33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयमुस्लिम आणि धनगरांना आरक्षण मिळवून देणार - मनोज जरांगे - पाटील

मुस्लिम आणि धनगरांना आरक्षण मिळवून देणार – मनोज जरांगे – पाटील

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मराठा बांधवांनी सरकारकडे मागणी केली. मात्र सरकारने याकडे काही महिने झाले असता, केवळ आश्वसन दिलं आहे. अशातच आता मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील हे अंतरवाली सराटीहून मुंबईकडे पायी चालत निघाले. यावेळी ते वाशी येथे पोहोचल्यानंतर खुद्द राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस घेत उपोषण सोडलं. यावेळी शासनाकडून मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागण्या मान्य केल्याचा आध्यादेश आणण्यात आला. आता या मराठा मोर्चानंतर धनगर आणि मुस्लिम बांधवांना आरक्षण मिळावं अशी अट सरकारपुढे मनोज जरांगे-पाटील (Manoj jarange-patil) यांनी ठेवली आहे. त्यांना आरक्षण कसं नाही मिळत ते पाहतोच असं म्हणत मनोज जरांगेंनी सरकारला इशारा दिला आहे.

‘धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण कसं देत नाही तेच बघतो’

गेली अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणावरून सरकारवर मराठा बांधव आक्रमक होताना दिसत आहे. अशातच आता मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावं असे मनोज जरांगे यांचं म्हणणं आहे. आता मराठा आरक्षण हा ज्वलंत मुद्दा आहे. अशावेळी धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण कसं मिळत नाही हे बघतोच, असं म्हणत मनोज जरांगे यांनी या दोन्ही समाजाला आरक्षण देण्याबाबत इशारा दिला आहे.

एकदा प्रमाणपत्र हातात पडू द्या त्यानंतर मी मोकळाच आहे. धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे. मग बघतो सरकार कसं आरक्षण देत नाही.

हे ही वाचा

‘महाराष्ट्राविरोधी शक्तींचा डोळा’, हिरे व्यापारानंतर मुंबईतील चित्रपट उद्योग गुजरातकडे

नाशिक  रायगड सायकलवारी करणाऱ्या रॉयल रायडर्सचा गौरव 

नाशिक पुणे रोडवर गावठी कट्टे विकणारे तीन तरुण अटकेत

रायगडावर नतमस्तक

मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याबाबत मनोज जरांगे हे रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी गेले. यावेळी ते बोलत होते, ‘रायगडावर गेल्यानं विजय होतो आणि उर्जा मिळते. यामुळे रायगडाचरणी नतमस्तक व्हायला आलो आहे. मी पायी जाणार राजापुढे शरीराला किंमत नसल्याचं’, मनोज जरांगे-पाटील म्हणाले आहेत.

‘मराठा समाजाला मागास सिद्ध करा’

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकारने आध्यादेश आणला. आता अशातच मराठा समाजाला मागास सिद्ध करा अशी मागणी मनोज जरांगे-पाटील यांनी केली आहे. सरकार आणि मागासवर्ग आयोगाची समाजाला गरज आहे. चांगला सर्व्हे करून समाजाला मागास म्हणून सिद्ध करण्याची गरज आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी