क्राईम

नाशिकरोडच्या बांधकाम व्यावसायिकाकडून मागितली १० लाखांची खंडणी

नाशिकरोड परिसरातील बांधकाम व्यावसायिकाला फ्लॅट विक्री करायचे असतील तर १० लाख रुपयांची खंडणीची ( ransom) मागणी करणार्या संशयिताने शिवीगाळ करीत साईट बंद पाडण्याचीही धमकी दिली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, या घटनेमुळे नाशिकरोड परिसरातील बांधकाम व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. फ्लॅट विकायचे असेल तर दहा लाखांची खंडणी द्यावी लागेल, अशी एका बिल्डरला धमकी दिल्याप्रकरणी नाशिकरोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून, बांधकाम व्यवसायिकांत खळबळ उडाली आहे. याबाबत प्रसिद्ध सदनिका बांधकाम व्यावसायिक प्रमोद बाळकृष्ण गोरे (वय ५५, रा. प्रकाशनगर, शिखरेवाडी, नाशिकरोड) यांनी नाशिकरोड पोलिसात फिर्याद दिली आहे, (Nashik road builder demands Rs 10 lakh ransom)

की २१ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास गोरे हे त्यांच्या मालधक्का रोड, नुरी मस्जिद नाशिकरोड येथे सुरू असलेल्या इमारत बांधकामच्या साईटवरील ऑफिसमध्ये बसलेले असतांना त्यांच्या ओळखीचे किशोर भारती याने तिथे येऊन मला दहा लाख रुपये दे, नाही तर मी तुला या बांधकाम साईट वरील एकही फ्लॅट विकू देणार नाही, असे म्हणत तुझी ही साईट बंद करून टाकीन, अशी धमकी दिली.

नाशिकरोड परिसरातच दोन दिवसांपूर्वी सराईत गुंडांनी एका राजकीय पक्षाच्या उपमहानगर प्रमुखाला प्रचार करण्यासाठी खंडणीची मागणी केल्याची घटना ताजी असतानाच, आता थेट बांधकाम व्यावसायिकालाच खंडणीसाठी धमकी दिल्याच्या प्रकाराने नाशिकरोड परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. किशोर भारती असे खंडणीची मागणी करणार्या संशयिताचे नाव आहे. प्रमोद बाळकृष्ण गोरे या बांधकाम व्यावसायिकाच्या फिर्यादीनुसार, त्यांची मालधक्का परिसरामध्ये नवीन बांधकाम साईटचे काम सुरू आहे.

त्यानंतर पुन्हा संध्याकाळी साडेपाच वाजेला पुन्हा भारती याने मालधक्का आमचा आहे, असे म्हणत धमकी देत दहा लाखाची मागणी करून तुला बघून घेईल व शिवीगाळ केली. त्यामुळे प्रमोद गोरे यांनी नाशिकरोड पोलिसांत भारती विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलीस करीत आहे. दिवसाढवळ्या बिल्डरकडे धमकी देऊन लाखोंची मागणी होत असल्याने बांधकाम व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

या घटनेमुळे बांधकाम व्यावसायिक गोरे यांनी नाशिकरोड पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दिली. त्यानुसार, संशयिताविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक बिडकर हे तपास करीत आहेत. मात्र या घटनेमुळे नाशिकरोड परिसरातील बांधकाम व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

टीम लय भारी

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

1 hour ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

3 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

4 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

5 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

5 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

6 hours ago