शिक्षण

Navi Mumbai Schools : एक सत्र संपलं तरी शाळेत शिक्षकच नाहित! नवी मुंबईत महापालिका शाळेची स्थिती निंदनीय

कोपरखैरणे येथील महानगरपालिकेची सीबीएसई शाळा क्रमांक 94मध्ये , शाळा सुरू होऊन ही गेल्या सहा महिन्यांपासून विद्यार्थी आणि पालक लवकरच शिक्षक उपलब्ध होतील या आशेवर होते. मात्र शाळेचे पहिले सत्र अखेरच्या टप्यात आले असून तरी देखील आद्यप विद्यार्थ्यांना शिक्षकांची प्रतिक्षा करावी लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सोमवारी पालकांनी नवनियुक्त आयुक्तांना निवेदन देऊन लवकरात लवकर शिक्षक नियुक्ती करावी नाहीतर आंदोलनाचा पवित्रा घेण्यात येईल, असा ईशारा निवेदनातून दिला आहे.

कोपरखैरणे येथील महानगरपालिकेच्या सीबीएसई शाळेत 1250 विद्यार्थ्यांमागे केवळ10 शिक्षक आहेत. त्यामुळे विद्यार्थी संख्या जास्त आणि शिक्षक कमी , एका वर्गाला ही एक शिक्षक उपलब्ध होत नसून 100 विद्यार्थ्यांना शिकवावे लागत आहे. शाळा सुरू झाली तेव्हा पासून शिक्षक तेवढेच राहिले मात्र दरवर्षी वर्ग, तुकड्या, पट संख्या वाढत आहे. मागील दोन वर्षांच्या कालावधीत ऑनलाइन शाळा सुरू असल्याने विद्यार्थ्यांना कमी शिक्षकांची अडसर वाटली नाही तसेच शाळा प्रशासनाला आहे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकांची कमतरता भासली नाही, मात्र आता ऑफलाईन शाळा सुरू झाल्यापासून 1250 विद्यार्थ्यांना 10 शिक्षक अपुरेच आहेत.

हे सुद्धा वाचा

Mumbai News : ‘कायदा मोडल्यास…’ दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा

Credit Card : गरजेच्या काळात क्रेडिट कार्ड वापरणे चांगले की वाईट? जाणून घ्या फायदे-तोटे एका क्लिकवर

Mumbai-Kolhapur Flight : अवघ्या ४० मिनीटांत कोल्हापूरातून मुंबईत; बहुप्रतिक्षित विमान सेवा आजपासून सुरू

परिणामी 6 तासांच्याऐवजी शाळा 3 तास भरवली जात असून विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रमच पूर्ण शिकवून होत नसून त्यांच्या इतर ऍक्टिव्हिटीज देखील पूर्णपणे ठप्प असून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासही खुंटत आहे. त्यामुळे अखेर पालकांनी आयुक्तांना निवेदन देऊन लवकरात लवकर ही शिक्षकांची समस्या मार्गी लागावी अन्यथा महापालिका मुख्यालय समोर महापालिका सीबीएसई शाळेचे पालक विना शिक्षकांची शाळा आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून दिला आहे.

दरम्यान, या प्रकरणावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाकडे लक्ष द्यावे अशी विनवणी सध्या पालकांकडून केली जात आहे. आधीच शालेय वर्षातील पहिल्या सत्रात विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसानम झाले असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आता आणखी नुकसान झाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात येण्याचा धोका देखील संभावत आहे.

प्रणव ढमाले

Recent Posts

नाशिकवरील ड्रग – वाईन कॅपिटलचा शिक्का पुसणार,शांतीगिरी महारांजाचा संकल्प

नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात तीन मातब्बर उमेदवार आहेत. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने विद्यमान खासदार हेमंत…

8 mins ago

तळीराम खरे बोलतात; नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदेंविषयी खूपच बोलले !

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दिना पाटील, तर भाजपाकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…

44 mins ago

नाशिक जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला कांदा

जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा,…

24 hours ago

५० हजाराची लाच घेतांना शिक्षणाधिकाऱ्याला अटक

शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक…

2 days ago

‘गाभ’ सिनेमा या दिवशी होणार प्रदर्शित

सध्या अनेक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. वेग-वेगळे विषय घेवून अनेक सिनेमा रिलीज झाले आहेत.…

2 days ago

केंद्रात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार – मंत्री छगन भुजबळ

जगात भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे आज आपला…

2 days ago