एज्युकेशन

Student Scholarships: ऑक्टोबर ते डिसेंबर च्या काळामध्ये विद्यार्थी या तीन शिष्यवृत्त्यांसाठी अर्ज करू शकतात

चांगले शिक्षण हे कोणत्याही मनुष्याचा विकासाचा एक मूलभूत पाया मानला जातो. परंतु भारतासारख्या विकसनशील देशामध्ये आजही अनेक होतकरू विद्यार्थ्यांना त्यांच्या बिकट आर्थिक‍ परिस्थितीमुळे चांगल्या विदयापीठांमध्ये उच्च शिक्षण घेणे शक्य होत नाही. काही नामांकित संस्थांनी व कंपन्यांनी अशा होतकरू विदयार्थ्यांसाठी काही चांगल्या शिष्यवृत्या आणल्या आहेत. जे गुणवंत विदयार्थी आर्थिकदृष्ट्या संपन्न नसतील त्या विदयार्थ्यांना हे शिष्यवृत्ती आणि फेलोशिप कार्यक्रम वरदान ठरू शकतात. सदर शिष्यवृत्ती आणि फेलोशिप कार्यक्रम विविध शैक्षणिक पात्रता, वयोगट आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांना लागू आहेत.

चांगले शिष्यवृत्ती कार्यक्रम उच्च संस्थांमध्ये शिक्षण घेण्यास विदयार्थ्यांना मदत करू शकतात. शिष्यवृत्तीमुळे परदेशात अभ्यास करणे अधिक सोपे होऊ शकते कारण यामुळे आर्थिक दबाव कमी होतो. कोविड-19 नंतर अनेक शिष्यवृत्ती सुरू करण्यात आल्या आहेत जेणेकरुन ज्या विदयार्थ्यांनी एक किंवा दोन्ही पालकांना कोरोनाच्या आजाराने गमावले आहे त्यांना शिक्षण घेण्यात काही अंशी सहाय्य मिळू शकते.

या लेखात आम्ही तीन शिष्यवृत्ती संदर्भात माहिती दिली आहे. या शिष्यवृत्या‍ मिळवण्यासाठी ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये अर्ज करू शकता:

1. शालेय विद्यार्थ्यांसाठी आदित्य बिर्ला कॅपिटल कोविड शिष्यवृत्ती 2022-23

आदित्य बिर्ला कॅपिटल फाउंडेशन इयत्ता 1 ते 12 व पदवीधर विद्यार्थ्यांकडून त्यांचे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी अर्ज आमंत्रित करते आहे. कोविड-19 मुळे ज्यांनी आपले पालक गमावले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती आहे.

पात्रता:

– कोविड-19 महामारीमुळे ज्या भारतीय विद्यार्थ्यांनी आपले पालक गमावले आहेत त्यांच्यासाठी खुले आहे.

– अर्जदार इयत्ता 1 ते 12 आणि पदवीपूर्व (सामान्य आणि व्यावसायिक) अभ्यासक्रमांमध्ये शिकत असावेत.

– अर्जदारांनी नोंदणी केली पाहिजे आणि त्यांचे शिक्षण चालू ठेवले पाहिजे.

बक्षिसे आणि आर्थिक सहायता : 60,000 रूपयांपर्यंत निश्चित एक-वेळ शिष्यवृत्ती

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10-11-2022

अर्ज करण्याचा मार्ग: फक्त ऑनलाइन अर्ज

Url: www.b4s.in/it/ABCC3

2. GSK स्कॉलर्स कार्यक्रम 2022-23

GSK स्कॉलर्स प्रोग्राम 2022-23 चे उद्दिष्ट भारतातील सरकारी महाविद्यालयांमधून प्रथम वर्षाच्या MBBS चे शिक्षण घेणाऱ्या गुणवंत आणि आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांना आधार देणे आहे.

पात्रता:

– 12 वी मध्ये किमान ६५% गुण असलेले प्रथम वर्षाचे एमबीबीएस विद्यार्थी अर्ज करू शकतात.

– अर्जदारांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न सर्व स्त्रोतांकडून 6,00,000 रूपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

बक्षिसे आणि आर्थिक सहायता : प्रति वर्ष 1,00,000 रूपयांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15-10-2022

अर्ज करण्याचा मार्ग: फक्त ऑनलाइन अर्ज

Url: www.b4s.in/it/GSKP2

हे सुद्धा वाचा –

Gang Rape : धक्कादायक! एका पुजाऱ्याने महिलेकडून पैसे उकळत केला सामुहिक बलात्कार

IRCTC Tour Package : शिमला-मनाली फिरण्यासाठी IRCTC घेऊन आलंय परवाडणारे पॅकेज

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा जलवा, नवे खाते मिळताच धडाका सुरू !

3. कीप इंडिया स्माइलिंग फाउंडेशनल तर्फे खेळांडूसाठी शिष्यवृत्ती आणि मार्गदर्शन कार्यक्रम

Colgate-Pammolive (India) Ltd ही नामांकीत कंपनी तरुण विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक/करिअरच्या आकांक्षांचा पाठपुरावा करण्यासाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती प्रदान करत आहे.

पात्रता:

– इतरांना मदत करणार्‍या व्यक्तींसाठी, अर्जदार पदवीधर असले पाहिजेत आणि वंचित मुलांच्या गटाला शिकवणे किंवा त्यांना क्रीडा प्रशिक्षण देणे यासारख्या क्रियाकलापांमध्ये सहभागी असणे आवश्यक आहे.

– खेळाडूंसाठी, अर्जदारांनी गेल्या 2/3 वर्षांत राज्य/राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्तरावर राज्य/देशाचे प्रतिनिधित्व केलेले असावे. त्यांना राष्ट्रीय रँकिंगमध्ये 500 च्या आत/राज्य क्रमवारीत 100 च्या आत स्थान मिळाले पाहिजे. त्यांचे वय 9 ते 20 वर्षांच्या दरम्यान असावे.

– सर्व अर्जदारांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न वार्षिक 5 लाख रूपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

बक्षिसे आणि आर्थिक सहायता : निवड झालेले विदयार्थी तीन वर्षांपर्यंत प्रति वर्ष 75,000 रूपयांपर्यंत चे शिष्यवृत्ती पुरस्कार घेण्यास पात्र असतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31-12-2022

अर्ज करण्याचा मार्ग: फक्त ऑनलाइन अर्ज

Url: www.b4s.in/it/KSSI2

अश्विन शेश्वरे

He writes about National and Maharashtra Politics, Education, Health, Civic, Legal, Crime and Sports beat for LayBhari News.

Recent Posts

नाशिक मनपाच्या बांधकाम विभागाचा कानाडोळा,एम एन जि एल गॅस मुळे नागरिकांना होतोय त्रास

गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील अनेक भागात एम एन जि एल तर्फे गॅस (MNGL Gas) वाहिनी…

3 hours ago

नाशिक महापालिकेचा पाणी पुरवठ्यावर पाणीगळती रोखण्यासाठी स्काडामीटर बसवण्याचा प्रस्ताव

नाशिक शहरात धरणातून उचलले जाणारे पाणी व नागरिकांकडून होत असलेला पाणीवापर याचा विचार केल्यास पाणीगळतीचे…

4 hours ago

सिन्नर तालुक्यातील रामनगर येथे डबक्यात पडून बहीण-भावाचा म़ृत्यू

सिन्नर तालुक्यातील रामनगर येथे रवींद्र त्र्यंबक भंडकर यांची धनश्री भंडकर (वय 4 ), आविष (5)…

4 hours ago

शरद पवार विरूद्ध देवेंद्र फडणवीस अशी लढत माढा मध्ये रंगणार…

ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या कुटुंबीयांनी भाजपच्या विरोधात बंड पुकारल्याने आता माढा मतदारसंघातील समीकरणे बदलली…

4 hours ago

नाशिक महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याच्या खून प्रकरणी दोघांना अटक

सनी गंगाघाटावरून जात असताना एकाला धक्का लागला. त्यावरून वाद झाला होता. त्यानंतर त्यांची भेट पून्हा…

4 hours ago

चक्क छगन भुजबळांच्या स्विय सहायकालाच पन्नास हजारांचा गंडा

येवला शहरात छगन भुजबळांच्या निकट वरती (Chhagan Bhujbal's personal assistant) यांना एका महाठकाने 50 हजाराला…

4 hours ago