व्यापार-पैसा

काय सांगता ! आता मोबाईल इंटरनेट आणि OTT सबस्क्रिप्शन मिळणार फुकटं

आजकाल संपूर्ण जग इंटरनेटच्या जाळ्यात अडकलेले आहे. विशेष म्हणजे आजच्या काळात प्रत्येकाकडे स्मार्टफोन उपलब्ध असतो आणि त्या स्मार्टफोनमध्ये इंटरनेट सुविधा उपलब्ध असते. या इंटरनेटच्या वाढत्या युझर्समुळे सध्या इंटरनेट चार्जेसची किंमतही वाझत असल्याचे पाहायला मिळत असते. अनेकदा हे इटरनेट चार्जेस आणि मोबाईल रिचार्ज करणे सर्वसामान्यांना परवडणारे नसते. यामुळे आज या लेखातून आम्ही तुम्हाला इंटरनेट सुविधा आणि ओटीटी ऍप्समधील सिनेमे आणि व्हिडिओज विना सबस्क्रिप्शन कसे पाहता येतील याबाबत माहिती देणार आहोत.

शुगरबॉक्स ही ओपन क्लाउड सेवा आहे, जी दुर्गम भागात इंटरनेट सेवा पुरवण्याचे काम करते. ही ऍप सर्वोत्तम सेवा आहे. ज्यामध्ये तुम्ही OTT ऍप्सचा मोफत आनंद घेऊ शकता. शुगरबॉक्स एक Android आणि iOS ऍप आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही इंटरनेटशिवाय OTT ऍप्स वापरू शकता. तसेच, खरेदीपासून ते इतर ऑनलाइन सेवांचा वापर करता येईल.

हे सुद्धा वाचा

धक्कादायक : ठाण्यात भाजपचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न

जसप्रीत बुमराह वर्ल्डकप खेळणार? मोठी अपडेट आली समोर

देवस्थानच्या जमिनी हडप करण्यात आल्याचा जयंत पाटील यांचा आरोप

कसे वापरायचे
Apple App Store आणि Google Play Store वरून SugarBox ऍप डाउनलोड करावे लागेल.
यानंतर मोबाईल फोनची इंटरनेट कनेक्टिव्हिटी बंद करावी लागते.
त्यानंतर तुम्हाला शुगरबॉक्स ऍपची वाय-फाय कनेक्टिव्हिटी चालू करावी लागेल.
यानंतर शुगरबॉक्सला वाय-फायशी जोडावे लागेल.
यानंतर तुम्ही उच्च दर्जाचे संगीत आणि शोचा मोफत आनंद घेऊ शकाल.
हे ऍप स्मार्ट टीव्ही, लॅपटॉपवर वापरता येईल.

मोफत वाय-फाय चालवता येईल
शुगरबॉक्स वाय-फाय सेवेचा वापर कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे केला जात आहे. यात हायपरलोकल एज क्लाउड टेक्नॉलॉजी सोल्यूशन प्रदान केले जाईल. ही सेवा देशात सुरू करण्यात आली आहे. या वाय-फायची रेंज 100 मीटर आहे. यामुळे यूजर्स इंटरनेटशिवाय OTT ऍप्सचा आनंद घेऊ शकतील. तसेच, या सेवेच्या मदतीने तुम्ही गेमिंग आणि सोशल मीडियाचा आनंद घेऊ शकाल.

फ्लाइट कनेक्टिव्हिटीमध्ये मिळेल
अनेक ग्रामीण भागात ही सेवा सुरू करण्यात आली आहे. तसेच, इन-फ्लाइट सेवा दिली जात आहे. यामुळे तुम्हाला हजारो फूट उंचीवर खेडेगावात आणि उड्डाणात इंटरनेट सेवेचा आनंद घेता येणार आहे. तसेच, डोंगराळ भागांसाठी ही एक उत्तम सेवा असू शकते. ही सेवा शिक्षण क्षेत्रासाठी उत्कृष्ट ठरू शकते.

प्रणव ढमाले

Recent Posts

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

8 hours ago

नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट

सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…

8 hours ago

उद्धव ठाकरे तर मानसिक आजारी आहेत : चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरे यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले आहेत, घाबरलेले…

8 hours ago

मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…

9 hours ago

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

11 hours ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…

11 hours ago