संपादकीय

अनिल देशमुख सुसाट, देवेंद्र फडणविसांना डोकेदुखी !

दोनेक वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांना तुरूंगात डांबले होते( Fadnavis told me to sign affidavit against Uddhav: Anil Deshmukh). तत्कालिन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटीचा तोंडी आरोप केला होता. या तोंडी आरोपावरून अनिल देशमुख यांना जवळपास वर्षभराचा तुरूंगवास झाला. फडणवीस यांनी हे जे कारस्थान केलं, त्याची व्याजासह परतफेड करण्याची तयारी देशमुख यांनी केलेली दिसतेय.

अनिल देशमुख तुरुंगाबाहेर; संविधानाची प्रत उंचावत म्हणाले माझा न्यायदेवतेवर विश्वास!

गेल्या काही दिवसांपासून अनिल देशमुख व देवेंद्र फडणवीस यांच्यात तुंबळ वाकयुद्ध सुरू आहे. हे शाब्दिक युद्ध दिवसेंदिवस अधिक उग्र रूप घेताना दिसतंय. ऐन विधानसभेच्या तोंडावरच देशमुख व फडणवीस यांच्यातील ही लढाई जनतेमध्ये सुद्धा अधिक औत्सुक्य निर्माण करणारी ठरलीय.

विधानसभा निवडणुका अगदी हातातोंडावर येवून ठेपल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा वाद कुणाच्या फायद्याचा व कुणाच्या तोट्याचा याचा जर विचार केला तर नुकसान होण्यासारखं अनिल देशमुख यांच्याकडं काहीच नाही. ते अगोदरच तुरुंगात जावून आलेले आहेत. सध्या तुरूंगात जावून आलेल्या राजकीय नेत्याला स्वातंत्र्यसैनिकाप्रमाणं जनमाणसांत सन्मान मिळू लागलेला आहे. त्याचा फायदा अनिल देशमुखांना झालाय. अनिल देशमुखांनी जेलवारी स्विकारली, पण भाजपपुढं शरणागती पत्करली नाही, अशी जनभावना आहे. अनिल देशमुखांवर परमबीर सिंग यांनी केलेले आरोप हे तोंडी आहेत. ठोस कोणताही पुरावा नाही, असे न्यायालयानेच मत व्यक्त केलेले आहे. त्यामुळे १०० कोटीच्या कथित लाचखोरीच्या आरोपात आता काहीही तथ्य उरलेलं नाही. या आरोपात आता नव्याने हवा भरणे फडणवीस यांना शक्य नाही.

खरंतर, विधानसभा निवडणुकीत कसंही करून यश मिळवायचं, अन् यावेळी आपण मुख्यमंत्रीपदावर बसायचं असं स्वप्न देवेंद्र फडणवीस यांनी पाहिलेलं असू शकतं. पण अनिल देशमुखांसारख्यांच्या आरोपांमुळं देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा रस्ता अवघड होवू शकतो. एवढंच कशाला, लोकसभा निवडणुकीप्रमाणं महाराष्ट्रात विधानसभेला मतदान झालं तर भाजपप्रणीत महायुती सत्तेच्या बाहेर जाईल आणि महाविकास आघाडी सरकार पुन्हा सत्तेत येईल, असंच सध्याचं वातावरण आहे. अशा या वातावरणात अनिल देशमुख व देवेंद्र फडणवीस यांच्या या वादात फडणवीस यांचंच नुकसान अधिक होण्याची चिन्हं आहेत.अनिल देशमुखांना मंजूर केलेला जामीन काही मिनिटातच घेतला मागे

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे व अजित पवार यांच्या विरोधात प्रतिज्ञापत्र लिहून देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडं मध्यस्थीसाठी माणूस पाठवला होता, असा अनिल देशमुख यांनी आरोप केला होता. या आरोपावर देवेंद्र फडणवीस यांनी लागलीच प्रत्युत्तर दिलं होतं. अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांविषयी गंभीर वक्तव्ये केली आहेत. त्याचे रेकॉर्डिंग माझ्याकडं असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला होता. फडणवीस यांनी हा गौप्यस्फोट केल्यामुळं अनिल देशमुख एक पाऊल मागे घेतील, असं सर्वांना वाटलं होतं. पण तसं झालं नाही. उलट समीत कदम यांचं नाव जगजाहीर करून अनिल देशमुखांनी खळबळ उडवून दिलीय. हेच समीत कदम माझ्याकडे आले होते. त्यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे व अजित पवार यांच्या विरोधात प्रतिज्ञापत्र भरायला सांगितलं होतं, असा दावा अनिल देशमुख यांनी केलाय. समीत कदम हे जनसुराज्यशक्ती पक्षाचे पदाधिकारी आहेत. त्यांचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध आहेत. पण अनिल देशमुखांनी केलेले आरोप समीत कदम यांनी फेटाळले आहेत.माजी गृहमंत्री अनिल देशमुख कारागृहातून बाहेर येणार; सीबीआयची याचिका हायकोर्टाने फोटाळली

अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील हे वादंग विधानसभेच्या तोंडावर दिवसेंदिवस अधिक तापत चाललंय. पण याची जास्त झळ फडणवीस यांनाच बसेल. कारण विधानसभा निवडणुकीत फडणवीस यांना अनेक पातळ्यांवर लढाई लढावी लागणार आहे. या उलट अनिल देशमुख यांचे एकमेव टार्गेट हे देवेंद्र फडणवीस असणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाअंतर्गत व पक्षाबाहेर असंख्य शत्रू निर्माण केले आहेत. असे सगळे शत्रू विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात फडणवीस यांच्यावर तुटून पडतील. देवेंद्र फडणवीस हे कारस्थानी आहेत. गृह खात्याचा उपयोग ते विरोधकांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी करतात, अशी फडणवीस यांची अगोदरच प्रतिमा तयार झालेली आहे. अशातच देशमुख, जरांगे पाटीस असे १५ – २० जणं फडणविसांना विधानसभा निवडणुकीत नामोहरण करतील. हे सगळं फडणवीस यांना नक्कीच जड जाणार आहे. पाहूयात पुढं काय होतंय ते.

 

तुषार खरात

Recent Posts

बांगलादेशसोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी कोहली-गंभीरचा व्हिडिओ आला समोर

चेन्नईत बांगलादेशसोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक गौतम…

8 hours ago

प्लॅस्टिक की लाकडी, केसांच्या आरोग्यासाठी कोणता कंगवा चांगला?

आपण नेहमी आपल्या केसांची खूप काळजी घेतो. त्यासाठी आपण महागडे तेल आणि  शॅम्पूचा वापर करतो.…

9 hours ago

3 वर्षांपासून पाहत आहे चांगल्या कामाची वाट… आहाना कुमराने केला बॉलीवूडबाबत मोठा खुलासा

अभिनेत्री आहाना कुमराने टीव्ही आणि ओटीटीवर काम केल्यानंतर चित्रपटसृष्टीत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. पण…

10 hours ago

अब्दू रोजिकचे लग्न झाले रद्द, या कारणामुळे तुटलं नातं

बिग बॉस 16 फेम अब्दु रोजिकने त्याचे लग्न रद्द केले आहे. अब्दूने या वर्षी जाहीर…

11 hours ago

पाठीचा कणा मजबूत आणि लवचिक करण्यासाठी रोज करा ‘हे’ व्यायाम

आजच्या व्यस्त जीवनामुळे आणि झपाट्याने बदलत चाललेल्या जीवनशैलीमुळे मणक्याशी संबंधित समस्या अगदी सामान्य झाल्या आहेत.…

12 hours ago

फ्लटर किक्स व्यायामामुळे पायाचे स्नायू होतात मजबूत, जाणून घ्या

आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपण आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये योग आणि व्यायामाचा समावेश केला पाहिजे. बहुतेक…

13 hours ago