उत्तर महाराष्ट्र

नाशिक उंटवाडी रोड येथे दूध नमुना मोफत तपासणी शिबीर

केवळ “विश्वास” या साडेतीन शब्दावर गेली अनेक वर्षे ,रोज सकाळी घरासाठी दूध ( Milk) वापरणारे लाखो ग्राहक आहेत. परंतु, आपण विकत घेतलेले दूध ( Milk) भेसळ युक्त आहे का, ते शुद्ध आहे का , आरोग्यासाठी उपयुक्त आहे का याची माहिती त्यांना नसते. केवळ विश्वास म्हणून आलेले बाजारातील दूध अनेक प्रकारे भेसळ केलेले असते . गायी म्हशी ला ऑक्सिटोंन नावाचे रासायनिक संप्रेरक असलेले इंजेक्शन देऊन दूध देण्यास भाग पाडले जाते किंवा दुधाचे प्रमाण कृत्रिमरीत्या वाढवले जाते.(Milk sample free testing camp at Nashik Untwadi Road)

हे दूध सेवन केल्यामुळे ,लहान मुलांचे शाररिक वाढीवर दुष्परिणाम दिसून आले आहेत. अश्या दुधाचे सेवन केल्यामुळे अवेळी हार्मोन्स निर्मिती होऊन छाती चा आकार मोठा होणे , चेहऱ्यावर केस येणे , जुलाब होणे इत्यादी लक्षणे दिसून आले आहेत.

तसेच थेट दुधात भेसळ करण्यासाठी अस्वच्छ पाणी घातले जाते तर युरिया , सर्फ पावडर , पीठ , साखर सारखे अनेक रसायने सर्रास भेसळ केली जातात. भेसळ युक्त दूध म्हणजे विकत घेतलेले विष असून हळू हळू ते शरिरातील अनेक अवयावर दूरगामी दुष्परिणाम करते. किडनी , यकृत , पचन संस्था यांचे विकार शरीरात बळावतात. दूध भेसळ हा गंभीर गुन्हेगारी प्रकार अलीकडे मोठ्या प्रमाणात सुरू झालेला असून सामान्य दूध ग्राहक याचा थेट शिकार झाला असूनही तो मात्र या बाबत उदासीन आहे.

एप्रिल महिन्यात दूधग्राहक जागृती साठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत तर्फे देशभर जागृती मोहीम सुरू केलेली असून त्याचाच भाग म्हणून अ भा ग्रा पं नाशिक जिल्हा व अन्न औषध प्रशासन नाशिक जिल्हा यांचे संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून 1 मे 2024 बुधवार रोजी सकाळी 10.00 ते 12.00 दरम्यान , इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स सभागृह, उंटवाडी रोड येथे “दुध नमुना मोफत तपासणी शिबीर” आयोजन केले आहे.

नाशिक जिल्हा अन्न व औषध प्रशासन सह आयुक्त संजय नारगुढे हे शिबिरार्थीना अन्न व दुधभेसळ संबंधी कायदेशीर तरतुदी समजावून सांगणार आहेत तर जिल्हा शासकीय अन्न प्रयोगशाळा नाशिक चे अधिकारी श्री बयलें हे दूध भेसळ तपासणी प्रक्रिया या बद्दल माहिती देतील. दूधभेसळ व अन्न तज्ञ , अश्वमेध लॅब च्या संचालिका डॉक्टर अपर्णा फरांदे या पॉवर पॉइंटच्या माध्यमातून ,घरच्या घरी दूध भेसळ तपासणी कशी करावी या बाबत माहितीचे सादरीकरण करतील व त्यांचे सहकारी शिबीर स्थळी दूध भेसळ नमुने तपासून देतील. 105 ml कोरे दूध नमुना, नाव व मोबा क्रमांक लिहून प्लास्टिक बॉटल अथवा पिशवी मध्ये शिबीर स्थळी आणावे व तपासणी कौंउटर ला जमा करावे तसेच सभागृहात मार्गदर्शन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.

दूध नमुना तपासणी जन जागृती, शिक्षण आणि व्यक्तीगत माहिती साठी असून शिबिर लाभ मोफत आहे. शिबीर फक्त 2 तास सुरू राहणार आहे. मागणी वाढल्यास आधी नाव नोंदणी करणार्यांनाच फक्त लाभ दिला जाईल.

त्यामुळे नाव नोंदणीसाठी 9823599957 किंवा 7972931763 या क्रमांकावर त्वरित संपर्क करावा शिबीर सर्वासाठी खुले असून त्यातही गृहिणींनी व महिलांनी याचा जास्तीत लाभ घ्यावा असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हा अध्यक्ष इंजि हि. रा. जाधव यांनी आमचे वृत्त प्रतिनिधींशी बोलताना केले.

टीम लय भारी

Recent Posts

भुजबळांकडून ‘तुतारी’चा प्रचार, मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा; आमदार कांदेंची मागणी

सध्या लोकसभा निवडणुकांची  धामधूम सुरु असल्याने सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून जोरदार प्रचार चालू आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी…

12 hours ago

अक्षय तृतीयेच्या निमीत्ताने बाजारपेठेत कोट्यवधीची उलाढाल

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षय्य तृतीयेचा (Akshaya Tritiya ) सण शुक्रवारी (दि. १०) उत्सहात…

13 hours ago

तरुणाचा भररस्त्यात कोयत्याने वार करत निर्घृण खून

इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव येथील तरुणाचा भर रस्त्यात तरुणाचा कोयत्याने वार करत आणि बंदुकीतून गोळ्या झाडत…

13 hours ago

संजय राऊत यांच्या बेजबाबदार वादग्रस्त वक्तव्या विरोधात तक्रार

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अहमदनगर येथील जाहीर सभेत…

14 hours ago

उमेश कामत आणि प्रिया बापटसोबत ‘जर तरची गोष्ट’ रंगणार

सुपरस्टार उमेश कामत आणि प्रिया बापट (Umesh Kamat and Priya Bapat) यांची प्रमुख भूमिका असलेले…

14 hours ago

नाशिक मधील निओमेट्रोचा प्रकल्प पूर्ण होण्याची मुदत संपली

वेगाने वाढणाऱ्या नाशिक शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याच्या उद्देशाने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

14 hours ago