29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeआरोग्यTukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा जलवा, नवे खाते मिळताच धडाका सुरू !

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा जलवा, नवे खाते मिळताच धडाका सुरू !

धडाकेबाज अशी ओळख असेलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे त्यांच्या कडक शिस्तीच्या कामाच्या पद्धतीमुळे नेहमीच चर्चेत असतात. नुकताच त्यांनी आरोग्य खात्याच्या आयुक्तपदाचा कार्यभार हाती घेतला असून, अधिकाऱ्यांच्या बैठका घेत, कामाचा धडाकाच सुरू केला आहे.

धडाकेबाज अशी ओळख असेलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे त्यांच्या कडक शिस्तीच्या कामाच्या पद्धतीमुळे नेहमीच चर्चेत असतात. नुकताच त्यांनी आरोग्य खात्याच्या आयुक्तपदाचा कार्यभार हाती घेतला असून, अधिकाऱ्यांच्या बैठका घेत, कामाचा धडाकाच सुरू केला आहे. आरोग्य खात्याच्या पुणे येथील विभाग प्रमुखांच्या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या तसेच आरोग्य सेवा अधिक सक्षम व लोकाभिमुख होण्यासाठी आपला प्राधान्यक्रम असेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी मुढे म्हणाले, अधिकाऱ्यांनी आरोग्य सेवांच्याबाबतीत योग्य नियोजन करावे, साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्हा आणि तालुकानिहाय नियोजन करायला हवे, साथीच्या आजारांबाबत अधिकाऱ्यांनी दररोजच्या आकडेवारीवर लक्ष देणे गरजेचे आहे. त्यानुसार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपापसात समन्वय ठेवून आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दक्ष राहून काम करावे, तसेच जिल्हा ते अगदी गावपातळीवरील संस्थांसोबत संवाद ठेवून दररोज आरोग्य सेवांबाबत आढावा घेण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

  • लोकाभिमुख आरोग्य व्यवस्थेला प्राधान्य

 नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी आरोग्य विभागाने त्यांच्या सर्व भागधारकांशी समन्वय ठेवून काम करावे, लोककेंद्रित आरोग्य सेवा, डेटा आधारित निर्णय घेणे आणि सक्षमकर्ता म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून लोकाभिमुख कठीण आणि बदलत्या परिस्थितीस सक्षमपणे सामोरी जाणारी ‘आरोग्य व्यवस्था’ निर्मितीस प्राध्यान देणे ही काळाची गरज आहे, असे आरोग्य सेवा खात्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा:

IRCTC Tour Package : शिमला-मनाली फिरण्यासाठी IRCTC घेऊन आलंय परवाडणारे पॅकेज

ShivSena Demolished : ‘शिवसेना कधीही संपू शकत नाही!’ शरद पवारांचा दावा

Apex Council Election : शरद पवारांची फौज उतरली क्रिकेटच्या मैदानात!

  • या घटकांवर अधिकाऱ्यांनी भर द्यावा

जागतिक आरोग्य संघटनेच्या  (WHO)  आयपीएचएस (IPHS ) स्टँडर्ड नुसार  आरोग्य प्रणालीसाठी वापरात येणाऱ्या सहा घटकांवर आधारित भर द्यावा. जसे देण्यात येणाऱ्या सेवा, आरोग्य सेवेतील घटक, आरोग्य माहिती प्रणाली, आवश्यक असणाऱ्या औषधांची उपलब्धता, आरोग्य प्रणाली वित्त पुरवठा, नेतृत्व व शासन या सहा घटकावर भर द्यावा अशा सूचना मुंढे यांनी यावेळी केल्या. या बैठकीत पुणे येथील आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर व पुणे येथील सर्व विभाग प्रमुख, सहाय्यक संचालक व विकासात्मक स्वयंसेवी संस्थेचे सल्लागार उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी