34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयपंकजाताईंनी आपल्याच कार्यकर्त्यांना झापले, 'मुर्खांनो' असा केला उल्लेख

पंकजाताईंनी आपल्याच कार्यकर्त्यांना झापले, ‘मुर्खांनो’ असा केला उल्लेख

टीम लय भारी
परळी : केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्या परळी दौर्‍यात माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी स्वतःच्याच कार्यकर्त्यांची लायकी काढली. अरे मुर्खांनो कसल्या अंगार भंगार घोषणा देता आहात अशा शब्दात त्यांनी झापले. आणि आपल्याच कायकर्त्यांचा हजारो लोकांसमोर अपमान करण्याचा एक आगळा-वेगळा विक्रम पंकजा मुंडे यांनी स्थापन केल्याची चर्चा परळीसह सबंध बीड जिल्ह्यात रंगली आहे(Pankaja Munde got angry with her own volunteers).

त्याचे झाले असे की, पंकजाताई सध्या भाजप नेतृत्वावर प्रचंड नाराज आहेत त्यामुळे त्यांची समजूत काढून प्रकरण शांत करण्याच्या दृष्टीने केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी आपली जनआशीर्वाद यात्रा परळी येथील स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृति स्थळावरुन काढण्याचे ठरवले. परंतू आज परळीत दाखल झाल्यानंतर नाराज असलेल्या पंकजा मुंडे यांच्या समर्थकांच्या रोषाला भागवत कराड यांना सामोरे जावे लागले.

बदलीसाठी प्रांताधिकाऱ्याने महिला तलाठ्याकडे केली शरीरसुखाची मागणी

‘डिजिटल मीडिया’वर सक्ती नको, उच्च न्यायालयाचा आदेश

Pankaja Munde
माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी स्वतःच्याच कार्यकर्त्यांची लायकी काढली.

यात्रेला सुरूवात होताच कार्यकर्त्यांनी आपले वर्चस्व दाखवायाच्या नादात डॉ.कराड यांना कमीपणा दाखविणार्‍या घोषणा देण्यास जोरदार सुरूवात केली. तेव्हा पंकजाताई आपल्याच कार्यकर्त्यांवर प्रचंड भडकल्या. तेंव्हा ‘अरे.. मुर्खांनो… अशा घोषणा द्यायला मी शिकवले का तुम्हाला? असल्या घोषणा देणार्‍या कार्यकर्त्यांनी माझ्या दारात सुध्दा थांबायचे नाही. कसल्या अंगार भंगार घोषणा लावल्यात, दुसर्‍या पक्षाचा कार्यक्रम सुरू आहे का? माझ्या उंची इतकी लायकी ठेवा’ असे सांगत ताईंचा पारा चांगलाच चढलेला दिसत होता. पण घोषणाबाजी सुरू असतांना पंकजाताई एक फोन आला, फोनवर ताईंना कोण बोलत होते हे कळू शकले नाही, मात्र बोलतांना तततमममम करत ताईंनी वेळ काढली आणि नंतर फोनवर झालेल्या गोष्टींचा आपल्या कार्यकर्त्यांवर राग काढला, अशी चर्चा भाजपच्याच कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात सुरू होती, असे प्रत्यक्ष दर्शीनी सांगितले.

असा केला ताईंनी विक्रम

‘डिजिटल मीडिया’वर सक्ती नको, उच्च न्यायालयाचा आदेश

Jan Ashirwad Yatra: Bharati Pawar slams officials, Pankaja Munde rebukes party workers

या आधीही दसरा मेळाव्यातील एका भाषणात अरे येड्यानों, बाहेर उभा राहुन भाषण ऐकलं तरी चालतंय, असं बोलतांना आपल्याच कार्यकर्त्यांचा अपमान करणारा ताईंचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर गेवराई येथील एका सभेत तुमच्या सारखे बावळट लोक जगात कुठेही बघितले नाही, अरे येड्यांनो आपल्याचं नेत्याचं वाटोळं करत जाऊ नका, असं म्हणत जाहीर सभेत आपल्याच कार्यकर्त्यांना झापल्याचा ताईंचा आणखी एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता.

कधी येड्यांनो, कधी बावळटांनो तर कधी लायकी नसलेल्या मुर्खांनो अशा शब्दात प्रसाद मिळविलेल्या कार्यकर्त्यांना मात्र आता ताईंचे समर्थन कसे करावे असा प्रश्न पडत आहे. या प्रकारच्या चर्चा सोशल मिडीयावर होतांना दिसत आहेत. तसेच ताई समर्थकांच्या बाबतीत वेगवेगळे मिम्स् व्हायरल होत आहेत.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी