क्राईम

नातवाने केली घरातच चोरी; शौक भागविण्यासाठी आजीचे दागिने लांबविले

म्हसरुळ पाेलीसांच्या हद्दीत दाेन महिन्यांपूर्वी घडलेल्या एका क्लिष्ट चाेरीचा गुन्हा उघड करण्यात पाेलीसांना यश आले आहे. यात धक्कादायक बाब म्हणजे झालेली चाेरीची ही घटना बाहेरील चाेरट्यांनी नव्हे, तर चाेरी झाल्याची तक्रार दिलेल्या आजीच्या (Grandma’s jewelry_) अल्पवयीन नातवानेच केल्याचे उघड झाले. चाेरीच्या मुद्देमालातून या नातवाने साेने वितळवून देणाऱ्या मित्राच्या मदतीने दाेन चारचाकी कार, माेबाईल हँन्डसेट खरेदी करुन उधळपट्टी केल्याचे समाेर आले आहे. याप्रकरणात साेने वितळविणाऱ्या संशयित प्रितेश उर्फ विशाल शिंगाडे याला अटक करण्यात आली आहे.(Grandson steals from home; Grandma’s jewelry lengthened to satisfy her hobby)

मखमलाबाद राेडवरील शांतीनगर बसस्टाॅपजवळील पार्थ नगरात ६६ वर्षीय महिला कुटुंबासह राहते. तिच्या घरातून डिसेंबर २०२३ ते ३ फेब्रुवारी २०२४ या तीन महिन्यांच्या कालावधीत उघड्या घरातून कुणीतरी दाेन लाख २३ हजारांचे साेन्याचे दागिने चाेरी केले हाेते. त्यामुळे या महिलेने म्हसरुळ पाेलीसांत फिर्याद नाेंदविली हाेती. तसेच वरील कालावधीत महिलेस घरातील साेफासेट, दिवानाची गादी पिंजायची असल्याने तिने तेव्हा रस्त्याने जाणाऱ्या पिंजारी व्यावसायिकास बाेलावून गादी पिंजून घेतली हाेती. त्यामुळे महिलेने या चाेरीचा संशय पिंजारीवर घेत त्याच्या नावाची तक्रार दिली. त्यामुळे पाेलीसांनी गुन्हा उघड हाेण्यासाठी पिंजाऱ्याचा छडा लावून त्याची घरझडती घेतली. पण, घरात संशयास्पद काहीच आढळून न आल्याने त्याची सुटका केली.

तपास सुरु असतांना सीसीटीव्ही फूटेज व महिला आणि तिच्या कुटुंबाकडे चाैकशी करण्यात आली. तेव्हा विविध बाबींना चालना मिळत गेली. त्यात महिलेच्या साेळा वर्षीय नातवाकडे संशयाची सुई वळली. वरिष्ठ पाेलीस निरीक्षक सुभाष ढवळे यांच्या निर्देशाने उपनिरीक्षक उद्धव हाके, दीपक पटारे, हवालदार सदानंद फुगे, प्रशांत देवरे यांनी या मुलास विश्वासात घेऊन चाैकशी केली असता, त्याने कबुली देत प्रितेश तानाजी शिंगाडे (रा. ओम् नगर, विद्यानदरजवळ, पंचवटी) याचे नाव सांगितले. घरातून आजी व आईचे चाेरलेले साेन्याचे दागिने अल्पवयीन नातवाने शिंगाडे याला दिले. शिंगाडेने ते अवैधरित्या वितळवून बनविलेल्या लगड विकल्या. मिळालेल्या ‘कॅश’मधून अल्पवयीन मुलासह शिंगाडे व त्याच्या साथीदारांनी दाेन कार, माेबाईल खरेदी करत माैजमस्ती केली.

अल्पवयीन मुलगा व शिंगाडेची ओळख कशी झाली, याचा तपास सुरु असून शिंगाडे व त्याच्या अन्य दाेन ते तीन साथीदारांचा सहभाग उघड हाेताे आहे. या साथीदारांवर चाेरी व इतर गुन्हे नाेंद असल्याचे समाेर आले असून त्यांचा शाेध सुरु आहे. या अल्पवयीनासह टाेळीने चाेरीचा हा प्लॅन आखून केवळ शाैक, माैजमजेसाठी पैसे उधळले आहेत. नातवाच्या या करामतीने कुटुंब अजूनही सावरलेले नाही. संगतीमुळे हा मुलगा वाम मार्गाला गेल्याचे पाेलीसांनी सांगितले.

टीम लय भारी

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

11 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

13 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

14 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

15 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

15 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

16 hours ago