क्राईम

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळेल,असे प्रलोभन दाखवून महिलेची २७ लाख रुपयांची फसवणूक

सोशल मीडियावर मेसेज करून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळेल, असे प्रलोभन दाखवून ४४ वर्षीय महिलेची २७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. या प्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्यासह फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती वागळे इस्टेट पाेलिसांनी बुधवारी दिली. या घटनेतील तक्रारदार ४४ वर्षीय महिला या ठाण्यातील रघुनाथनगर परिसरात वास्तव्याला आहे. दाेन अनाेळखींनी तिला १० जानेवारी ते फेब्रुवारी २४ या कालावधीत इन्स्टाग्राम अकाउंट व मोबाइलवर मॅसेज करून ऑनलाइन शेअर मार्केटमधून शेअर्स व आयपीओ खरेदी केल्यास मोठा परतावा मिळेल(Woman duped of Rs 27 lakh on pretext of making extra profit if she invests in stock market )

अशा बतावणीचा मेसेज पाठविला. त्यासाठी एक लिंकही तिला पाठविण्यात आली. त्याच लिंकद्वारे व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड करून त्यांना डिमॅट खाते उघडण्यास सांगितले. त्यानंतर तिचा विश्वास संपादन करून शेअर खरेदीच्या नावाखाली २७ लाख रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. मात्र, काेणताही परतावा किंवा मुद्दल रक्कम परत न करता, तिची फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेने २ एप्रिल २४ राेजी वागळे इस्टेट पाेलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (क), ६६ (ड) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

ठाण्यातील रहिवासी रघुनाथनगर परिसरात वास्तव्याला असून यांना १० जानेवारी ते फेब्रुवारी २०२४ या काळात एका अनोळखी फेसबुकधारक भामट्याने फेसबुकवर शेअर मार्केटिंगसाठी जाहिरात पाठवली. त्यामधील व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करण्यासही त्यांना भाग पाडले. त्यानंतर या ग्रुपवर लिंक पाठवून त्यामध्ये मेगथर्म इंडक्शन कंपनीचे
आयपीओ खरेदी करण्यासाठी त्यांना २७ लाख इतकी रक्कम ऑनलाइन पाठवण्यास सांगून ती परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकाराबाबत त्यांनी २ एप्रिल २४ रोजी केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी वागळे इस्टेट पाेलिस हे अधिक तपास करीत आहेत. एका अनोळखी फेसबुकधारक भामट्याने फेसबुकवर शेअर मार्केटिंगसाठी जाहिरात पाठवली. त्यामधील व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करण्यासही त्यांना भाग पाडले. त्यानंतर या ग्रुपवर लिंक पाठवून त्यामध्ये मेगथर्म इंडक्शन कंपनीचे
आयपीओ खरेदी करण्यासाठी त्यांना २७ लाख इतकी रक्कम ऑनलाइन पाठवण्यास सांगून ती परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकाराबाबत त्यांनी २ एप्रिल २४ रोजी केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी वागळे इस्टेट पाेलिस हे अधिक तपास करीत आहेत.

टीम लय भारी

Recent Posts

तरूणाईच्या मनात कोण ?, नरेंद्र मोदी की विरोधक ?

लय भाराची टीम गेले काही दिवस नाशिक मतदार संघातील मतदारांचा आढावा घेत आहे(Who is in…

45 mins ago

कन्नमवारनगर समस्यांच्या जंजाळात, नागरिकांची लोकसभा उमेदवारांकडे याचना

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दीना पाटील, तर भाजपकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…

1 hour ago

संजय राऊतांच्या ‘त्या’ आरोपानंतर निवडणूक विभागाकडून मुख्यमंत्र्यांच्या सामानाची तपासणी

संजय राऊतांच्या (Sanjay Raut) आरोपानंतर निवडणूक आयोगाकडून तपासणी : नाशिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांचा धडाका…

2 hours ago

नाशिक शहरातील खाजगी होर्डिंगची असणारी परिस्थितीबाबत मनपाचा कानाडोळा

घाटकोपर येथे घडलेली होर्डिंग दुर्घटने मागे असलेली पार्श्वभूमी व नाशिक शहरातील खाजगी होर्डिंगची (private hoarding)…

3 hours ago

नाशिकवरील ड्रग – वाईन कॅपिटलचा शिक्का पुसणार,शांतीगिरी महारांजाचा संकल्प

नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात तीन मातब्बर उमेदवार आहेत. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने विद्यमान खासदार हेमंत…

4 hours ago

तळीराम खरे बोलतात; नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदेंविषयी खूपच बोलले !

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दिना पाटील, तर भाजपाकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…

5 hours ago