27.8 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeक्राईमगंगापूर रोडवर हुक्का पार्लरचा अड्डा उध्वस्त; ११ जणांविरोधात गुन्हा दाखल

गंगापूर रोडवर हुक्का पार्लरचा अड्डा उध्वस्त; ११ जणांविरोधात गुन्हा दाखल

गंगापूर हददीमध्ये काही हॉटेल्समध्ये चोरीछुपे हुक्का पार्लर चालविला जात असल्याची नेहमीच चर्चा होते. परंतु पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत असे. मात्र, शहर गुन्हेशाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने सावरगाव रस्त्यावरील बरॅको हॉटेलवर छापा टाकून तेथे बिनधास्तपणे सुरू असलेला हुक्का पार्लर उदध्वस्त केला आहे. या कारवाईत पथकाने सुमारे १० हजारांचे साहित्य जप्त करीत ११ संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अंमली पदार्थांविरोधात धडक कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अंमलदार बाळासाहेब नांद्रे यांना बरॅको हॉटेलमध्ये चोरीछुपे हुक्का पार्लर चालविला जात असल्याची खबर मिळाली होती.

गंगापूर हददीमध्ये काही हॉटेल्समध्ये चोरीछुपे हुक्का पार्लर (Hookah parlour) चालविला जात असल्याची नेहमीच चर्चा होते. परंतु पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत असे. मात्र, शहर गुन्हेशाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने सावरगाव रस्त्यावरील बरॅको हॉटेलवर छापा टाकून तेथे बिनधास्तपणे सुरू असलेला हुक्का पार्लर उदध्वस्त केला आहे. या कारवाईत पथकाने सुमारे १० हजारांचे साहित्य जप्त करीत ११ संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अंमली पदार्थांविरोधात धडक कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अंमलदार बाळासाहेब नांद्रे यांना बरॅको हॉटेलमध्ये चोरीछुपे हुक्का पार्लर चालविला जात असल्याची खबर मिळाली होती.(Hookah parlour den destroyed on Gangapur Road; Case registered against 11)

पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांना माहिती दिल्यानंतर, त्यानुसार, पथकाने पहाटेच्या सुमारास सावरगाव रोडवरील बरॅको हॉटेलवर छापा टाकला.हॉटेलमध्ये चालणारा हुक्का पार्लरचा अड्डा गंगापूर पोलीसांनी उदध्वस्त केला. या प्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकाचे अंमलदार बाळासाहेब नांदे्र यांनी फिर्याद दिली आहे. सावरगावरोडवरील बरॅको हॉटेलमध्ये बेकायदा हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार रविवारी (दि.२१) दुपारच्या सुमारास छापा टाकला. हॉटेलचे मॅनेजर प्रशांत देवेंद्र खिल्लर (वय ३०), वेटर राहूल रमेश साळवे (वय २१) हे सावरगाव रोडवरील बराको हॉटेल मध्ये स्मोकिंग झोन नसलेल्या ठिकाणी विना परवाना बेकायदेशीर हुक्का पार्लर चालवत होते.

पोलिसांनी छापा टाकला तेव्हा साहिल जिभाऊ सोनवणे (रा.सटाणा), प्रतिक रमेश आहेर ,आशितोष रोजश पगारे, शुभम सुनिल पवार (तिघे रा. शिवशक्तीनगर जेलरोड), विशाल रमेश देशपांडे (रा.काळेनगर,गंगापूररोड), विशाल विजय व्हिजन (रा.बळवंतनगर,गंगापूररोड), निखील सुभाष पाटील (रा.नवीन पंडीत कॉलनी,),संदिप दिनेश खंडेलवाल (रा.विकास कॉलनी,त्र्यंबकरोड) व पुरूषोत्तम इश्वरदास उबराणी (रा.रामेश्वरनगर गंगापूररोड) हे हॉटेलमध्ये प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करताना आढळून आले.

या ठिकाणाहून हुक्का पॉट व वेगवेगळया फ्लेवरची तंबाखू असा सुमारे १० हजार ८०० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून अधिक तपास हवालदार रविंद्र मोहिते करीत आहेत. याप्रकरणी ११ जणांविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हुक्का पार्लरची कारवाई झाल्यानंतर हॉटेलचालकांवर गुन्हा दाखल केला जातो. त्यामुळे हुक्का ओढणारे सहीसलामत सुटून जातात. मात्र या गुन्ह्यात हॉटेलचा मॅनेजर व वेटरसह हुक्का ओढणार्याविरोधातही गुन्हा दाखल करीत त्यांनाही चांगलाच दणका दिला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे अशा प्रकारांना चाप बसण्याची शक्यता आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी