एज्युकेशन

काँग्रेसच्या आंदोलनामुळे १० हजार विद्यार्थ्यांना मिळणार न्याय: अतुल लोंढे.

रायगड जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठातील गैरकारभाराने हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला होता. पेपर फेरतपासणीच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडे पैसे मागितले जात होते. विद्यापीठाच्या गैरकारभाराविरोधात विद्यार्थ्यांसह काँग्रेस पक्षाने विद्यापीठात आंदोलन केले. त्यानंतर जाग आलेल्या कुलगुरुंनी विद्यापीठातील गैरकारभाराला आळा घालून ज्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे त्यांचे पेपर ७ दिवसात तपासून निकाल जाहीर केला जाईल आणि पाचव्या सेमिस्टरची परीक्षा घेतली जाईल, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे या विद्यापीठातील १० हजार विद्यार्थ्यांना न्याय मिळणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिली आहे.

या संदर्भात पत्रकारांना माहिती देताना अतुल लोंढे म्हणाले की, बुधवारी मी विद्यार्थ्यांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे, जि. रायगड येथे जाऊन आंदोलन केले व कुलगुरु कारभारी काळे यांची भेट घेऊन परीक्षेतील गैरप्रकार व निकालातील त्रुटी दूर करण्यासंदर्भात चर्चा केली. यावेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार भरत गोगावले हे ही उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकून घेतल्यावर, ज्या विद्यार्थ्यांना अन्याय झाल्याची भावना आहे त्यांनी ८ ते १२ फेब्रुवारीदरम्यान फेरतपासणीसाठी अर्ज करावेत, १३ फेब्रुवारीनंतर पुढच्या ७ दिवसात म्हणजे २० फेब्रुवारीपर्यंत फेरतपासणीचा निकाल येईल आणि या फेरतपासणीत जे विद्यार्थी पास होतील त्यांची पाचव्या सेमिस्टरची परीक्षा घेण्यात येईल असे कुलगुरुंनी सांगितले आहे.
विद्यापीठातील १० हजार विद्यार्थ्यांवर अन्याय झाला झालेला आहे. विद्यापिठासंदर्भात उपस्थित झालेल्या सर्व शंकांचे निरसन केले जाईल व त्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाईल. असे आश्वासन आज झालेल्या बैठकीत कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना दिले आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे आणि न्याय मिळाला नाही तर पुन्हा मोठे आंदोलन करु असेही अतुल लोंढे म्हणाले.

या संदर्भात पत्रकारांना माहिती देताना अतुल लोंढे म्हणाले की, बुधवारी मी विद्यार्थ्यांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे, जि. रायगड येथे जाऊन आंदोलन केले व कुलगुरु कारभारी काळे यांची भेट घेऊन परीक्षेतील गैरप्रकार व निकालातील त्रुटी दूर करण्यासंदर्भात चर्चा केली. यावेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार भरत गोगावले हे ही उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकून घेतल्यावर, ज्या विद्यार्थ्यांना अन्याय झाल्याची भावना आहे त्यांनी ८ ते १२ फेब्रुवारीदरम्यान फेरतपासणीसाठी अर्ज करावेत, १३ फेब्रुवारीनंतर पुढच्या ७ दिवसात म्हणजे २० फेब्रुवारीपर्यंत फेरतपासणीचा निकाल येईल आणि या फेरतपासणीत जे विद्यार्थी पास होतील त्यांची पाचव्या सेमिस्टरची परीक्षा घेण्यात येईल असे कुलगुरुंनी सांगितले आहे.

टीम लय भारी

Recent Posts

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

2 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

2 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

3 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

4 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

4 hours ago

दारू पिण्यासाठी पैसे मागितल्यावरून वाद, मुलाने बापालाच संपवलं

जळगाव जवळच्या पळसखेडा येथे एका मुलाने त्याच्या जन्मदात्या पित्याचीच धारदार शस्त्राने वार करून हत्या (…

5 hours ago