क्राईम

प्रेम संबंधास नकार, एक्स गर्लफ्रेंडची हत्याकरुन मृतदेह आंबोली घाटात फेकला

प्रेम संबंधातील वाढत्या वादावादीला कंटाळून तरुणीने प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने माजी प्रियकराने तरुणीची हत्या करुन तीचा मृतदेह आंबोली घाटात फेकल्याचे उघड झाले आहे. गोव्यातील पोर्वोरम येथील राहणारी कामाक्षी ही 30 वर्षीय तरुणीनेचे गॅरेज चालविणाऱ्या प्रकाश चिंचवड (वय 22) याच्यासोबत प्रमेसंबंध होते मात्र वाढत्या विवादामुळे तीने हे नाते तोडले होते.

मिनाक्षी आणि प्रकाश यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र नात्यातील वाढत्या वादविवादामुळे तीने हे नाते तोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोघांमधील वाद आणखी वाढले. त्यामुळे मिनाक्षीने गोव्यातील म्हापसा पोलिस ठाण्यात तक्रार देखील नोंदविली होती.
त्यानंतर पोलिसांनी प्रकाश चिंचवड याला बोलावून त्याच्याकडून त्रास देणार नसल्याचे लेखी लिहून घेतले होते. त्यानंतर प्रकाशला कोठडीतून सोडले होते. प्रकाश कोठडीबाहेर आल्यानंतर काही काळातच कामाक्षी बैपत्ता झाली. तिची शोधाशोध सुरु झाली कामाक्षी सापडत नसल्याने तिच्या कुटुंबियांनी अखेर पोलिसांत धाव घेतली.

हे सुद्धा वाचा 
मेगाभरती! सरकारी नोकरी मिळवण्याची तरुणांना संधी!
मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांना सुनावले !
‘वंचित’ला कबूतराच्या हाती निमंत्रण पाठवले का; सुषमा अंधारेंना रोकडा सवाल

कामाक्षीच्या कुटुंबियांनी 30 ऑगस्ट रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने तपासाची चक्रे फिरविली. पोलिस तपासामध्ये कामाक्षीच्या मोबाईल फोनचे लोकेशन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटात असल्याचे दिसून आले. त्यानंतर शोध मोहीम हाती घेतली असता आंबोली घाटात कामाक्षीचा मृतदेह आढळून आला. दरम्यान पोलिसांनी आरोपी प्रकाशला ताब्यात घेतले असून अधिक तपासासाठी पोलिस त्याला आंबोली घाटातील घटनास्थळी घेऊन जाणार आहेत.

टीम लय भारी

Recent Posts

तरूणाईच्या मनात कोण ?, नरेंद्र मोदी की विरोधक ?

लय भाराची टीम गेले काही दिवस नाशिक मतदार संघातील मतदारांचा आढावा घेत आहे(Who is in…

40 mins ago

कन्नमवारनगर समस्यांच्या जंजाळात, नागरिकांची लोकसभा उमेदवारांकडे याचना

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दीना पाटील, तर भाजपकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…

1 hour ago

संजय राऊतांच्या ‘त्या’ आरोपानंतर निवडणूक विभागाकडून मुख्यमंत्र्यांच्या सामानाची तपासणी

संजय राऊतांच्या (Sanjay Raut) आरोपानंतर निवडणूक आयोगाकडून तपासणी : नाशिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांचा धडाका…

2 hours ago

नाशिक शहरातील खाजगी होर्डिंगची असणारी परिस्थितीबाबत मनपाचा कानाडोळा

घाटकोपर येथे घडलेली होर्डिंग दुर्घटने मागे असलेली पार्श्वभूमी व नाशिक शहरातील खाजगी होर्डिंगची (private hoarding)…

3 hours ago

नाशिकवरील ड्रग – वाईन कॅपिटलचा शिक्का पुसणार,शांतीगिरी महारांजाचा संकल्प

नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात तीन मातब्बर उमेदवार आहेत. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने विद्यमान खासदार हेमंत…

4 hours ago

तळीराम खरे बोलतात; नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदेंविषयी खूपच बोलले !

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दिना पाटील, तर भाजपाकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…

5 hours ago