29 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeक्राईमनाशिकरोडच्या बांधकाम व्यावसायिकाकडून मागितली १० लाखांची खंडणी

नाशिकरोडच्या बांधकाम व्यावसायिकाकडून मागितली १० लाखांची खंडणी

नाशिकरोड परिसरातील बांधकाम व्यावसायिकाला फ्लॅट विक्री करायचे असतील तर १० लाख रुपयांची खंडणीची मागणी करणार्या संशयिताने शिवीगाळ करीत साईट बंद पाडण्याचीही धमकी दिली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, या घटनेमुळे नाशिकरोड परिसरातील बांधकाम व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.फ्लॅट विकायचे असेल तर दहा लाखांची खंडणी द्यावी लागेल, अशी एका बिल्डरला धमकी दिल्याप्रकरणी नाशिकरोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून, बांधकाम व्यवसायिकांत खळबळ उडाली आहे. याबाबत प्रसिद्ध सदनिका बांधकाम व्यावसायिक प्रमोद बाळकृष्ण गोरे (वय ५५, रा. प्रकाशनगर, शिखरेवाडी, नाशिकरोड) यांनी नाशिकरोड पोलिसात फिर्याद दिली आहे,

नाशिकरोड परिसरातील बांधकाम व्यावसायिकाला फ्लॅट विक्री करायचे असतील तर १० लाख रुपयांची खंडणीची ( ransom) मागणी करणार्या संशयिताने शिवीगाळ करीत साईट बंद पाडण्याचीही धमकी दिली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, या घटनेमुळे नाशिकरोड परिसरातील बांधकाम व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. फ्लॅट विकायचे असेल तर दहा लाखांची खंडणी द्यावी लागेल, अशी एका बिल्डरला धमकी दिल्याप्रकरणी नाशिकरोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून, बांधकाम व्यवसायिकांत खळबळ उडाली आहे. याबाबत प्रसिद्ध सदनिका बांधकाम व्यावसायिक प्रमोद बाळकृष्ण गोरे (वय ५५, रा. प्रकाशनगर, शिखरेवाडी, नाशिकरोड) यांनी नाशिकरोड पोलिसात फिर्याद दिली आहे, (Nashik road builder demands Rs 10 lakh ransom)

की २१ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास गोरे हे त्यांच्या मालधक्का रोड, नुरी मस्जिद नाशिकरोड येथे सुरू असलेल्या इमारत बांधकामच्या साईटवरील ऑफिसमध्ये बसलेले असतांना त्यांच्या ओळखीचे किशोर भारती याने तिथे येऊन मला दहा लाख रुपये दे, नाही तर मी तुला या बांधकाम साईट वरील एकही फ्लॅट विकू देणार नाही, असे म्हणत तुझी ही साईट बंद करून टाकीन, अशी धमकी दिली.

नाशिकरोड परिसरातच दोन दिवसांपूर्वी सराईत गुंडांनी एका राजकीय पक्षाच्या उपमहानगर प्रमुखाला प्रचार करण्यासाठी खंडणीची मागणी केल्याची घटना ताजी असतानाच, आता थेट बांधकाम व्यावसायिकालाच खंडणीसाठी धमकी दिल्याच्या प्रकाराने नाशिकरोड परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. किशोर भारती असे खंडणीची मागणी करणार्या संशयिताचे नाव आहे. प्रमोद बाळकृष्ण गोरे या बांधकाम व्यावसायिकाच्या फिर्यादीनुसार, त्यांची मालधक्का परिसरामध्ये नवीन बांधकाम साईटचे काम सुरू आहे.

त्यानंतर पुन्हा संध्याकाळी साडेपाच वाजेला पुन्हा भारती याने मालधक्का आमचा आहे, असे म्हणत धमकी देत दहा लाखाची मागणी करून तुला बघून घेईल व शिवीगाळ केली. त्यामुळे प्रमोद गोरे यांनी नाशिकरोड पोलिसांत भारती विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलीस करीत आहे. दिवसाढवळ्या बिल्डरकडे धमकी देऊन लाखोंची मागणी होत असल्याने बांधकाम व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

या घटनेमुळे बांधकाम व्यावसायिक गोरे यांनी नाशिकरोड पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दिली. त्यानुसार, संशयिताविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक बिडकर हे तपास करीत आहेत. मात्र या घटनेमुळे नाशिकरोड परिसरातील बांधकाम व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी