मनोरंजन

पुष्कर जोगचं ‘ते’ विधान आणि मनोरंजन क्षेत्रातून संतापाची लाट

सध्या मराठा आरक्षणावरून आंदोलन होताना दिसत आहे. तर मराठा समाज सरकारकडे आरक्षणाची मागणी करत आहे. यावर आता जातीबाबत विचारणा करण्याऱ्या बीएमसी कर्मचाऱ्याबाबत संताप व्यक्त केला आहे. या बिग बॉस मराठी अभिनेत्यानं जातीबद्दल विचारणा केली. जातगणना करण्यासाठी आलेली व्यक्ती महिला नसती तर मी दोन लाथा घतल्या असत्या, असं वादग्रस्त विधान केलं. त्यानंतर बीएमसी कर्मचारी, किरण माने, अभिजीत केळकर यांनी पुष्कर जोगच्या पोस्टबद्दल संताप व्यक्त केला आहे. यावर आता शरद पोंक्षे यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. यावरून हा वाद आता चांगलाच टोकाला गेलाला पाहायला मिळत आहे.

काय म्हणाले शरद पोंक्षे?

पुष्कर जोगच्या कमेंटवरून अभिनेता आभिजीत केळकरने पुष्करच्या पोस्टनंतर सवाल उपस्थित केला आहे. यावर आता अभिजीत केळकरने पत्र लिहिलं आहे. यावर अभिनेते शरद पोंक्षे यांनी त्या पत्रावर पोस्ट करत पोंक्षे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावर पोंक्षे म्हणाले, ‘माझ्या घरी सुद्धा नगरपालिकावाले आले होते, मी त्यांना चहापाणी विचारलं आणि मी ब्राह्मण आहे, मला कसलिच सवलत नको, म्हणून नोंदही नको असं नम्रपणे सांगितलं. त्यावर हसून ते निघून गेले. दरवाजावर कोणीही आलं तरी त्याचा आदर करणं ही संस्कती आहे, आपली..नकार सुद्धा नम्रपणे देता येतो’. 

अभिजीत केळकर यांची फेसबुक पोस्ट

“प्रिय मित्र पुष्कर जोग यांस… मित्रा तुझी चर्चेत असलेली, वादग्रस्त पोस्ट वाचली, ती सोशल मीडियावर होती त्यामुळे इथेच तुला पत्र लिहिण्याचा हा प्रपंच. मी महानगरपालिका कर्मचाऱ्याचा मुलगा आहे, ज्याचा मला सार्थ अभिमान आहे, माझी आई महानगरपालिकेत शिक्षिका होती. तिच्याबरोबर तिला आणि तिच्या मैत्रिणींना मदत म्हणून मी अनेकदा जनगणना, सर्वेक्षण, प्रौढ शिक्षण ह्या कामात,अनेक वर्ष गेलो आहे आणि मदत केली आहे. उन्हातान्हात, पावसात सुध्दा फिरून, ही कामं करावी लागतात. वरून आदेश आला की त्याची अंमलबावणी करणं एवढंच त्यांचं काम असतं,दिलेल्या फॉर्मवर असलेले प्रश्न विचारावे लागतात, ते काही त्यांच्या मनातले नसतात.

हे ही वाचा

मुस्लिम आणि धनगरांना आरक्षण मिळवून देणार – मनोज जरांगे – पाटील

‘महाराष्ट्राविरोधी शक्तींचा डोळा’, हिरे व्यापारानंतर मुंबईतील चित्रपट उद्योग गुजरातकडे

केंद्राने घटवला मनपाचा ५ कोटी निधी

तुझ्या पोस्टच्या अनुषंगाने तुला काही प्रश्न विचारावेसे वाटतात…

१. घरी आलेल्या अश्या कर्मचऱ्यांच्या लाथ घालावी असं तुला का वाटलं असेल?ते सरकारी कर्मचारी आहेत,ते आपलं काम करत आहेत असा विचार तुला करावासा का वाटलं नसेल?

२. आपली जात सांगायची लाज का वाटावी किंवा कोणी ती विचारल्यावर राग का यावा?अगदी आपण कुठल्याही जातीचे असलो तरीही लाज का वाटावी?जात म्हणजे काही आपण केलेलं वाईट काम किंवा चोरी नाही ज्याची आपल्याला लाज वाटावी,किंवा त्यात अभिमान बाळगावा असंही काही नाही कारण त्यात आपलं स्वतःचं असं काहीच कर्तृत्व नाही, ती आपणहून आपल्याला येऊन चिकटते,कितीही हवी किंवा नको म्हटली तरीही, बरोबर ना?

३. सर्वेक्षण हा सरकारचा निर्णय आहे,सरकारने काढलेला आदेश आहे, त्यामुळे तुला इतकाच राग आला आहे तर थेट त्यांच्याच लाथ घालावी असं का वाटलं नसेल?(मुळात लाथ घालावी हा शब्दप्रयोगच वाईट/चुकीचा आहे)गेला बाजार,त्याच लोकांना हे प्रश्न तू का विचारले नसशील?हल्ली पंतप्रधानांपासून ते नगरसेवकापर्यंत प्रत्येकजण सोशल मीडियावर आहे हे सोशल मीडियावर active असलेल्या तुला माहीत असेलच,मग तो राग तिथे त्यांच्यावर का काढला नसशील?

४. समजून चालू घरी आलेला महानगरपालिकेचा कर्मचारी पुरुष असता आणि तू म्हणालास त्याप्रमाणे तू खरंच लाथ घातली असतीस?तर ती घातल्यावर तो काय गप्प बसला असता असं तुला वाटतं?

आपण कलाकार आहोत,लोक आपल्याला रोज बघतात, आपल्यावर, आपल्या कलाकृतीवर अतोनात प्रेम करतात,आपलं बोलणं , वागणं फॉलो करतात,त्यामुळे जबाबदारीने वागणं, बोलणं हे आपलं कर्तव्य आहे…

मी महानगरपालिका शिक्षिकेचा मुलगा असल्यामुळे तू जे बोललास ते मला फारच लागलं, त्यांचं अतिशय वाईट वाटलं,रागही आला…तू सुज्ञ आहेस असं मला वाटतं त्यामुळे आता तू काय करायला हवं हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही…ते केलंस तर लोभ आहेच तो तसाच राहील…”

तुझा मित्र/शुभचिंतक ”

टीम लय भारी

Recent Posts

धनुषच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…

12 hours ago

व्यायाम केल्यानंतर किती वेळाने काही खावे? जाणून घ्या

आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…

13 hours ago

चालताना गुडघेदुखी वाटते का? मग दररोज करा हे 3 व्यायाम

बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…

14 hours ago

Jaykumar Gore | आजींनी लाडकी बहिण, वयश्री सगळ्याच योजनांचा बुरखा फाडला |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…

15 hours ago

लाडकी बहीण योजनेतील १५०० रूपये ही भीक | महिलेने सरकारचे वाभाडेच काढले

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…

15 hours ago

नसांसंबंधी समस्यांवर रामबाण उपाय आहे डाळिंबाचा रस

आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…

15 hours ago