30 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeक्रिकेटनाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे महिला क्रिकेट खेळाडूंसाठी जिल्हा संघ निवड चाचणी

नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे महिला क्रिकेट खेळाडूंसाठी जिल्हा संघ निवड चाचणी

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने होणार्‍या राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी, नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना - एन डी सी ए - तर्फे खुल्या गटातील महिला क्रिकेट खेळाडूंसाठी जिल्हा संघ निवड चाचणी रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब येथे घेण्यात येणार आहे. तरी इच्छुक महिला खेळाडूंनी नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथील कार्यालयात कामकाजाच्या वेळेत - सकाळी ८.३० ते १०.३० व संध्याकाळी ४.०० ते ६.३० पर्यंत - ९ मार्च पर्यंत आपली नावे नोंदवावीत.मुली व महिला खेळाडूंना उत्तेजन देण्याच्या नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या धोरणानुसार नोंदणी शुल्क ठेवण्यात आलेले नाही.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने होणार्‍या राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी, नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना – एन डी सी ए – तर्फे खुल्या गटातील महिला क्रिकेट खेळाडूंसाठी जिल्हा संघ निवड चाचणी रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब येथे घेण्यात येणार आहे. तरी इच्छुक महिला खेळाडूंनी नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथील कार्यालयात कामकाजाच्या वेळेत – सकाळी ८.३० ते १०.३० व संध्याकाळी ४.०० ते ६.३० पर्यंत – ९ मार्च पर्यंत आपली नावे नोंदवावीत.मुली व महिला खेळाडूंना उत्तेजन देण्याच्या नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या धोरणानुसार नोंदणी शुल्क ठेवण्यात आलेले नाही.

नावे नोंदविलेल्या खेळाडूंनी क्रिकेट पोशाखात स्वतःच्या क्रिकेट साहित्यासह रविवार दिनांक १० मार्च रोजी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर सकाळी नऊ वाजता हजर रहावे.

निवड झालेल्या खेळाडूंना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय आमंत्रितांच्या स्पर्धेत नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी