Categories: क्राईम

जन आरोग्य योजना भ्रष्टाचाराने बरबटली; नाशकात दोन खासगी डॉक्टर एसीबीच्या जाळ्यात

जन आरोग्य योजनेमध्ये उपचार पाहिजे असतील, तर 20 हजाराची लाचेची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमधून समोर आला असतानाच आता नाशिकमध्ये दोन खासगी डॉक्टर एसीबीच्या जाळ्यात अडकल्याने महात्मा फुले जन आरोग्य योजना (Jan Arogya Yojana) सुद्धा लाचखोरांनी बरबटल्याचे समोर येत आहे. निफाड तालुक्यातील पिंपळगावच्या धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये सापळा रचून कारवाई करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत शस्त्रक्रिया केल्याच्या बदल्यात लाच मागितल्याने दोन खासगी डाॅक्टरांवर नाशकात कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.(The Jan Arogya Yojana was riddled with corruption; Two private doctors in Nashik caught by ACB)

7 हजारांची लाच घेताना डॉक्टर महेश परदेशी आणि डॉक्टर महेश बुब एसीबीच्या ताब्यात अडकले आहेत. या प्रकरणात तक्रारदाराच्या आईच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यता आली होती. निफाड तालुक्यातील पिंपळगावच्या धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. एसीबीची राज्यातील अशी पहिली कारवाई असावी, असे बोलले जात आहे.या प्रकरणात तक्रारदाराच्या आईच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यता आली होती. निफाड तालुक्यातील पिंपळगावच्या धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. एसीबीची राज्यातील अशी पहिली कारवाई असावी, असे बोलले जात आहे.

संपूर्ण प्रकार उघडकीस आल्याची माहिती मिळताच 1 फेब्रुवारीला रुग्णालयात रुग्णाला दाखल करण्यात आलं. रुग्णाला शस्त्रक्रिया योजनेत बसवली जाणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं. 5 फेब्रुवारीला रुग्णाकडून शस्त्रक्रियेसाठी 20 हजाराची मागणी करण्यात आली. 7 फेब्रुवारीला रुग्णांच्या नातेवाईकांनी 20 हजार 500 रुपये कॅन्टीन वाल्याकडे सुपूर्द केले. 8 फेब्रुवारीला रुग्णांच्या नातेवाईकांना डॉक्टरांकडून शस्त्रक्रिया योजनेत बसल्याचं सांगण्यात आलं.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच या योजनेतून होत असलेला समोर आला होता. छत्रपती संभाजी नगरच्या बीड बायपासवर असलेल्या अल्पाईन हॉस्पिटलमध्ये शासकीय योजनेत उपचार घेण्यासाठी 20 हजार रुपये लाच घेण्यात आली. हे स्टिंग ऑपरेशन खुद्द रुग्णांच्या नातेवाईकांनीच केलं होतं. शासकीय योजनेत ऑपरेशन बसवण्यासाठी पैसे स्वीकारणारा हा कोणी डॉक्टर किंवा हॉस्पिटलचा अकाउंटंट नसून रुग्णालयासमोरचा हॉटेल चालक होता. उपचारासाठी रुग्णांच्या नातेवाईकाकडून पैसे घेऊन ते डॉक्टरला मिळाल्याचं हा हॉटेल सांगतो. रुग्णांच्या नातेवाईकाकडे या स्टिंग ऑपरेशनच्या व्हिडीओसोबतच तर, या हॉस्पिटलमध्ये असलेल्या पठाण नावाच्या डॉक्टरांचा कॉल रेकॉर्डिंग देखील आहे.उपचारासाठी रुग्णांच्या नातेवाईकाकडून पैसे घेऊन ते डॉक्टरला मिळाल्याचं हा हॉटेल सांगतो. रुग्णांच्या नातेवाईकाकडे या स्टिंग ऑपरेशनच्या व्हिडीओसोबतच तर, या हॉस्पिटलमध्ये असलेल्या पठाण नावाच्या डॉक्टरांचा कॉल रेकॉर्डिंग देखील आहे.

टीम लय भारी

Recent Posts

डॉ. सुजय विखेंची चिडचिड, ७ मोबाईल फोडले !

लय भारीचा नगर मतदार संघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरा सुरू आहे. या दौ-यादरम्यान मतदार संघातील शेतक-यांशी,…

1 hour ago

विखेंच्या संस्थेतील उच्च शिक्षीत तरूणी म्हणते, डॉ. सुजय कुचकामी !

लय भारीचा नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरा सुरू आहे(Information about Vikhe Patil).…

2 hours ago

सुडबुद्धीचे राजकारण नाशिककर खपवून घेणार नाहीत- बडगुजर

राजाभाऊ वाजे (Rajabhau waje) यांना सर्व थरातून मिळत असलेला पाठिंबा बघता विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरू…

3 hours ago

देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याच्या काँग्रेसच्या षडयंत्रात ‘उबाठा’ ही सहभागी केशव उपाध्ये यांचा हल्लाबोल

हिंदु समाजातील उपेक्षित, वंचितांना संविधानाने दिलेले आरक्षण काढून घेऊन मुस्लिमांना बहाल करणे, मुस्लिम समाजातील तिहेरी…

3 hours ago

कॉंग्रेसच्या विकासनितीमुळेच आमची प्रगती, तरीही आमच्या मुलाच्या डोक्यात मोदीप्रेम !

लय भारीचा शिर्डी मतदार संघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरा सुरू आहे. यादरम्यान मतदार संघातील मतदारांना भेटून…

3 hours ago

म्हशीच्या बाजारात निलेश लंकेंचा चाहता भेटला, विखे पितापुत्रांवर जाम संतापला !

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा आता होवू घातला आहे या पार्श्वभूमीवर तळागाळातील सामान्य जनतेच्या भावना जाणून…

5 hours ago