संपादकीय

गोष्ट ऐका शिवाजी महाराजांच्या मुत्सद्देगिरीची !

 

मृगा वर्तक : टीम लय भारी

गोष्ट आहे राजकारणाची. भारतातल्या 3 राजांची आणि राजांच्या मुत्सद्देगिरीची. कोसाकोसावर राज्य बदलतं, तिथल्या परिस्थितीनुसार राजांचे मतप्रवाह बदलतात. ही धेयवेडी माणसं सत्तेला महत्व देतात की जनतेला? अनादिकालापासून आजतागायत जिने या भरतवर्षाला भुरळ घातली आहे त्या राजधानीत औरंगजेबाचे राज्य होते.(chatrapati shivaji maharaj and his diplomacy)

दिल्लीजवलील आग्रा येथे शिवाजी आपल्या चिरंजीवांसाहित कैदेत अडकले होते. तिथून निसटण्या साठी शिवाजी महाराज यांचे प्रयत्न चालू होते, त्यांचा खात्मा करण्यासाठी औरंगजेबाची आपल्याच राजधानीत गुप्त खलबते चालू होती आणि मिर्झाराजे जयसिंग आपल्या शब्दाला कसे जागावे या विंवचनेत अडकले होते.

संपुर्ण हिंदुस्थानाला गिळंकृत करणारी औरंगजेबाची भूक, दिल्या शब्दाला जागण्यासाठी, आपल्या वचनासाठी आकाश पाताळ एक करणारे मिर्झाराजे आणि साम दाम दंड भेद वापरून स्वराज्याचे इप्सित साध्य करू पाहणारे शिवराय यांची ही गोष्ट आहे. राजनीतीत मुरलेल्या चाणाक्ष औरंगजेब बादशहाने शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी मिर्झाराजे जयसिंग यांना पाठवले. तेव्हा बादशहाला विजयाची खात्री होती. शिवाजींना आग्ऱ्यात घेऊन येण्याचा शब्दच मिर्झाराज्यांनी दिला होता.

केंद्राने ताट वाढले हे खरंय, तुमचे हात बांधलेत हेही खरंय : गोपीचंद पडळकर

पंकजाताईंनी आपल्याच कार्यकर्त्यांना झापले, ‘मुर्खांनो’ असा केला उल्लेख

23 किल्ले आणि 4 लाख होनाचा मुलुख इतके दाम मोजून आणि सामोपचाराने राजस्थानच्या राजाशी तह करून शिवाजी महाराज मिर्झाराज्यांसोबत आग्ऱ्यास निघाले. त्यावेळी जीवाला धोका पोहोचू नये यासाठी मिर्झाराज्यांकाढून वचन घ्यायला ते विसरले नाहीत. शक्ती आणि सत्तेने परिपूर्ण असलेला बादशहा त्याच्यासाठी अतिशय क्षुल्लक वाटणाऱ्या अशा राजांच्या हत्येची तयारी करण्यात गुंतले होते. औरंगजेबाला दिलेला शब्द तर पूर्ण केला, आता जिवाजी राजांचा जीव कसा वाचवावा या विचाराने विचलित न होता मिर्झा राजे आग्ऱ्यापासून महाराष्ट्रापर्यंत राजांचा मार्ग आखण्यात व्यस्त होते. राजांची जबाबदारी मिर्झा राजांनी आपल्या पुत्रावर सोपवली होती. मात्र कैदेतून सुटका राजांना स्वतःलाच करावी लागणार होती.

ही गोष्ट फक्त मिठाईच्या पेटाऱ्यांतून निसटून येणाऱ्या शिवाजी महाराजांची नाही तर तत्कालीन राजकारणाची आणि 3 वेगळ्या नेतृत्वाच्या मतप्रवाहांची आहे.

औरंगजेब शूर होता, हुशार होता, प्रशासन कौशल्ये त्याच्या ठाई होती. एखादी गोष्ट हवी असल्यास ती ठरवली की तिच्यासाठी आयुष्य धुवून लावण्याची त्याची तयारी असे. आशिया खंडातील बराचसा भाग त्याच्या कालावधीत त्याच्या अखत्यारीत होता. ही साधी गोष्ट नाही. मुले करती झाली की बापाचा खून करत अशा राज्यात त्याने 90 वर्षेपर्यंत राज्य केले होते. तो राजनीतीत पारंगत होता पण उत्कृष्ट राजकारणी नव्हता. दया, क्षमा, उदारपण त्याच्याकडे नव्हतं. ज्या सत्तेमुळे आपल्याला सम्राटत्व प्राप्त झाले आहे त्या जनतेचे आपण काही देणे लागतो ह्याचा त्याला पूर्ण विसर पडला होता.

