30 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रMumbai-Kolhapur Flight : अवघ्या ४० मिनीटांत कोल्हापूरातून मुंबईत; बहुप्रतिक्षित विमान सेवा आजपासून...

Mumbai-Kolhapur Flight : अवघ्या ४० मिनीटांत कोल्हापूरातून मुंबईत; बहुप्रतिक्षित विमान सेवा आजपासून सुरू

कोरोना काळात कोल्हापूर- मुंबई विमानसेवेत खंड पडला. त्यानंतर प्रवाशांनी ही सेवा सुरू करावी यासाठी वारंवार पाठपूरावा केला. त्यानंतर द्योगपती संजय घोडावत यांच्या 'स्टार एअरवेज' या हवाई वाहतूक कंपनीने कोल्हापूर-मुंबई हवाई वाहतूक सेवा आजपासून सुरू केली आहे.

कोरोना काळात कोल्हापूर- मुंबई विमानसेवेत खंड पडला. त्यानंतर प्रवाशांनी ही सेवा सुरू करावी यासाठी वारंवार पाठपूरावा केला. मात्र आता ही सेवा पुर्ववत सुरू झाली असून उद्योगपती संजय घोडावत यांच्या ‘स्टार एअरवेज’ या हवाई वाहतूक कंपनीने कोल्हापूर-मुंबई हवाई वाहतूक सेवा आजपासून सुरू केली आहे. या सेवेचा शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, चंद्रकांत पाटील यांच्या ऑनलाईन उपस्थितीत, तर श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, उद्योगपती संजय घोडावत, खासदार, आमदार आदी जण कोल्हापूर विमानतळावर हा सोहळा पार पडला.

हे सुद्धा वाचा

Anil Deshmukh : अखेर 8 महिन्यांनंतर अनिल देशमुखांना जामीन मंजूर! मात्र, आणखी काही दिवसाचा मुक्काम तुरुंगातच

Health : दररोज आईस्क्रिम खाताय? सावधान! ‘हे’ आहेत त्याचे दुष्परिणाम

Jaya Bachhan : असं काय झालं की अचानक काजोल जया बच्चनवर ओरडली? वाचा सविस्तर

कोल्हापूर-मुंबई विमानसेवेला कोरोनाकाळाच्या आधी पर्यटक विद्यार्थी आणि भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत होता मात्र अचानक बंद झालेल्या विमानसेवेमुळे प्रवाशांचे हाल होत होते. या सेवेमुळे प्रवाशांचा खूप वेळ वाचणार आहे. दरम्यान, स्टार एअरचे पहिले विमान मुंबईहून कोल्हापूरला दाखल झाले यावेळी परंपरेनुसार वॉटर सॅल्यूट देत विमानाचे आणि प्रवाशांचे स्वागत करण्यात आले. मुंबई-कोल्हापूर-मुंबई विमानसेवा आठवड्यातील मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी ही विमानसेवा असणार आहे. हा प्रवास अवघ्या ४० मिनिटाचा असणार आहे. कोल्हापूर ते मुंबईसाठी २ हजार ५७३ रुपये इतका तिकीट दर असणार आहे. या विमानसेवेमुळे कोल्हापूर- मुंबई असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे.

‘खूप दिवसापासूनचे स्वप्न होते’
संजय घोडावत ग्रुपचे ही विमानसेवा सुरु झाली असून याबाबत बोलताना संजय घोडावत म्हणाले कोल्हापूर मुंबई हे विमानसेवा सुरु करण्याचे माझे खूप दिवसापासूनचे स्वप्न होते.आता ही सेवा सुरू झाली असून भविष्यात स्टार एयर मार्फत कोल्हापूरला आणखी वेगवेगळ्या शहरांशी जोडण्यात येणार असल्याचे संजय घोडावत यांनी म्हटले आहे.

दरनम्यान, आता पुन्हा एकदा सुरू झालेल्या या विमानसेवेमुळे अनेक प्रवाशांचे होणारे हाल कमी होणार आहेत. अनेकांनी यामुळे सुटकेचा निश्वासदेखील सोडला आहे. विशेष म्हणजे आजकालच्या धकाधकीच्या जगात वेळेचे महत्त्व मोठ्या प्रनमाणावर वाढले आहे. त्यामुले प्रवासातील वेळ वाचावा यासाठी अनेकदा सामान्य नागरिक सुद्धा आंतरराज्य वाहतुकीसाठी देखील विमानसेवेचा वापर करताना दिसतात. त्यामुळे अशा प्रवाशांसाठी निश्चितच ही आनंदाची बातमी ठरणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी