28.9 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeमुंबईयोगींनी उत्तरप्रदेशसाठी मुंबईतून ५ लाख कोटी नेले!

योगींनी उत्तरप्रदेशसाठी मुंबईतून ५ लाख कोटी नेले!

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी गुरुवारी मुंबईत रोडशो आयोजित केला होता. यावेळी आदित्यनाथ यांनी मुंबईतील (Mumbai) उद्योगपती आणि व्यावसायिकांना लखनौमध्ये १० आणि १२ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या “उत्तरप्रदेश आंतरराष्ट्रीय गुंतवणूक परिषदेचे” (Uttar Pradesh Global Investment Council) निमंत्रण दिले. उत्तरप्रदेशमध्ये गुंतवणूक केल्यास त्यांना सर्व प्रकारच्या मूलभूत सुविधा पुरविण्याचे आश्वासनही यावेळी त्यांनी दिले.आदित्यनाथ यांनी आपल्या दौऱ्यादरम्यान मुंबईतील नामवंत उद्योगपती, दिग्गज निर्माते, दिग्दर्शक, आघाडीचे बँकर्स, प्रसिद्ध अभिनेते यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या या दौऱ्यावर विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली, शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आदित्यनाथ यांच्या रोडशोवर प्रचंड आगपाखड केली होती. (Yogi Adityanath took 5 lakh crore investment from Mumbai for Uttar Pradesh!)

योगी महाराज उद्योगपतींना आकर्षित करण्याच्या नावाखाली मुंबईत भाजप पुरस्कृत राजकीय खेळ करीत असल्याची जहरी टीका राऊत यांनी केली होती. मात्र आदित्यनाथ यांचा हा दौरा उत्तरप्रदेशसाठी औद्यगिकदृष्ट्या आणि व्यायसायिकदृष्ट्या फायदेशीर ठरला असून मुंबईतून परतताना आदित्यनाथ उत्तरप्रदेशासाठी ५ लाख कोटींची गुंतवणूक घेऊन गेले आहेत. राजकीयदृष्ट्या योगींचा हा दौरा कितपत फायदेशीर ठरतो हे येणारा काळच ठरवेल, अशी प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.

उत्तरप्रदेश सरकारने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव घेऊन उत्तरप्रदेशला परतले आहेत. रिलायन्सचे मुकेश अंबानी यांनी इलेक्ट्रॉनिक निर्मिती, हरित ऊर्जा क्षेत्रात गुंतवणुकीचा प्रस्ताव दिला आहे. तसेच उत्तरप्रदेशमध्ये ५ जी इंटरनेटचे जाळे उभारणार असून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने राज्यातील ग्रामीण भागात चांगल्या वैद्यकीय सेवा देण्याचा मोठा प्रस्ताव अंबानी यांनी दिल्याचेही या पत्रकात म्हंटले आहे. दरम्यान, अदानी समूहामार्फतही राज्यात मोठी गुंतवणूक करण्यात येणार आहे. बल्लीआ आणि श्रावस्ती येथे वैद्यकीय महाविद्यालय तसेच नोएडा येथे कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येणार आहे. तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या सर्वच शहरांमध्ये विमानसेवा सुरु करणार असल्याची घोषणा “टाटा सन्स”ने केली आहे. लोढा ग्रुपमार्फत अयोध्या, वाराणसी आणि गोरखपूरमध्ये मोठे गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात येणार असून यामध्ये ३ हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. “रामकी ग्रुप” कानपूर आणि लखनौमध्ये “सॅटेलाईट सिटी” उभारणार आहे. तर पारले अग्रोमार्फत ५०० कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असल्याची माहिती या पत्रकात दिली आहे.

हे सुद्धा वाचा

उर्फी सोबत महिला आयोगसुद्धा बेफाम झालाय का…; चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

आडमुठ्या बिल्डरला २१ लाखाचा दंड, महापालिकेची कारवाई !

छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज नसते तर महाराष्ट्रात हिंदूच उरले नसते : देवेंद्र फडणवीस

या दौऱ्यादरम्यान आदित्यनाथ यांनी “रिलायन्स इंडस्ट्रीज”चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी, “पिरामल ग्रुप”चे अध्यक्ष अजय गोपीकिशन पिरामल, “वेदांता ग्रुप”चे अनिल अगरवाल, “टाटा कंपनी”चे नटराजन चंद्रशेखरन “टॉरेन्ट पॉवर”चे व्यवस्थापकीय संचालक जिंदाल मेहता, “पारले ऍग्रो ग्रुप”चे अध्यक्ष प्रकाश चौहान, “अदानी पोर्ट्स अँड एसईझेड लिमिटेड”चे मुख्य कार्यकारी अधिकारी करण अदानी या दिग्गज उद्योगपतींशी चर्चा केली.

उद्योजकांनो उत्तरप्रदेशमध्ये या!
योगी आदित्यनाथ यांनी गुंतवणूकदारांना राज्यात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले असून सुरक्षेची हमी दिली आहे. ते म्हणाले, “तुम्ही पाहिलंच असेल की, २०१७ पूर्वी राज्यात सतत कुठेनाकुठे दंगली होत होत्या. पण आता उत्तरप्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती सुधारली आहे. आम्ही भूमाफिया विरोधी कृती दल स्थापन केले असून भूमाफियांच्या तावडीतून ६४ हजार हेक्टर जमीन सोडविण्यात आली आहे”.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी