26 C
Mumbai
Friday, January 20, 2023
घरक्राईममाजी गृहमंत्री अनिल देशमुख कारागृहातून बाहेर येणार; सीबीआयची याचिका हायकोर्टाने फोटाळली

माजी गृहमंत्री अनिल देशमुख कारागृहातून बाहेर येणार; सीबीआयची याचिका हायकोर्टाने फोटाळली

कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी गेल्या वर्षभरापासून तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा कारागृहातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) मंगळवारी सीबीआयने (CBI) देशमुख यांचा जामीन स्थगित करण्यासाठी केलेली याचिका फेटाळून लावली. त्यामुळे अनिल देशमुखांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. सीबीआयने न्यायालयाकडे आणखी तीन दिवसांची मुदत मागितली होती, मात्र न्यायालयाने सीबीआयची मागणी फेटाळली त्यामुळे अनिल देशमुखांचा कारागृहातून बाहेर येण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून अनिल देशमुख उद्या कारागृहाबाहेर येणार आहेत.

कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने 12 डिसेंबर रोजी देशमुख य़ांना जामीन दिला होता. मात्र सीबीआयला पुढील कारवाई करता यावी यासाठी सीबीआयला 10 दिवसांची मुदत दिली होती. त्यामुळे देशमुख यांना दहा दिवस कारागृहात रहावे लागले. त्या दहा दिवसांमध्ये सीबीआयला सर्वोच्च न्यायालयात देशमुख यांच्या जामीनाला आव्हान द्यायचे होते. मात्र न्यायालयाच्या सुट्ट्यांचा कालावधी सुरु झाल्यामुळे ही सुनावणी जानेवारी महिन्यापर्यंत होण्याची शक्यता नसल्याने सीबीआयने पन्हा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र मुंबई उच्च न्यायालयात सीबीआयला मोठा झटका बसला. न्यायालयाने सीबीआयची याचिका फेटाळत देशमुख यांचा जामीन कायम ठेवला आहे.

हे सुद्धा वाचा 

शरद पवार आमदार जयकुमार गोरे यांच्या भेटीला; रुग्णालयात जावून केली तब्बेतीची विचारपूस

दानवेंनी करुन दिली फडणवीसांना ट्विटची आठवण; विचारले गुन्हा दाखल झाला का?

कर्नाटकच्या मराठी विरोधी प्रवृत्तीचा निषेध; विधिमंडळात एकमुखाने ठराव मंजूर

महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री होते. त्यावेळी तत्कालीन मुबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये वसूली करण्याचे आदेश दिल्याचा आरोप केला होता. या आरोपामुळे अनिल देशमुख यांना 1 नोव्हेंबर 2021 अटक करण्यात आली होती. त्यानंतर अनिल देशमुख यांच्यासह इतर काही जणांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर सक्तवसुली संचलनालय (ईडी) ने देखील देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांची चौकशी केली होती. ईडी पाठोपाठ सीबीआयने देखील त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!