31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeक्राईमशेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळेल,असे प्रलोभन दाखवून महिलेची २७ लाख...

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळेल,असे प्रलोभन दाखवून महिलेची २७ लाख रुपयांची फसवणूक

सोशल मीडियावर मेसेज करून शेअर मार्केटमध्ये < Stock Market > गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळेल, असे प्रलोभन दाखवून ४४ वर्षीय महिलेची २७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. या प्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्यासह फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती वागळे इस्टेट पाेलिसांनी बुधवारी दिली. या घटनेतील तक्रारदार ४४ वर्षीय महिला या ठाण्यातील रघुनाथनगर परिसरात वास्तव्याला आहे. दाेन अनाेळखींनी तिला १० जानेवारी ते फेब्रुवारी २४ या कालावधीत इन्स्टाग्राम अकाउंट व मोबाइलवर मॅसेज करून ऑनलाइन शेअर मार्केटमधून शेअर्स व आयपीओ खरेदी केल्यास मोठा परतावा मिळेल(Woman duped of Rs 27 lakh on pretext of making extra profit if she invests in stock market )

अशा बतावणीचा मेसेज पाठविला. त्यासाठी एक लिंकही तिला पाठविण्यात आली. त्याच लिंकद्वारे व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड करून त्यांना डिमॅट खाते उघडण्यास सांगितले. त्यानंतर तिचा विश्वास संपादन करून शेअर खरेदीच्या नावाखाली २७ लाख रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. मात्र, काेणताही परतावा किंवा मुद्दल रक्कम परत न करता, तिची फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेने २ एप्रिल २४ राेजी वागळे इस्टेट पाेलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (क), ६६ (ड) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

ठाण्यातील रहिवासी रघुनाथनगर परिसरात वास्तव्याला असून यांना १० जानेवारी ते फेब्रुवारी २०२४ या काळात एका अनोळखी फेसबुकधारक भामट्याने फेसबुकवर शेअर मार्केटिंगसाठी जाहिरात पाठवली. त्यामधील व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करण्यासही त्यांना भाग पाडले. त्यानंतर या ग्रुपवर लिंक पाठवून त्यामध्ये मेगथर्म इंडक्शन कंपनीचे
आयपीओ खरेदी करण्यासाठी त्यांना २७ लाख इतकी रक्कम ऑनलाइन पाठवण्यास सांगून ती परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकाराबाबत त्यांनी २ एप्रिल २४ रोजी केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी वागळे इस्टेट पाेलिस हे अधिक तपास करीत आहेत. एका अनोळखी फेसबुकधारक भामट्याने फेसबुकवर शेअर मार्केटिंगसाठी जाहिरात पाठवली. त्यामधील व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करण्यासही त्यांना भाग पाडले. त्यानंतर या ग्रुपवर लिंक पाठवून त्यामध्ये मेगथर्म इंडक्शन कंपनीचे
आयपीओ खरेदी करण्यासाठी त्यांना २७ लाख इतकी रक्कम ऑनलाइन पाठवण्यास सांगून ती परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकाराबाबत त्यांनी २ एप्रिल २४ रोजी केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी वागळे इस्टेट पाेलिस हे अधिक तपास करीत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी