28.4 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeराजकीयकोरोना पॉझिटिव्ह बहिणीचा धनुभाऊंना काय रिप्लाय?

कोरोना पॉझिटिव्ह बहिणीचा धनुभाऊंना काय रिप्लाय?

टीम लय भारी

बीड : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Outbreak) मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नेत्यांच्या मुलांची लग्न आणि हिवाळी अधिवेशनानंतर (Winter Session) राज्यातील विविध पक्षांचे नेते आणि मंत्री कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनाही दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. त्या सध्या मुंबईतील निवासस्थानीच क्वारंटाईन आहेत. तशी माहिती पंकजा यांनी स्वत: ट्विटरद्वारे दिली आहे. पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याचं समजल्यानंतर त्यांचे बंधू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे, तशी माहिती स्वत: धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.( Pankaja Munde What reply to Dhananjay Munde)

पंकजा मुंडे यांना आपण मेसेज केला आहे. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तेव्हा त्यांनी तब्येत चांगली असल्याचं सांगितलं. मात्र, त्यांना दुसऱ्यांदा कोरोना झाला आहे. पोस्ट कोव्हिड इफेक्ट घातक ठरू शकतात. काळजी घेणं फार गरजेचं आहे.

धनंजय मुंडे इन ऍक्शन मोड! विधानपरिषदेने पुन्हा अनुभवले जुने धनंजय मुंडे!

बीडमध्ये जुगार अड्ड्यावर मध्यरात्री छापा, भाजप जिल्हाध्यक्षांसह 51 जणांवर गुन्हा

नंतरच्या काळात फार त्रास होतो. मी फोन तर नाही करु शकलो, पण काळजी घेतली पाहिजे, हे नक्कीच मी पंकजाताईंना सांगितलं, असं धनंजय मुंडे म्हणाले.

पंकजा मुंडेंना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

यापूर्वी एप्रिल 2021 मध्ये पंकजा मुंडे या कोरोना पॉझिटिव्ह आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी आपली प्रकृती चांगली असून घरीच उपचार सुरु असल्याची माहिती दिली होती. माझ्या कोरोनाचा चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी आधीच सावधगिरी बाळगून स्वत:ला विलग केलं होतं. मी गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बऱ्याच कुटुंबियांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या.

मनेका गांधी जितेंद्र आव्हाडांच्या भेटीला

NCP state president wants attention of high command on Meghalaya

त्याच वेळी कदाचित मला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असेल. त्यामुळे या काळात जे कोणी माझ्या संपर्कात आले आहेत. त्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्यावी. तसेच काळजी घ्या, असं ट्वीट त्यांनी त्यावेळी केलं होतं.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी