्ग होत असल्यास रोगप्रतिकारशक्ती अगदी संपल्यात जमा असल्याचं म्हणता येईल अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

इस्रायलमध्ये ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच आता सरकारने आपल्या नागरिकांसाठी चौथ्या डोसची तयारी पूर्ण केली असून लसीकरणाचा सुरुवातही झाल्याची माहिती समोर येत आहे.

Team Lay Bhari

Recent Posts

उन्हाळ्यात ऊसाचा रस पिण्याचे फायदे

उन्हाळा सुरु झालाय तर उन्हाळ्यात आपल्याला काही न काही थंड पियायच असतं  तर त्या साठी…

59 mins ago

नाशिकच्या रस्त्यांवर धावणार 50 इलेक्ट्रिक बस

केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाकडून पीएम ई बस (PM E Bus) या योजनेंर्तग देशातील २० लाखांच्या…

3 hours ago

सेक्स टेप प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस

जेडीएसचे नेते प्रज्वल रेवण्णा (Prajwal Revanna) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. रेवण्णा यांच्या सेक्स टेप…

4 hours ago

नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे १६ कोटीचे धनी

सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या संपुर्ण कुटुंबियांच्या नावे एकूण…

17 hours ago

दिंडोरी लोकसभेच्या उमेदवाराची संपत्ती पाच वर्षात दुप्पट

दिंडोरी लोकसभा (Dindori Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या संपत्तीत  (wealth)…

17 hours ago

डाॅ. पवार, गाेडसेंचा विजय निशि्चत : शिंदे

४० अंशाच्या आसपास तापमानाचा पारा असतानाही कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह पाहता महायुतीच्या दाेन्ही उमेदवारांचा विजय जवळजवळ…

17 hours ago