क्राईम

मित्राच्या बर्थडेसाठी निघालेल्या तरुणाचा गळा चिरुन खून, औरंगाबादेत खळबळ

टीम लय भारी

औरंगाबाद : उच्चशिक्षित तरुणाचा गळा चिरुन खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर (Aurangabad Murder) आला आहे. गुरुवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास औरंगाबादमधील हिमायत बागेत ही घटना घडली आहे. कृष्णा शेषराव जाधव असं मयत 22 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो हडको परिसरातील टीव्ही सेंटर भागात सुभाषचंद्र बोस नगरमध्ये राहत होता(Murder by slitting the throat of a young man).

काय आहे प्रकरण?

कृष्णाच्या वडिलांचे टीव्ही सेंटर भागात बालाजी ऑप्टिकल नावाचे दुकान आहे. मित्राच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला दहा ते पंधरा मिनिटांसाठी जातो, असे सांगत कृष्णा बुधवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास दुकानातून बाहेर पडला. त्यापूर्वी दुपारी कृष्णाचा मोबाईल हरवला होता. त्यामुळे तो बहिणीचा आयफोन घेऊन घराबाहेर पडला.

शीना बोरा जिवंत असून काश्मीरमध्ये आहे, इंद्राणी मुखर्जीचा धक्कादायक दावा

MBBS ची विद्यार्थिनी दोन आठवड्यांपासून मुंबईतून बेपत्ता

रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही

एमजीएम रुग्णालयाजवळील एका हॉटेलजवळ गेलेला कृष्णा तिथून थेट हिमायतबागेत आला. यावेळी त्याचा एक मित्र देखील सोबत होता. रात्री उशिरापर्यंत कृष्णा घरी न आल्यामुळे कुटुंबियांनी त्याच्याजवळील आयफोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, फोन कोणीही उचलत नव्हते.

फोन स्वीच ऑफशोध नाही

काही वेळाने कृष्णाचा फोन स्वीच ऑफ झाला. त्यामुळे रात्री बारा वाजेपर्यंत प्रयत्न केल्यानंतर जाधव कुटुंबियांनी सिडको पोलिस ठाणे गाठले. कृष्णा बेपत्ता झाल्याची त्यांची सिडको पोलिसात मध्यरात्री अडीचच्या सुमारास देण्यात आली. रात्रभर जाधव कुटुंबिय कृष्णाचा शोध घेत होते.

वसईतील डॉक्टरच्या घरी 14 लाखांचा दरोडा, वॉचमन गँगला 48 तासात ठोकल्या बेड्या

SIT formed to probe July 2020 ‘mysterious’ murder of realtor

सकाळी मृतदेह सापडला

कृष्णाची बहीण त्याचा शोध घेत हिमायतबागेच्या दिशेने निघाली. सकाळी साडेदहाला कृष्णाचा मृतदेह मिळाल्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. कृष्णाचा मृतदेह नेईपर्यंत कुटुंबिय घटनास्थळी पोहोचले होते. त्यांच्यासमोर पोलिसांनी मृतदेह रुग्णवाहिकेने घाटीत नेला

या खूनाच्या घटनेमुळे पोलिस दल पुरते हादरुन गेले आहे. बेगमपुरा, गुन्हे शाखा आणि सायबर पोलिसांकडून मारेकऱ्यांचा शोध सुरु आहे. मात्र, घटनेचे कारण अद्यापही गुलदस्त्यातच आहे.

Team Lay Bhari

Recent Posts

हिरावाडी रोडवर मोकळ्या भूखंडात ठेवलेल्या पाईपांना भीषण आग

हिरावाडी रोडवरील (Hirawadi Road) नंदनी अगरबत्ती पाठीमागील परिसरात मोकळ्या भूखंडात ठेवलेल्या शेती उपयोगी पाईपांना (pipes)…

5 mins ago

ई-कुबेर प्रणालीमुळे दोन महिन्यांपासून वेतन नसल्याने शिक्षकांमध्ये असंतोष

नाशिक जिल्ह्यात शिक्षकांच्या वेतनास ग्रहण लागले आहे.प्राथमिक शिक्षकांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या १ तारखेलाच व्हावेत, यासाठी…

32 mins ago

पीके करपल्यावर पाण्याचे आवर्तन; शेतकऱ्यांचा संताप

एकीकडे परवानगी नसल्याने आवर्तन सोडणार नाही असे महिनाभर अगोदरच सांगण्यात आले आणि आता कोणाच्या परवानगीने…

58 mins ago

‘खरे शिवसेना प्रमुख असाल तर…’ रत्नागिरीतून अमित शाहांचं उद्धव ठाकरेंना आव्हान

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)…

1 hour ago

नाशिकरोडमधून 2 गावठी कट्ट्यांसह दोघांना अटक!

उपनगर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाला दोघे संशयित दसक गावानजिकच्या महालक्ष्मीनगरमध्ये गावठी कट्टे विक्रीसाठी येणार असल्याची खबर…

11 hours ago

गंगापूर धरणाची दोन कोटी लिटरने वाढली पाणी क्षमता

गंगापूर धरणालगत गंगावऱ्हे गांव येथे गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेल्या गाळ उपसा मोहिमेमुळे गंगापूर धरणाची…

12 hours ago