संपादकीय

‘बळीराजा’चा सन्मान करणारा सण, ‘ओणम’

धनश्री धुरी : टीम लय भारी

दक्षिण भारतातील केरळमध्ये दरवर्षी ओणम सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. या दिवशी बळीराजा आपल्या प्रजेला भेटण्यासाठी पृथ्वीवर परत येतो, अशी अख्यायिका सांगितली जाते. तसेच शेतकऱ्यांच्या घरी धन – धान्यांची आरास येण्यासाठी आजच्या दिवशी पूजा करण्यात येते (Onam festival is celebrated every year in Kerala).

शेतात धान्य उगवल्याच्या आनंदात 10 दिवस ओणमचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. या दिवसात महिला दारात फुलांच्या रांगोळ्या काढतात. तसेच आंबट – गोड पदार्थ बनवून देवाला त्या पदार्थांचा नेवैद्य दाखवतात.

महिला दारात फुलांच्या रांगोळ्या काढताना

या कारणामुळे 20 ऑगस्ट हा जागतिक मच्छर दिवस म्हणून साजरा केला जातो

शुद्धीकरण करण्यासाठी ब्राम्हण लागतो, नारायण राणेंचे उद्धव ठाकरेंना खडेबोल

त्याचबरोबर पारंपरिक नाचगाणी, खेळ, नाटके यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. तसेच या सणाच्या दिवशी दक्षिण भारतात स्नेक बोटींची शर्यत ‘ अर्नामुल्ला वल्लामकलीचे मोठे वैशिष्ट्य आहे.

बळीराजाची आख्यायिका :
भगवान विष्णूंनी वामनावतार धारण करत बळीराजाला एका पावलामध्ये पाताळात धाडल्याची कथा आहे. बळीराजाची वचन निष्ठा पाहून वामनाने त्याला वरदान मागण्यास सांगितले होते. त्यावेळी बळीराजाने वर्षातून एकदा आपल्या राज्यातील प्रजेला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे बळीराजा आपल्या प्रजेला भेटण्यासाठी दरवर्षी पृथ्वीवर येतो असे मानले जाते. त्यामुळे ओणमच्या दिवसात वामनाच्या मूर्ती सोबत बळीराजाच्या मुर्तीचीही स्थापना घरोघरी केली जाते.

बळीराजा आपल्या प्रजेला भेटण्यासाठी पृथ्वीवर परत येतो, अशी अख्यायिका

सुभेदार मल्हारराव होळकरांचे ऐकले असते तर पानिपत जिंकले असते

Onam 2021: Date, time and significance of Kerala’s harvest festival

ओणमच्या सणात खाल्ले जाणारे पदार्थ :
ओणम सणाच्या निमित्ताने केळीच्या पानावर 25 पेक्षा अधिक पदार्थ असतात. यामध्ये तळलेले पदार्थ, विविध प्रकारच्या करी, लोणचे, मिठाई यांचा समावेश आहे.

ओणमच्या सणात खाल्ले जाणारे पदार्थ

यामध्ये काया वरूथाथा (केळीचे चिप्स), चेना वरुथा (यम कापून आणि मसाल्यासह तळलेले), सरकार उपरी (गुळ मिसळून केलेले केळीचे चिप्स), पुली इनजी (चिंचेवर आधारित चटणी), खिचडी, पाचडी (दह्यामध्ये अननस), ओलान (जाड नारळाच्या दूधाची ग्रेवीमध्ये सफेद दुधी), थेयल (मिश्र भाजी), एवियल ( दह्यावर आधारित करी), सांबर, रसम, मसालेदार ताक, पापड आणि उकडलेले तांदूळ. अशा पदार्थांचा यात समावेश असतो.

कीर्ती घाग

Recent Posts

तिरुपती लाडू वादावरून ‘या’ अभिनेतावर चिडले पवन कल्याण

गेल्या काही दिवसांपासून तिरुपती मंदिरात प्रसाद म्हणून दिले जाणाऱ्या लाडूवरून वाद सुरु आहे. आता या…

11 hours ago

इटलीमध्ये ‘वॉर 2’ ची शूटिंग सुरू, हृतिक-कियाराचा डान्स व्हिडिओ लीक

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आपल्या डांस आणि आपल्या फिटनेससाठी चर्चेत असतो. त्यांची जादू आजही प्रेक्षकांवर…

12 hours ago

रोज रात्री झोपण्यापूर्वी करा ‘हे’ सोपे व्यायाम, मांड्यांमधील चरबी होईल कमी

स्त्री-पुरुषांच्या शरीराचा वरचा भाग तंदुरुस्त असल्याचं अनेकदा पाहायला मिळतं, पण मांड्यांवरची चरबी खूप वाढलेली असते…

13 hours ago

वजन कमी झाल्यानंतर त्वचा घट्ट होण्यासाठी करावे ‘हे’ सोपे उपाय

वजन कमी केल्याने अनेक आजारांचा धोका कमी होतो. वजन जेवढे संतुलित ठेवले जाते तेवढा आजारी…

14 hours ago

विराट कोहलीचे ‘हे’ कौशल्य पाहून व्हाल थक्क, पहा व्हिडिओ

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली हा जगातील महान फलंदाजांपैकी एक आहे.…

14 hours ago

कामरान अकमलने केली पीसीबीची कानउघाडणी, म्हणाला -‘बीसीसीआयकडून शिका’

पाकिस्तान क्रिकेटची स्थिती खूपच खराब आहे. पाकिस्तान कोणताही सामना जिंकू शकत नाही आहे, या उलट…

15 hours ago