29 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeराजकीयशुद्धीकरण करण्यासाठी ब्राम्हण लागतो, नारायण राणेंचे उद्धव ठाकरेंना खडेबोल

शुद्धीकरण करण्यासाठी ब्राम्हण लागतो, नारायण राणेंचे उद्धव ठाकरेंना खडेबोल

टीम लय भारी

मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला अभिवादन करून गेल्यानंतर, शिवसैनिकांनी स्मृतिस्थळाच्या ठिकाणाचे गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केले होते. पण शुद्धीकरण करण्यासाठी ब्राम्हण लागतो. आमच्याकडे खुप लोक आहेत, आम्ही पाठवले असते. शुद्धीकरण करण्यासाठी लागणारे दोन-दोनशे रुपये देऊन लोक पाठवले असते. असे खडेबोल नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सुनावले आहे (Narayan Rane has slammed Chief Minister Uddhav Thackeray).

नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा मुंबईत गुरुवारी (ता.19) पासून सुरु झाली. त्यानंतर त्यांनी शुक्रवारी (ता.20) मुंबईत पत्रकार परिषद घेतली आहे. त्यावेळी त्यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. शिवसेनेने आधी म्हटले होते, की राणे यांना स्मारकावर येऊ देणार नाही. त्यानंतर मी तिथे गेलो तर तिथे कोणीच दिसले नाही. उद्धव ठाकरेही तिथे दिसले नाही. जर ते तिथे असते तर म्हणालो असतो माझ्या बापाचे स्मारक आहे. मला कोणाला नमस्कार करावा असे वाटते तो माझा प्रश्न आहे. गोमुत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यापेक्षा स्वतःचे मन शुद्धा करा. काय दूषित झाले होते, एवढेच जर स्मारकाबाबत वाटत असेल तर स्मारकाची स्थिती सुधारा, असे राणे म्हणाले (Narayan Rane said purify your mind instead of purifying it by sprinkling cow urine).

नारायण राणे सरसावले, अगरबत्तीवाल्यांसाठी !

गोमूत्र शिंपडणारे समोर असते, तर तेच गोमूत्र कोल्ड्रिंक सारखे पाजले असते : निलेश राणे

सात हजार गुन्हे दाखल करा

जनआशीर्वाद यात्रेवर सात गुन्हे नोंदवले गेले. त्यावर राणे म्हणाले, सात हजार गुन्हे दाखल करा. ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत. गुन्हे दाखल करणाऱ्यांना मला सांगायचे आहे, की केंद्रात आमची सत्ता आहे, असा सुचक इशारा राणे यांनी दिला.

Narayan Rane has slammed Chief Minister Uddhav Thackeray
सात हजार गुन्हे दाखल करा

मुंबईत सत्ता परिवर्तन आवश्यक आहे. आम्ही जागतिक किर्तीचे शहर करु. मुंबई महापालिकेत आमची सत्ता येईल. कोरोना हाताळण्यामध्ये राज्य सरकार कमी पडले. शिवसेनेचे लोक कसे वागतात हे मी जवळून पाहिले आहे. वेळ आल्यावर सगळे उघडे करीन, उघडे करण्याची वेळ आणून नये, असा इशारा राणे यांनी दिला.

सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला ‘मौलिक’ सल्ला

Uddhav Thackeray is leading Maharashtra towards demolition: Narayan Rane

जवळ बोलवून ओळख करुन देईल

शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणले होते की, नारायण राणे यांना ओळखत नाही. त्यावर राणे म्हणाले, मी त्यांना जवळ बोलवून ओळख करुन देईल. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आज विरोधी पक्षांची बैठक घेणार आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुध्दा उपस्थित असणार आहेत. त्या विषयी विचारले असता राणे म्हणाले, मी शिवसेनेत 39 वर्ष काढली. बाळासाहेब ठाकरे यांची विचारसरणी हिंदूत्वाची होती. त्यांनी जे केले ते हिंदूत्वासाठी आणि मराठी माणसासाठी केले. पण हे सत्तेसाठी लाचार झाले आहेत, असे नारायण राणे म्हणाले (Balasaheb Thackeray ideology was Hindutva).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी