क्राईम

गंगापूर रोडवर हुक्का पार्लरचा अड्डा उध्वस्त; ११ जणांविरोधात गुन्हा दाखल

गंगापूर हददीमध्ये काही हॉटेल्समध्ये चोरीछुपे हुक्का पार्लर (Hookah parlour) चालविला जात असल्याची नेहमीच चर्चा होते. परंतु पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत असे. मात्र, शहर गुन्हेशाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने सावरगाव रस्त्यावरील बरॅको हॉटेलवर छापा टाकून तेथे बिनधास्तपणे सुरू असलेला हुक्का पार्लर उदध्वस्त केला आहे. या कारवाईत पथकाने सुमारे १० हजारांचे साहित्य जप्त करीत ११ संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अंमली पदार्थांविरोधात धडक कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अंमलदार बाळासाहेब नांद्रे यांना बरॅको हॉटेलमध्ये चोरीछुपे हुक्का पार्लर चालविला जात असल्याची खबर मिळाली होती.(Hookah parlour den destroyed on Gangapur Road; Case registered against 11)

पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांना माहिती दिल्यानंतर, त्यानुसार, पथकाने पहाटेच्या सुमारास सावरगाव रोडवरील बरॅको हॉटेलवर छापा टाकला.हॉटेलमध्ये चालणारा हुक्का पार्लरचा अड्डा गंगापूर पोलीसांनी उदध्वस्त केला. या प्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकाचे अंमलदार बाळासाहेब नांदे्र यांनी फिर्याद दिली आहे. सावरगावरोडवरील बरॅको हॉटेलमध्ये बेकायदा हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार रविवारी (दि.२१) दुपारच्या सुमारास छापा टाकला. हॉटेलचे मॅनेजर प्रशांत देवेंद्र खिल्लर (वय ३०), वेटर राहूल रमेश साळवे (वय २१) हे सावरगाव रोडवरील बराको हॉटेल मध्ये स्मोकिंग झोन नसलेल्या ठिकाणी विना परवाना बेकायदेशीर हुक्का पार्लर चालवत होते.

पोलिसांनी छापा टाकला तेव्हा साहिल जिभाऊ सोनवणे (रा.सटाणा), प्रतिक रमेश आहेर ,आशितोष रोजश पगारे, शुभम सुनिल पवार (तिघे रा. शिवशक्तीनगर जेलरोड), विशाल रमेश देशपांडे (रा.काळेनगर,गंगापूररोड), विशाल विजय व्हिजन (रा.बळवंतनगर,गंगापूररोड), निखील सुभाष पाटील (रा.नवीन पंडीत कॉलनी,),संदिप दिनेश खंडेलवाल (रा.विकास कॉलनी,त्र्यंबकरोड) व पुरूषोत्तम इश्वरदास उबराणी (रा.रामेश्वरनगर गंगापूररोड) हे हॉटेलमध्ये प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करताना आढळून आले.

या ठिकाणाहून हुक्का पॉट व वेगवेगळया फ्लेवरची तंबाखू असा सुमारे १० हजार ८०० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून अधिक तपास हवालदार रविंद्र मोहिते करीत आहेत. याप्रकरणी ११ जणांविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हुक्का पार्लरची कारवाई झाल्यानंतर हॉटेलचालकांवर गुन्हा दाखल केला जातो. त्यामुळे हुक्का ओढणारे सहीसलामत सुटून जातात. मात्र या गुन्ह्यात हॉटेलचा मॅनेजर व वेटरसह हुक्का ओढणार्याविरोधातही गुन्हा दाखल करीत त्यांनाही चांगलाच दणका दिला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे अशा प्रकारांना चाप बसण्याची शक्यता आहे.

टीम लय भारी

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

10 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

11 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

11 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

11 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

12 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

14 hours ago