यंदाचे IPL क्रिकेटसोबतच वादामुळे जास्तच गाजत आहे. मग ते सामना सुरू असताना प्रेक्षकांमध्ये झालेली तुफान हाणामारी असो वा विराट गौतमचे जोरदार भांडण असो, सामन्यापेक्षा जास्त ह्याचीच चर्चा झाली आहे. भारतीय क्रिकेटसाठी ही चांगली गोष्ट कधाीच नसावी. दरम्यान काल जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यामध्ये लढत रंगली होती. हा सामना हैदराबादने राजस्थानावर लास्ट बॉलवर मिळवलेल्या विजयामुळे क्रिकेटप्रेमींच्या कायम लक्षात राहीलच; तथापि अत्यंत घृणास्पद क्षण म्हणजे सामन्यादरम्यान RR आणि SRH च्या चिअरलीडर्सचा छळ झाला, हे सुद्धा न विसरता येण्यासारखे आहे. मैदानावर आलेल्या काही बेशिस्त प्रेक्षकांनी चिअरलीडर्स बद्दल अभद्र भाषेचा वापर केला. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता समाजस्तरातून टिका करण्यात येत आहे.
आयपीएलमध्ये चिअरलीडर्स यांची देखील मुख्य भुमिका असते, चालु सामन्यात रंगत भरण्याचे ते काम करतात. प्रत्येक फोर, सिक्स नंतर ते त्यांच नृत्य कौशल्य दाखवून, आयपीएलला ग्लॅमर आणण्यात या चिअर लीडर्सचा महत्वाचा रोल असतो. मात्र स्टेडियममध्ये प्रेक्षकांकडून चिअरलीडर्सबद्दल कशी अभद्र भाषा वापरली गेली. हा कामाच्या ठिकाणी छळाचाच प्रकार आहे, अशा प्रतिक्रीया आता समाजस्तरातून उमटत आहेत. दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटीझन्सनी अशी भाषा करणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला तात्काळ स्टेडियममधून बाहेर हाकलून देण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
चिअरलिडर्सवर बंदी?
सदर प्रकरणानंतर चिअरलीडर्स ही कनसेप्ट आयपीएलमध्ये बंद करावी अशी काही जणांनी मागणी केली आहे. आयपीएलमध्ये चिअरलीडर्सचा छळ होण्याची ही पहिली वेळ नाहीय. मागच्या सीजनमध्ये काही खेळाडूसुद्धा यात सहभागी होते. कोविड 19 मुळे चिअरलीडर्सवर बंदी होती. नियम शिथिल झाल्यानंतर पुन्हा दोन वर्षांनी आयपीएलमध्ये चिअरलीडर्स दिसतायत. त्यामुळे आता पुन्हा चिअरलिडर्सवर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे.
हे सुद्धा वाचा:
IPL 2023: विराट कोहली गौतम गंभीर यांचा हाय व्होल्टेज ड्रामा; व्हिडीओ व्हायरल
IPL 2023 : SRH vs DC सामन्यादरम्यान चाहत्यांमध्ये तुफान हाणामारी; Video Viral
IPL 2023: लाइव्ह मॅचमध्ये कोहलीची गांगुलीला खुन्नस; हस्तांदोलनही टाळले!
सामन्याबाबत सांगायचे झाले तर, राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबादमध्ये काल आयपीएलमधला रोमांचक सामना झाला. राजस्थानने शेवटच्या चेंडूवर सामना गमावला. या मॅचमध्ये अब्दुल समदने लास्ट बॉलवर सिक्स मारुन हैदराबादला विजय मिळवून दिला. या सामन्याचा निकाल दीर्घकाळ प्रेक्षकांच्या लक्षात राहिल. राजस्थानने विजयासाठी दिलेलं 215 धावांच टार्गेट हैदराबादने शेवटच्या चेंडूवर सिक्स मारुन पार केलं. लास्ट बॉलवर सिक्स मारणारा अब्दुल समद हैदराबादच्या विजयाचा हिरो ठरला.
IPL 2023 Cheerleaders, IPL 2023, Virat Kohli, Gautam Gambhir, RR vs SRH, IPL 2023: IPL Cheerleaders harassed at Jaipur Stadium RR vs SRH match; video viral, IPL 2023 Cheerleaders harassed
सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या संपुर्ण कुटुंबियांच्या नावे एकूण…
दिंडोरी लोकसभा (Dindori Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या संपत्तीत (wealth)…
४० अंशाच्या आसपास तापमानाचा पारा असतानाही कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह पाहता महायुतीच्या दाेन्ही उमेदवारांचा विजय जवळजवळ…
लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी शिवसेना-भाजप महायुतीतर्फे (BJP alliance ) दिंडोरी मतदार संघासाठी डॉ. भारती पवार आणि…
लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे…
अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे…