राजकीय

राज ठाकरे पुणे दौऱ्यावर

टीम लय भारी

पुण्यात सध्या महापालिका निवडणुकीचे  वारे वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पुन्हा एकदा पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी ते पक्षसंघटनेवर बळ देताना दिसत आहेत(MNS president Raj Thackeray on Pune tour)

या दौऱ्यात राज ठाकरे हे पदाधिकाऱ्यांसोबत वैयक्तिक पातळीवर संवाद साधून त्यांची मतं जाणून घेत आहेत. तसंच येणाऱ्या निवडणुकीबाबत रणनिती ठरवली जाणार असल्याचं मनसे नेत्यांकडून सांगितलं जात आहे.

Raj Thackeray : राज ठाकरे ॲक्शन मोडमध्ये, आज नाशिक दौऱ्यादरम्यान साधणार कार्यकर्त्यांशी संवाद

Raj Thakare : ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मनसे ‘अ‍ॅक्शन’ मोडमध्ये

प्रत्येकाला सोशल मीडियावर लाइव्ह येण्याची घाई झाली आहे. आधी लोकांमध्ये मिसळा आपसातील वाद मिटवून पक्ष संघटना वाढवा. प्रत्येक जण स्वत:ला राज ठाकरे समजून पक्ष माझ्यामुळेच आहे, असा भ्रम तुमच्या मध्ये निर्माण झाला आहे.

हा भ्रम सोडा नाहीतर मी जसे तुम्हाला पद देऊ शकतो तर तुमचे पदही काढून घेऊ शकतो, हे विसरू नका, असा दम भरत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या शाखाध्यांक्षासह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या.

काँग्रेसचं सत्तेतील स्थान तिसरं, निधी मिळवण्यात पटकावला दुसरा क्रमांक

MNS Leader Amit Thackeray Launches Beach Clean-up Campaign In Maharashtra

आपापसातले मतभेद विसरुन काम करा असे त्यांनी म्हटले तसेच बुधवारी नियोजित बैठका झाल्यानंतर राज ठाकरे यांचा आज 9 ते 11 वाजता कसबा मतदारसंघ, 12 ते 2 पर्वती मतदारसंघ, दुपारी 4 ते 5:30 वाजता कॅन्टोन्मेंट मतदार संघ आणि संध्याकाळी 6 ते 7:30 वाजता वडगावशेरी मतदार संघाची बैठक, असा कार्यक्रम आहे. शुक्रवारी 17 डिसेंबरला आजी माजी नगरसेवक यांची बैठक होणार आहे, अशी माहिती यावेळी मनसे नेते बाबू वागस्कर यांनी दिली.

टीम लय भारी

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

14 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

14 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

15 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

15 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

15 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

18 hours ago