महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने होणार्या राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी, नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना – एन डी सी ए – तर्फे खुल्या गटातील महिला क्रिकेट खेळाडूंसाठी जिल्हा संघ निवड चाचणी रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब येथे घेण्यात येणार आहे. तरी इच्छुक महिला खेळाडूंनी नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथील कार्यालयात कामकाजाच्या वेळेत – सकाळी ८.३० ते १०.३० व संध्याकाळी ४.०० ते ६.३० पर्यंत – ९ मार्च पर्यंत आपली नावे नोंदवावीत.मुली व महिला खेळाडूंना उत्तेजन देण्याच्या नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या धोरणानुसार नोंदणी शुल्क ठेवण्यात आलेले नाही.
नावे नोंदविलेल्या खेळाडूंनी क्रिकेट पोशाखात स्वतःच्या क्रिकेट साहित्यासह रविवार दिनांक १० मार्च रोजी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर सकाळी नऊ वाजता हजर रहावे.
निवड झालेल्या खेळाडूंना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय आमंत्रितांच्या स्पर्धेत नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल.
मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole )…
शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…
व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ (Malhar) या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचे…
त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.यामुळे देशभरातून रोज हजारो भाविक त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांची…
लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. देशभरात 49 जागांवर मतदान होणार आहे.…