व्हिडीओ

भाजपचे दलाल निवडणुक आधीच विजयी, लोकशाहीचं वस्त्रहरण

भाजपचे दलाल निवडणुकीत कसा विजय मिळवतात(How do BJP win elections), याचं आश्चर्य सगळ्यांनाच वाटत आहे. हा दलाल पॅटर्न सुरतमध्ये पाहायला मिळायला. सुरत लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार मुकेश दलाल यांचा विजय झालाय. त्यांनी आपल्या आडनावाला शोभेल असं काम करून दाखवलंय. मुकेश दलाल यांच्या विरोधात तब्बल १० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. सगळ्यांनी निवडणूक अर्ज भरले होते. पण कॉंग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभाणी यांचा अर्ज छानणीमध्ये बाद झाला. त्यानंतरही नऊ उमेदवार उरले होते. यातील एकेका उमेदवाराने अर्ज मागे घेतले. बसपाचे उमेदवार प्यारेलाल भारती आणि मुकेश दलाल या दोघांमध्ये लढत होईल, असं वाटलं होतं. पण झालं भलतंच. प्यारेलाल भारती यांनीही अर्ज मागे घेतला. विशेष म्हणजे, काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभाणी यांचा अर्ज बाद झाल्यानंतर पक्षाचे डमी उमेदवार सुरेश पडसाला यांचाही अर्ज बाद करण्यात आला. काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभाणी यांच्या उमेदवारी अर्जावर चार जणांच्या स्वाक्षरी होत्या. त्यापैकी तिघांनी या स्वाक्षरी आपल्या नसल्याचं प्रतिज्ञापत्र भरून दिलं. विशेष म्हणजे, यातील एकजण कुंभाणी यांचा जावई तर दुसरा पुतण्या आहे. असं असताना तिसरे समर्थक हे कुंभाणी यांचे व्यावसायिक पार्टनर आहेत. आता हे तिघेजण सुद्धा संपर्कात नाहीत. त्यांचं अपहरण झाल्याचा आरोप केला जातोय. आपच्या उमेदवारांचंही अपहरण केलं गेलंय. दलाल यांनी अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांना पैसे दिले आहेत, असा आरोप होवू लागलाय. दरम्यान, दोन उमेदवारांचे अर्ज बाद करणं, समर्थकांना सह्या खोट्या आहेत, असं बोलायला लावणं. उरलेल्या अन्य आठ – नऊ उमेदवारांना अर्ज मागे घ्यायला लावणं. त्यानंतर समर्थक व उमेदवार गायब असणं हे सगळं प्रकरण संशयास्पद आणि धक्कादायक असंच आहे. मुळातच सुरत ही मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. तिथं खरेदीविक्रीचे मोठे व्यवहार होत असतात. पण लोकशाहीतील पवित्र सण असलेल्या निवडणुकीतच झालेला हा प्रकार लोकशाहीचं वस्त्रहरण करणारा असाच आहे. दलालांनी जे घडवून आणलं त्यावरून भाजप भविष्यात काय काय करेल याची ही छोटीशी झलक असल्याचंच दिसतंय.

तुषार खरात

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

11 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

12 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

12 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

13 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

13 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

15 hours ago