35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्र'वंचित'ला कबूतराच्या हाती निमंत्रण पाठवले का; सुषमा अंधारेंना रोकडा सवाल

‘वंचित’ला कबूतराच्या हाती निमंत्रण पाठवले का; सुषमा अंधारेंना रोकडा सवाल

भाजपविरोधात एकजूटीने लढण्यासाठी देशातील तब्बल 28 पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी स्थापन केली असून या आघाडीची तीसरी बैठक मुंबईत पार पडत आहे. या बैठकीला देशभरातून अनेक राजकीय पक्षांचे नेते उपस्थित असून उद्धव ठाकरे, शरद पवार हे महाराष्ट्रतील मोठे नेते देखील सहभागी आहेत. इंडिया आघाडीत वंचित सहभागी होणार का याबाबत अद्याप देखील कोणता निर्णय झालेला नाही. दरम्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी , वंचित बहुजन आघाडीला इंडिया अलाइंन्सच्या बैठकीला बोलविले होते, असे विधान केले होते, यावर वंचितकडून सुषमा अंधारे यांना चपराक लगावण्यात आली आहे.

वंचित बहूजन युवक आघाडीच्या राज्य कार्यकारिणी सदस्य शमिभा पाटील यांनी म्हटले आहे की, नुकतेच सुषमा अंधारेंचे एक स्टेटमेंट येऊन गेले, त्यामध्ये त्यांनी म्हटले की, वंचित बहुजन आघाडीला इंडिया अलाइंन्सच्या बैठकीला बोलविले होते. सुषमाताईंना एक विचारायचे आहे की, कुठलाही राजकीय पक्ष असेल आणि इंडिया अलाइन्स असेल किंवा कुठल्याही इतर राजकीय घडामोडी आणि चर्चा असतील तर त्यामध्ये पक्ष म्हणून एक अधिकृत निमंत्रण येणे खुप महत्त्वाचे असते. इंडिया अलाइन्सच्या बैठकीचे अधिकृत निमंत्रण वंचितला कुणाच्या हस्ते पाठविले आहे. याची नैतिक जबाबदारी घेत आपण जरा स्पष्टीकरण द्यावे. म्हणजे पत्र पाठविले आहे, मेल केला आहे, फॅक्स केला आहे, की फोन केलाय मॅसेज केलाय की कबूतराच्या हाती पाठवलय एवढ तरी स्पष्ट करावे.

हे सुद्धा वाचा 
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणानेच दिली होती मंत्रालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी; वाचा काय होती त्याची मागणी
आलियाच्या ‘त्या’ फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ
ताज हॉटेल उडवून देण्यासाठी पाकिस्तानातून दोघेजण येत आहेत; मुंबई पोलिसांना धमकी

सुषमाताई खरे म्हणायला गेले तर तुमचा राजकीय बैठकांना जाण्याचा अनुभव कितपत आहे हे मला माहिती नाही. पण अशा पद्धतीने अधिकृत निमंत्रण असल्याशिवाय असल्या चर्चांमध्ये सहभागी होता येत नाही. नाहीतर असे होईल की ताई आली आणि येवून बसली. सगळ्यात महत्त्वाचे वंचित बहुजन आघाडी ही भाजपविरोधी आहे. भाजपविरोधात लढण्यासाठी तयार आहे. अशा पद्धतीची भूमिका वंचित बहूजन आघाडीने सुरुवातीपासूनच अगदी स्पष्टपणे ठेवलेली आहे. पण तरी देखील वंचित बहूजन आघाडीला कुठल्याही प्रकारे इंडिया अलाइन्सच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी बोलावले गेले नाही. आपण जर असे म्हणत असाल तर नैतिक जबाबदारी घेत हे स्पष्ट करा असे वंचित बहूजन युवक आघाडीच्या राज्य कार्यकारिणी सदस्य शमिभा पाटील यांनी म्हटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी