33 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
Homeराजकीयअनिल देशमुख तुरुंगाबाहेर; संविधानाची प्रत उंचावत म्हणाले माझा न्यायदेवतेवर विश्वास!

अनिल देशमुख तुरुंगाबाहेर; संविधानाची प्रत उंचावत म्हणाले माझा न्यायदेवतेवर विश्वास!

राष्ट्रवादीचे (NCP) ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची बुधवारी (दि. २८) रोजी तुरुंगातून जामीनावर मुक्तता झाली. अनिल देशमुख यांच्या स्वागतासाठी ऑर्थर रोड कारागृहाबाहेर (Arthur Road Jail) राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत करत भारतीय संविधानाची प्रत देशमुख यांना भेट देत जोरदार घोषणाबाजी देखील केली. देशमुख तब्बल १३ महिन्यांनी तूरुंगातून बाहेर आले. यावेळी माध्यमांना प्रतिक्रीया देताना माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे, मला खोट्या आरोपांमध्ये फसवण्यात आले असे अनिल देशमुख म्हणाले.

100 कोटींच्या वसूलीच्या आरोपाखाली ईडी आणि सीबीआयने त्यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेतले होते. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी सीबीआयच्या जामीन स्थगितीची याचिका फेटाळल्याने देशमुख यांना मोठा दिलासा मिळाला आणि आज ते तुरूंगाबाहेर आले.

मुंबई उच्च न्यायालयाने देशमुख यांना १२ डिसेंबर रोजी जामीन मंजूर केला होता. मात्र सीबीआयने जामीनाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी जामीनाला १० दिवसांची स्थगिती मागीतली होती. दरम्यान सर्वोच्य न्यायालयाला सुट्टी असल्याने याबाबतची सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे सीबीआयने पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत जामीनाला स्थगिती देण्याची याचिका दाखल केली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने काल ही याचिका फेटाळल्यामुळे देशमुख यांचा तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला. आणि आज अनिल देशमुख यांची तुरूंगातून सुटका झाली. अनिल देशमुख यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंत पाटील यांच्या सह अनेक नेते उपस्थित होते. तसेच देशमुख यांचे कुटुंबिय देखील यावेळी उपस्थित होते अनिल देशमुख यांच्या कन्या यावेळी त्यांच्या स्वागतासाठी कारागृहाबाहेर उपस्थित होत्या.

 हे सुद्धा वाचा 

अजित पवार यांना एकनाथ शिंदेंची सरकारी विमान प्रवासाची ऑफर, अनिल देशमुखांच्या भेटीसाठी मुंबईकडे रवाना

माजी गृहमंत्री अनिल देशमुख कारागृहातून बाहेर येणार; सीबीआयची याचिका हायकोर्टाने फोटाळली

लोढा वर्ल्ड वन लटकली; आता ब्रिटनमधील कंपनी मुंबईत उभारणार देशातील सर्वात उंच इमारत !

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांची मुलगी म्हणाली, चौदा महिने अनिल देशमुख यांना खुप त्रास झाला. त्यांची तब्बेत खराब होती. गेले २१ महिन्यांपासून खोट्या आरोपांमुळे देशमुख साहेबांनी त्रास भोगला, आमचा न्यायालयावर विश्वास आहे. कोर्टाच्यावर देखील एक कोर्ट असते ते म्हणजे देवाचे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी