लक्ष्मण हाके, तुम्ही आंदोलन करा; पण छगन भुजबळांसारख्या भ्रष्ट नेत्याला श्रेय देवू नका

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे(Manoj Jarange) यांनी वर्षभरापासून रान पेटवलं होतं. पण जरांगे यांना ब्रेक लावण्याचं मोठं काम लक्ष्मण हाके(Lakshman Hake) यांनी केलंय. लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनामुळे जरांगे पाटील बॅकफूटला गेले आहेत (Laxman Hake’s OBC agitation Chhagan Bhujbal taking credit). जरांगे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाला मराठा समाजाकडून जोरदार प्रतिसाद मिळत होता. किंबहूना लोकसभा निवडणुकीतही जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मोठी परिणामकारकता साधली. विशेषतः पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांच्यासारख्या फायरब्रॅण्ड नेत्यालाही जरांगे यांच्या आंदोलनाचा मोठा फटका बसलाय.

मराठा आरक्षणाचे सरकार ला गांभीर्य नाही,आरक्षण नाहीतर निवडणुका पुढे ढकला – मनोज जरांगे पाटील

Lakshman Hake News : ‘शिवसेनेत गेलेले लक्ष्मण हाके सरकारी पदाचा मलिदा हडपताहेत, लवकर हकालपट्टी करा’

आपण ओबीसींसाठी शेवटपर्यंत लढणार : मंत्री छगन भुजबळ

https://www.bbc.com/marathi/articles/cn005d7gde5o

मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळं ओबीसी समाजामध्ये अस्वस्थता वाढत चालली होती. त्या पार्श्वभूमीवर ओबीसींच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी लक्ष्मण हाके यांनी प्रतिउपोषण सुरू केलं. तब्बल १० दिवस ते उपाशी राहिले. त्यांच्या या आंदोलनामुळं महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघालं. ओबीसी समाजामध्ये आत्मविश्वास भरण्याचं काम लक्ष्मण हाके यांच्या या आंदोलनामुळं झालं.

पण लक्ष्मण हाके यांच्या या आंदोलनाचा फायदा उचलण्याचा संधीसाधूपणा छगन भुजबळ करीत आहेत. लक्ष्मण हाके यांनी छगन भुजबळ यांच्यासारख्या भ्रष्टाचारी, संधीसाधू व्यक्तीला लांब ठेवायला हवंय. छगन भुजबळ हे ओबीसींची लढाई लढतात, हा महाराष्ट्रातील जनतेमध्ये पसरलेला मोठा गैरसमज आहे.

वास्तवात, ओबीसींच्या नावाखाली छगन भुजबळ हे आपले राजकीय स्थान बळकट करतात. सरकारमध्ये आपलं वजन वाढवून घेतात. आपल्या खात्याचा निधी वाढवून घेतात. खात्यात भरपूर पैसा आला की, त्यातून ते अमाप भ्रष्टाचार करतात.

उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळा केला होता. यांत भुजबळ यांनी नाहक अनिल गोटे यांच्यासारख्या चांगल्या व्यक्तीला अडकवले होते. तेलगीसोबत भुजबळ यांचेच भ्रष्ट संबंध होते, तरीही त्यांनी आपलं झाकून ठेवलं आणि अनिल गोटे यांना तुरूंगात डांबलं. वास्तविक, अनिल गोटे यांनी तेलगीकडून कसलेही पैसे घेतल्याचा कुठलाही पुरावा सापडलेला नव्हता. धुळ्यामध्ये एक पुतळा उभारला होता. त्यासाठी तेलगीने किरकोळ देणगी दिली होती. देणगी म्हणजे भ्रष्टाचार होवू शकत नाही. पण छगन भुजबळांचे पितळ उघडे पाडले म्हणून भुजबळांनी आपल्या गृहखात्याचा गैरवापर करून अनिल गोटे यांना तुरूंगात डांबले होते. नियतीचा महिमा बघा, नंतर छगन भुजबळ यांनाच तुरूंगात जावे लागले होते. एवढेच नव्हे, तर भुजबळ हे मोठे भ्रष्टाचारी आहेत, हे सुद्धा नियतीने नंतर चव्हाट्यावर आणले.

टीम लय भारी

Recent Posts

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

2 days ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

3 days ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

3 days ago

डॉ. सुजय विखे पाटलांचे गिरे तो भी टांग उपर

डॉ. सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय(Dr. Sujay Vikhe Patil has been defeated…

5 days ago

छगन भुजबळ यांनी एका धनगर नेत्याला संपवलं होतं

उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळा केला होता. यांत भुजबळ यांनी नाहक…

5 days ago

छगन भुजबळ ओबीसी चळवळीचा वापर स्वतःचा भ्रष्टाचार बळकट करण्यासाठी करतात

भुजबळ(Bhujbal) ज्या ज्या खात्यात गेले, त्या त्या खात्यात त्यांनी यथेच्छ भ्रष्टाचार केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम…

5 days ago