याउलट शिवाजी महाराज.(diplomacy of chatrapathi shivaji maharaj and mirzaraje jaysing) त्यांचे अवघे आयुष्य हे रंजल्या गांजल्या आपल्या रयतेला स्वातंत्र्य मिळवून देण्यात गेले. ते उत्कृष्ट प्रशासक तर होतेच त्याच बरोबर ते मावळ्यांचे मित्र होते, कित्येक मोडक्या संसारांचे खंबीर आधार होते. मिळवलेल्या सत्तेला त्यांनी गुलाम मानले नाही तर रयतेचे नेतृत्व केले. राजकारणाचा खरा अर्थ त्यांना उमगला होता. गरज पडल्यास सामोपचाराने प्रश्न मिटवणे, प्रसंगी दाम मोजणे, अपराध घडल्यास दंडित करणे आणि युध्द झाल्यास थेट भेद देणं त्यांना जमत होतं. हिंदुस्तान, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या एवढ्या प्रांतात वर्चस्व प्रस्थापित केलेल्या औरंजेबाने त्याची शेवटची 27 वर्षे महाराष्ट्रातील इवल्याशा पण त्याच्या आयुष्याला पुरून उरणाऱ्या शिवाजींसाठी घालवली यातच राजांची उत्कृष्ट राजकौशल्ये दिसून येतात.

हिरोजी फर्जंद आपल्या राजांचा वेष परिधान करून मृत्यूची वाट पाहत पडून राहिले. आणि राजे मिठाईच्या पेटाऱ्यांतून निसटले. दूरदर्शी राजांनी आपल्या चिरंजीवांच्या सुरक्षितत्यासाठी त्यांच्या नावाचे दिवस सुद्धा घातले. संभाजी महाराजांचे उत्तरेतील ते दिवस व्यर्थ जाऊ नयेत म्हणून कवी कलश यांच्यासारख्या कविहृदयी सुहृदाला संभाजीसोबत ठेवले. ज्या कविराजांनी संभाजी राजांना शेवटच्या श्वासापर्यंत सोबत दिली.

बदलीसाठी प्रांताधिकाऱ्याने महिला तलाठ्याकडे केली शरीरसुखाची मागणी

Ram Charan Look as Chhatrapati Shivaji Maharaj

शिवाजी महाराजांनी शरणागती पत्करली हे मिर्झाराजे जयसिंगांचे दैदिप्यमान परंतु शेवटचे यश ठरले. आपल्या मुलाला रामसिंगला लिहिलेल्या पत्रातून त्यांचे शिवाजी राजांवर असलेले प्रेम आणि आदर स्पष्ट दिसून येतो. हिंदुत्वाकडे झुकलेले त्यांचे विचार शिवाजी राज्यांना औरंगजेबाच्या तावडीतून तावून सुलाखून सोडवून आणणारे होते. यातून त्यांचे दूरदृष्टीचे राजकारण, उदात्त हेतू, वचन पाळण्याची नीतिमत्ता आणि राजनिष्ठा दिसून येते.

ही गोष्ट फक्त मिठाईच्या पेटाऱ्यांतून निसटून येणाऱ्या शिवाजी महाराजांची नाही तर तत्कालीन राजकारणाची आणि 3 वेगळ्या नेतृत्वाच्या मतप्रवाहांची आहे.

 

Mruga Vartak

Recent Posts

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

4 days ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

5 days ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

5 days ago

डॉ. सुजय विखे पाटलांचे गिरे तो भी टांग उपर

डॉ. सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय(Dr. Sujay Vikhe Patil has been defeated…

7 days ago

छगन भुजबळ यांनी एका धनगर नेत्याला संपवलं होतं

उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळा केला होता. यांत भुजबळ यांनी नाहक…

7 days ago

छगन भुजबळ ओबीसी चळवळीचा वापर स्वतःचा भ्रष्टाचार बळकट करण्यासाठी करतात

भुजबळ(Bhujbal) ज्या ज्या खात्यात गेले, त्या त्या खात्यात त्यांनी यथेच्छ भ्रष्टाचार केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम…

7 days ago