31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
HomeमुंबईMumbai News : 'कायदा मोडल्यास...' दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा

Mumbai News : ‘कायदा मोडल्यास…’ दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा

"भाषण करताना कायदा मोडला तर, कायदा आपलं काम करेल, कायद्याच्या चौकटीत राहून भाषणं केली पाहीजेत", असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

“भाषण करताना कायदा मोडला तर, कायदा आपलं काम करेल, कायद्याच्या चौकटीत राहून भाषणं केली पाहीजेत”, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. यंदा शिवसेना आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा मुंबईत होत आहे. या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था नीट राखली जाईल. दोन्ही मेळावे हे शांततेत पार पाडले जातील यासाठी बंदोबस्त ठेवण्यात येईल असेही फडणवीस यावेळी म्हणाले. दोन्हीकडील कार्यकर्ते देखील कायदा सुव्यवस्थेला बाधा येऊ नये यासाठी प्रयत्न करतील असे फडणवीसांनी यावेळी सांगितलं.

शिंदे गटाने बुक केल्या 1700 हून अधिक बसेस
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी तब्बल 1700 हून अधिक एसटी बसेस बुक केल्या आहेत. यासाठी शिंदे गटाने एसटी महामंडळाला तब्बल 10 कोटी रुपये रोख मोजले असल्याची माहीती खात्रिलायक सुत्रांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

Credit Card : गरजेच्या काळात क्रेडिट कार्ड वापरणे चांगले की वाईट? जाणून घ्या फायदे-तोटे एका क्लिकवर

Mumbai-Kolhapur Flight : अवघ्या ४० मिनीटांत कोल्हापूरातून मुंबईत; बहुप्रतिक्षित विमान सेवा आजपासून सुरू

Anil Deshmukh : अखेर 8 महिन्यांनंतर अनिल देशमुखांना जामीन मंजूर! मात्र, आणखी काही दिवसाचा मुक्काम तुरुंगातच

संजय राऊत दसरा मेळाव्याला हजर राहणार का?
उद्या दसरा शिवतिर्थावर शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे. नुकतेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील गटप्रमुखांचा मेळावा घेतला होता. यावेळी संजय राऊत यांची खुर्ची रिकामी ठेवली होती. सध्या पत्राचाळ मनी लाँड्रिंग प्रकरणी राऊत तुरूंगात आहेत. त्यामुळे आता दसरा मेळाव्याच्या आधी राऊत यांना जामीन मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत 10 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. 10 ऑक्टोबरलाच त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार आहे. संजय राऊत हे सध्या आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.

— एकनाथ शिंदेंच्या मेळाव्याला अयोध्येचे साधूसंत
एकनाथ शिंदे यांनी आम्हीच खरे हिंदुत्त्ववादी असून उद्धव ठाकरे यांनी कॉँग्रेस-राष्ट्रवादीशी युती केल्याने आम्ही सत्तेतून बाहेर पडलो असा आरोप केला होता. त्यानंतर अनेकदा शिंदे यांनी हिंदुत्त्वाबाबत भूमिका मांडली. आता दसरा मेळाव्यासाठी शिंदे यांनी थेट अयोध्येच्या साधूसंतांनाच निमंत्रित केले आहे. आम्हीच खरे हिंदुत्त्ववादी असल्याचे शिंदे गट वारंवार सांगत आहे. त्यामुळे आता ठाकरेंना शह देण्यासाठी शिंदे गटाने थेट साधुसंतांनाच दसरा मेळाव्याचे निमंत्रण दिल्याचे सुत्रांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी