क्राईम

योगी सरकारचा अ‍ॅक्शन मोड : गँगस्टर बंधूंच्या हत्येनंतर यूपीत कलम 144 लागू; इंटरनेट बंद, 17 पोलिसांचे निलंबन!

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे माफिया डॉन अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ, यांची तीन जणांनी गोळ्या झाडून हत्या केली. विशेष म्हणजे हे दोघेही पोलिस संरक्षणात मेडिकलसाठी जात असताना हा संपूर्ण थरार घडला. यानंतर, हल्ला करणाऱ्या तिघांनीही सरेंडर केले असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. हल्ला करणाऱ्या या तिघांची नावे, लवलेश, सन्नी आणि अरुण असल्याचे बोलले जात आहे. तसेच पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेचा व्हिडिओदेखील सोशल मिडियावर जबदस्त व्हायरल होत आहे. यात अतीक आणि अश्रफ माध्यम प्रतिनिधींसोबत बोलताना दिसत आहे. याच दरम्यान त्यांच्यावर हल्ला होतो. दरम्यान, हल्ला करणारे तीनही तरुण माध्यम प्रतिनिधी बनून आले होते, असे बोलले जात आहे.

ज्या प्रयागराज जिल्ह्यात ही हत्या झाली, तेथे हाय अलर्ट असून रॅपिड अॅक्शन फोर्स (RAF) सह अतिरिक्त फौजा जवळपासच्या जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान सुरक्षेच्या, कारणास्तव उत्तर प्रदेशातील सर्व 75 जिल्ह्यांमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. काही ठिकाणी दगडफेक झाल्याचेही वृत्त आहे. घटनास्थळी पोलिसांची गस्त सुरू असून, पोलिसांकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हत्येनंतर 17 पोलिसांचे निलंबन

प्रयागराजमध्ये माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या हत्येप्रकरणी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठी कारवाई करत 17 पोलिसांचे निलंबन केले आहे. हे सर्व पोलीस अतिक अहमदच्या सुरक्षेत तैनात होते. सीएम योगी यांनी हत्येच्या तपासासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. यावेळी विशेष डीजी एलओ प्रशांत कुमार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी उपस्थित होते. डीजीपी आरके विश्वकर्मा, विशेष डीजी कायदा आणि सुव्यवस्था प्रशांत कुमार, प्रधान सचिव गृह संजय प्रसाद आणि इतर अधिकारीही उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा: 

माफिया आतीक अहमद आणि अशरफची गोळ्या घालून हत्या

एन्काऊंटरनंतर सोशल मीडियावर योगी बाबा, उत्तर प्रदेश पोलिस ट्रेंडिंग

योगींनी उत्तरप्रदेशसाठी मुंबईतून ५ लाख कोटी नेले!

Atiq-Ashraf shot dead 17 police suspended up govt imposes section 144 sec, Yogi government, Section 144 imposed in UP, murder of gangster brothers Atiq-Ashraf, 17 policemen suspended!

 

Team Lay Bhari

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

6 hours ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

6 hours ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

7 hours ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

6 days ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

1 week ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

1 week ago