नाशिक मनपाची सिटिंलिंक तोट्यात : आता इलेक्ट्रिक बसचा आर्थिक बोजा वाढणार

महापालिकेच्या सिटीलिंक बससेवेत सध्या २०० सीएनजी आणि ५० डिझेल बसेस आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ही बससेवा तोट्यात सुरू आहे. असे असताना आता केंद्र शासनाच्या पीएम ई-बस सेवा योजनेच्या माध्यमातून नाशिक महापालिकेला ५० इलेक्ट्रिक बसेस मिळणार आहेत. मात्र, या बससेवेसाठी संबंधित ठेकेदाराला प्रतिकिमी ७० रुपये मोजावे लागणार असल्याने या बससेवेचा भारही महापालिकेच्या माथ्यावर पडणार आहे. परिणामी तोट्यात भरच पडणार असल्याने मनपाच्या तिजोरीवर ताण निर्माण होणार आहे.
(Nashik Municipal Corporation’s citinlink at a loss: Now the financial burden of electric buses will increase)

महापालिकेने केंद्र शासनाच्या एन कॅपअंतर्गत मिळालेल्या निधीमधून प्रतिबस ५५ लाख रुपये याप्रमाणे अनुदानातून इलेक्ट्रिक बस संचलनाचा निर्णय घेतला होता. मात्र, केंद्र शासनाने पीएम ई-बस सेवा ही नवीन योजना आणल्याने नाशिक महापालिकेला मिळालेले अनुदान आता पीएम ई-बसकडे वर्ग करण्यात येणार आहे. मात्रल केंद्र शासन स्तरावर नाशिक महापालिकेसाठी निश्चित झालेल्या ठेकेदाराने ७० रुपये प्रतिकिमी या दराने बस चालविण्याचा आपला दर निश्चित केला आहे.

पीएम ई-बससेवा ही वातानुकूलित सेवा असल्यामुळे संभाव्य तोटा कमी करण्याच्या दृष्टीने भाडेही अधिक ठेवावे लागणार आहे. त्यामुळे महापालिका व प्रवासी या दोघांच्या खिशाला भुर्दंड बसणार आहे. सीएनजी व डिझेलच्या तुलनेत इलेक्ट्रिक बस स्वस्त असेल, असा दावा करण्यात आला होता. मात्र, डिझेल बसपेक्षा पीएम ई-बसेसकरिता पाच रुपये प्रति किमी जादा देण्याची वेळ मनपावर येणार आहे. महापालिकेने केंद्र शासनाच्या एन कॅपअंतर्गत मिळालेल्या निधीमधून प्रतिबस ५५ लाख रुपये याप्रमाणे अनुदानातून इलेक्ट्रिक बस संचलनाचा निर्णय घेतला होता. मात्र, केंद्र शासनाने पीएम ई-बस सेवा ही नवीन योजना आणल्याने नाशिक महापालिकेला मिळालेले अनुदान आता पीएम ई-बसकडे वर्ग करण्यात येणार आहे. मात्रल केंद्र शासन स्तरावर नाशिक महापालिकेसाठी निश्चित झालेल्या ठेकेदाराने ७० रुपये प्रतिकिमी या दराने बस चालविण्याचा आपला दर निश्चित केला आहे. त्यामुळे या दराने मनपाला बससेवा पदरात पाडून घ्यावी लागणार आहे. खरे तर मनपाला केंद्र शासनाकडून २४ रुपये प्रतिकिमी अनुदान मिळणार असले तरी ही बससेवा केंद्र्र शासन व महापालिकेला महागडीच ठरणार आहे.

पीएम ई-बससेवेअंतर्गत देशातील ३९, तर महाराष्ट्रातील १४ शहरांमध्ये इलेक्ट्रिक बसेस धावणार आहेत. नाशिकबरोबरच नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कल्याण- डोंबिवली, ठाणे, वसई विरार, अमरावती, भिवंडी, कोल्हापूर, मीरा-भाईंदर, सोलापूर, उल्हासनगर,अहमदनगर, लातूर या शहरांचा यात समावेश आहे.

टीम लय भारी

Recent Posts

नाशिक जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला कांदा

जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा,…

20 hours ago

५० हजाराची लाच घेतांना शिक्षणाधिकाऱ्याला अटक

शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक…

1 day ago

‘गाभ’ सिनेमा या दिवशी होणार प्रदर्शित

सध्या अनेक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. वेग-वेगळे विषय घेवून अनेक सिनेमा रिलीज झाले आहेत.…

1 day ago

केंद्रात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार – मंत्री छगन भुजबळ

जगात भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे आज आपला…

1 day ago

नाशिक – दिंडोरीमध्ये भाजप – शिंदे गट संकटात, पत्रकार विक्रांत मते यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडलेला आहे. याच पार्श्वभूमीवर लय भारीची टीम गेले काही दिवस…

2 days ago

पिंपळगावच्या मोदींच्या सभेआधी पाच शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेत ठेवले नजरकैदेत

आज मंगळवारी पिंपळगाव येथे होणाऱ्या जाहीर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत (Modi's rally) खोट्या आश्वासनाबद्दल जाब…

2 days ago