एज्युकेशन

नाशिक उंटवाडी माध्यमिक विद्यालय येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ

नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित उंटवाडी माध्यमिक विद्यालय नाशिक येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ पार पडला. या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती नासिक शहराचे सहाय्यक पोलीस आयुक्त माननीय डॉक्टर सिताराम कोल्हे हे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष ना ए सोसायटीचे उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष माननीय चंद्रशेखर मोंढे उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र कापसे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत केले. या आशीर्वाद समारंभ प्रसंगी माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सिताराम कोल्हे सर यांनी अनेक विषयांवर मार्गदर्शन केले त्यांच्या एक तासाच्या मार्गदर्शनात सर्व विद्यार्थी मंत्रमुग्ध होऊन त्यांचे विचार ऐकत होते.यावेळी त्यांनी यशाची विविध सूत्रे विद्यार्थ्यांना अवगत करून दिलीत.

यशापर्यंत जाण्याचे अनेक मार्ग त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. कष्ट जिद्द आणि मेहनतीशिवाय यशाला दुसरा पर्याय नाही हेही त्यांच्या विचारातून सांगण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. चंद्रशेखर मोंढे यांनी विद्यार्थ्यांनी भरपूर सराव करून परीक्षेला सामोरे जावे. परीक्षेला जाताना कुठलेही धडपण घेऊ नये. आपल्या शंका, अडचणी शिक्षकांकडून अजूनही समजून घेण्यासाठी आपल्याला वेळ आहे. आपले शिक्षक नक्कीच अजूनही तुम्हाला मार्गदर्शन करतील असा विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. प्रमुख पाहुणे डॉक्टर सिताराम कोल्हे यांचा परिचय शाळेतील ज्येष्ठ शिक्षक बापूसाहेब चव्हाण यांनी करून दिला. त्यांनी परिचय करून देताना एका बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून देताना विशेष आनंद होत आहे. अशी भावना व्यक्त केली. कार्यक्रमाचेअध्यक्ष चंद्रशेखर मोंढे यांचा परिचय अंजली सुपे या शिक्षिकेने करून दिला. अनेक विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली. या मनोगतातून त्यांनी शाळा आणि शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी बोलताना अनेक विद्यार्थ्यांना गहिवरून आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षिका पूनम कुमावत यांनी केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन ज्येष्ठ शिक्षक बाळासाहेब आहेर यांनी केले. यावेळी मंचावर शाळेचे उपमुख्याध्यापक श्री शरद शेळके, शाळेचे पर्यवेक्षक साहेबराव राठोड, शाळेचे पर्यवेक्षक बी एन सूर्यवंशी. शिक्षक प्रतिनिधी तथा संस्था सहकार्यवाह विजय मापारी व पालक शिक्षक संघाचे पदाधिकारी ही उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे आभार ज्येष्ठ शिक्षिका मंगला मोरे यांनी केले. यावेळी अनेक शिक्षक व शिक्षिका उपस्थित होत्या. कार्यक्रमाचा शेवट वंदे मातरमने झाला.

टीम लय भारी

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

2 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

4 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

4 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

5 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

6 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

7 hours ago